या भारतीय खेळाडूंना शाबासकीची थाप कधी ?

   

आपल्या भारतात खेळ म्हंटले की साधारणतः मैदानी खेळच समजले जातात . मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंचाच गौरव करण्यात येतो  ज्यामुळे बुद्धिबळासारखा अस्सल भारतीय भूमीतील शारीरिक क्षमता आणि बौद्धिक चातुर्य यांच्या अनोखा संगम असलेला खेळ  खेळत असणाऱ्या खेळाडूंवर काहीसा अन्याय होतो . निरोगी शरीरातच निरोगी मन वास करते हा वाक्यप्रचार आपण सर्वांना माहिती आहेच आता निरोगी शरीररसाठी शारीरिक तंदरुस्ती हवीच ना ? बुद्धिबळ खेळताना बुद्धिबळाचा सराव करताना सातत्याने बसून वजन वाढते आणि या वाढलेल्या वजनामुळे विचार करण्याच्या क्षमतेवर काहीसा विपरीत परिणाम होतो त्यामुळे बुद्धिबळपटूंना खेळाच्या सरावाबरोबर शारीरिक व्यायाम देखील करावा लागतो . तासंतास एका जागी चित्त स्थिर करणे यासाठी  पाठ आणि मान शारीरिक दृष्ट्या योग्य असावीच लागते पाठ आणि मान योग्य राहण्यासाठी बुद्धिबळपटूंना शारीरिक तंदरुस्ती राखावीच लागते . असा रीतीने खेळासाठी दुहेरी मेहनत घेऊन सुद्धा आपल्याकडे बुद्धिबळपटूंना योग्य तो सम्मान मिळत नाही भारताच्याच नव्हे तर केनिया  बार्बुडा अश्या टीचभर देशातील क्रिकेटपटूंची नवे अनेकांना माहिती असतात मात्र बुद्धिबळपटूची नावे विचारली असता विश्वनाथन आनंद याच्या पुढे अनेकांची गाडी जात नाही भारताला ७५ ग्रँडमास्टर आहेत हेच अनेकांना माहिती नसते असो
         पाश्चात्य माध्यमे सध्या भारताचे बुद्धिबळामधील सुवर्ण युग सुरु असल्याचे आपल्या बातम्यांमध्ये सांगतात . नुकतीच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात  अबुधावी येथे झालेल्या अबुधावी मास्टर ही बुद्धिबळाची  स्पर्धा अर्जुन एरिगासी या भारतीय बुद्धिबळ खेळाडूने जिंकली ३१ देशातील १४२ खेळाडूंशी लढत देत त्यांनी हे यश मिळवले आहे . या स्पर्धेत ते पूर्णतः अपराजित राहिले या स्पर्धेत त्यांनी विजय मिळवले तर तीन डावात प्रतिस्पर्ध्याला बरोबरी मान्य करत दीड गुण मिळवत एकूण साडेसात गुण गुणांसह विजयश्री प्राप्त केली . तर
सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हा लेख लिहण्यापर्यंत दुबई ओपन बुद्धिबळ स्पर्धेत २०२२ स्पर्धेत सहाव्या फेरीपर्यंत अत्यंत चमकदार कामगिरी केली असून त्यांना अबुधावी स्पर्धेप्रमाणे याही स्पर्धेचा संभाव्य विजेता म्हणून बघितले जात आहे  सहाव्या फेरीपर्यंत झालेल्या डावामध्ये त्यांनी अत्यंत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत भल्या भल्याना तोंडात बोटे घालण्यास भाग पडले आहे नुकत्याच महाबलीपूरम झालेल्या चेन्नई बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये डी गुकेश या भारतीय बुद्धिबळपटूणे विश्वविजेता पदाला साजेसा खेळ केला . या स्पर्धेत झालेल्या ११ डावात त्यांनी तब्बल डाव खिश्यात घातले .दोन वर्षांपूर्वी झालेल्या ऑनलाईन बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये भारताने विजेतेपद मिळवले होतेनुकत्याच महाबलीपूरम झालेल्या चेन्नई बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये भारताने खुल्या आणि महिला गटात कांस्य पदक मिळवले होते
नुकत्याच महाबलीपूरम झालेल्या चेन्नई बुद्धिबळ ऑलम्पियाडमध्ये खुल्या गटात १७९ संघानी तर महिला गटात १६९ संघानी  सहभाग नोंदवला होता . १६९ / १७९ हि संख्या एका स्पर्धेतील आहे क्रिकेटच्या आतापर्यंतच्या सर्व विश्वचषकाची सहभागी संघाची एकत्रित संख्या या पेक्षा कितीतरी कमी होईल तरी आपणस क्रिकेट या विदेशी

खेळातील यशाचे कौतुक असते मात्र बुद्धिबळ या अस्सल भारतीय खेळातील यशाबाबत आपण अनभिज्ञ असतो हे पाले दुर्दैवच नाही का
? या खेळाडूंना जेव्हा शाबासकीची थाप मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थाने आपण भारतीय क्रीडाप्रेमी म्हणण्यास लायक ठरू हे नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?