आत्महत्या :एक सामाजिक शाप

 

 नुकताच राष्ट्रीय गुन्हे अहवाल प्रसिद्ध झाला. यात भारतात आत्यहत्येविषयी अत्यंत विदारक परीस्थिती असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. गेल्या 2021साली देशात 1 लाख 60हजार जणांनी आत्महत्या केल्याचे या अहवालात सांगण्यात आले आहे. या दिड लाखाहुन अधिक आत्महत्येत 13हजार 89 आत्महत्या या विद्यार्थ्यांचा आहेत.एका वर्षात 13हजार आत्महत्या म्हणजे दर 40 मिनीटांनी एक आत्महत्या. ज्या विद्यार्थ्यांचा आशेवर आपण उद्याचे महासत्तेचे स्वप्न बघतो त्या विद्यार्थ्यांना दर 40मिनीटांनी आत्महत्या करण्यासारखी स्थिती असेल तर आपले महासत्तेचे स्वप्न धुळीस तर मिळणार नाही ना?असी शंका उत्पन होवू शकतो.  .आता या आत्महत्या विषयावर माझ्या आधी इतक्या लोकांनी बोलले आहे, लिहले आहे, की बस.त्यामुळे मी त्यावर नविन काय सांगणार पामर ? याची कारणे आणि त्यावरच्या उपाययोजना सर्वांना माहिती आहेच. मात्र  "केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे"या वाक्यप्रचारानुसार या आधी यावर काहीच कृती कार्यक्रम का आखण्यात आला नाही? या प्रश्नावर मला तूमचे लक्ष वेधून घेयचे आहे 
थ्री इडीयट सारखा एखादा चित्रपट आल्यावर  विद्यार्थ्यांचा आत्महत्येवर वृत्तपत्राच्या रकानेचा रकाने भरुन लिहायचे, टिव्हीवर दिवसोंदिवस चर्चा करायची.मात्र एकदा तो जोर ओसरल्यावर या चर्चातून लिखाणातून काय निष्पण झाले? यावर काही बोलायचे नाही.तर दुसऱ्या विषयावर विविध स्तरावर चर्चा सुरु करायची या आपल्या भारतीयांच्या स्वाभावामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात  विद्यार्थ्यांचा आत्महत्या होत आहे, असे मला वाटते .उपासनेला दृढ चालवावे,ही समर्थांची उक्ती आपण कृतीत आणत नसल्याने दरवर्षी विद्यार्थ्यांचा आत्महत्येचा आकडा वाढताना दिसत आहे. कोणतीही समस्या सोडवण्यासाठी ती समस्या आहे, हे सर्वप्रथम मान्य करणे गरजेचे असल्याचे तज्ज्ञांचे
मत आहे. जर आपण ती समस्याच आहे, हे मान्य न केल्यास ती समस्येची सोडवणूक होत नाही. तर यावर काही थातूरमातूर गोष्टींमुळे या गोष्टी होतात असे सांगितले जाते, जसे  थ्री इडियटच्यावेळी एका चित्रपटामुळे हजारोंनी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, वगैरे. चित्रपटामुळे काहीसा प्रभाग पौगंडावस्थेतील विद्यार्थ्यांवर पडतो हे मान्य केले तरी एका चित्रपटामुळेच हजारोंनी आत्महत्या होत असतील तर दोष चित्रपटाचा नाही, तर व्यवस्थेत दोष आहे. जर व्यवस्थेत दोष नसतील तर आत्महत्यांचा आलेख वाढत गेला नसता.मात्र भावनिक किंवा अस्मितेचे मुद्दे उपस्थित करणाऱ्या कोणत्याही राजकारणाने यावर एक अक्षर देखील न बोलण्याने राजकरण्याने त्यांच्यामते विद्यार्थ्यांचा आत्महत्या ही भारताचीच समस्या नाही. आता समस्याच नसल्याने ती सोडवणार तरी कशी?
    काही जण प्रत्येक गोष्ट राजकारणी व्यक्तीवर सोपवून कसे चालेल? असा प्रश्न उपस्थित करतील, त्यांना माझे सांगणे आहे की, आपण लोकशाही व्यवस्थेत राहतो. लोकशाही व्यवस्थेत राजकाराणी लोकांनी एखाद्या गोष्टीबाबत निर्णय घेयचे आणि त्याची अमंलबजावणी प्रशासनाने करायची असी व्यवस्था असते. त्यामुळे भारतासारख्या
लोकशाही प्रधान देशात समाजाची कोणतीही समस्या ही राजकारणी व्यक्तीच सोडवू शकतात,अन्य नाही ,असे मला वाटते. मात्र त्यांना या विषयाचे गांभीर्य समजत नसल्याने देशाचे भविष्य असणाऱ्या विद्यार्थ्यांचा आत्महत्या मात्र वाढत आहेत, जे सर्वथा वाइटच आहे.
#ही_माझी_एक_हजार_एकासष्ठावी _ब्लॉगपोस्ट_आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?