..... आतातरी ही यादी थांबेल ना ?

     

    संत गाडगेबाबा, शैक्षणिक  पदवी घेण्याचा विश्वविक्रम  करणारे  श्रीकांत जिचकर, भाजपाचे महाराष्ट्रातील महत्तवाचे नेते गोपिनाथ मुंडे, ज्येष्ठ साहित्यिक किशोर शांताबाई काळे अभिनेत्री भक्ती बर्वे , ज्येष्ठ पत्रकार व्यंकटेश चपळगावकर , मराठा समाजबांधवांचे ज्येष्ठ नेते विनायक मेटे आणि आता ज्येष्ठ उद्योजक सायरस मिस्त्री . वरवर बघायला गेलो या व्यक्तींनी ज्या क्षेत्रात कार्य केले, त्याचा एकमेकांशी काहिही अर्थ नाही. पण एका दुर्देवी धाग्याने ही सर्व व्यक्ती गुंफली गेली आहेत, तो धागा आहे ,या सर्वांचे निधन हे रस्ते अपघातात झाले आहे. ही मोठी माणसे फक्त एका हिमनगाचे वरचे टोक आहे. जर अस्या मोठ्या व्यक्तीमत्वाच्या  रस्ते अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची यादी करायची झाल्यास ती यापेक्षा अधिक मोठी सहजतेने करता येईल.क्राँग्रेसचे छत्तीसगढ मधील नेते सचिन पायलट सारख्या रस्ते अपघातात मृत्युमुखी न पडलेल्या मात्र जिवनभराचे अपंगत्व आलेल्या व्यक्तींचा विचार करता या यादीत शेकडो नावे समाविष्ट करता येतील. प्राणास मुकल्यामुळे किंवा जीवनभराचे अपंगत्व आल्याने या व्यक्तींचे कार्य एकतर संपले किंवा त्यात प्रचंड सैथल्य आले.त्यामुळे सरतेशेवटी आपल्या भारताच्या प्रगतीच्या वेग मंदावला हे सुर्यप्रकाश्याइतके सत्य आहे, हे कोणीच नाकारु शकणार नाही. जर या व्यक्तींचे कार्य असेच सुरु राहिले असते तर आज भारत अधिक विकसीत नक्कीच झाला असता ,हे १००%खरे आहे. मात्र या महनीय व्यक्तींच्या निधनामुळे हे होवू शकले नाही.
    आपल्या पृथ्वीवर कोणीही अमर नाही, प्रत्येकाला या जगातून एक ना एक दिवस जायचेच आहे, हे निर्विवाद सत्य असले तरी, आपले कार्य अर्धवट सोडून अचानक मोठ्या व्यक्तींच्या जाण्याने समाजाचे फार मोठे नुकसान होते.अनेकांचे आयुष्य त्यांचा निधनाने अपंगत्वाने अडचणीत येते.तसेच ही अडचण काहीच तयारी नसताना येते, एखादी व्यक्ती तरुणपणी  आजारी पडून गेली तर त्या व्यक्तीच्या आजारपणात जवळच्या व्यक्तींनी काहीतरी
व्यवस्था केलेली असते.तसेच ह्रुदयविकाराचा झटक्यासारखे या गोष्टी टाळताच येण्यासारख्या नसतात.रस्ते अपघात सहजतेने टाळता येवू शकतात.आज तंत्रज्ञान तेव्हढे प्रगत आहे. मात्र संपूर्ण गोष्ट तंत्रज्ञानावर सोडून देणे अयोग्य आहे. मानवाने काळजी घेतलीच पाहिजे
      एका संस्थेच्या सहा महिन्यापूर्वी प्रसिद्ध  झालेल्या अहवालानुसार सुमारे 96% अपघात हे मानवी चूकांमुळे होतात, जे टाळता येणे सहज शक्य असतात.नुकत्याच झालेला विनायक मेटे यांच्या अपघात ट्रेलरने लेन कटिंग केल्यामुळे झाला असे आता स्पष्ट होत आहे. तर ज्येष्ठ उद्योजक सायरस मिस्त्री यांनी सिटबेल्ट न लावल्याने त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याचे प्राथमीक तपासातून निष्पण होत आहे. महाराष्ट्रातील भाजपाचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाताच्या वेळी  त्यांनी मागील सिटवर बसल्यावर सिटबेल्ट न लावल्यामुळे अपघाताच्या वेळी त्यांची मान वेगाने समोरच्या सिटवर आदळल्याने त्यांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले होते .हे सर्व  अपघात सहजतेने टाळता येणे सहजशक्य होते.मात्र तसे झाले नाही. आणि आपण महान व्यक्तीमत्तांना गमवून बसलो .या सर्व अपघातामागे मानवी बेपर्वा वृत्ती जसे सिटबेल्ट न लावणे, वाहन चालवताना अमंलात आणावयाच्या नियमांची मोडतोडच जवाबदार आहेत. जर मुंबई पुणे  एक्स्प्रेस वे वर ज्या ट्रेलरमुळे अपघात झाला त्याने लेन कटिंग केली नसती किंवा सायरस मिस्त्री यांनी जर सिटबेल्ट लावला असता तर या व्यक्ती आज आपणा समवेत असत्या , त्यांना फोटोत बघायची वेळ आपणावर आली नसती.
    रात्री होणाऱ्या अपघातामागे काही जण डायव्हरची पुरेसी झोप न झाल्याचे सांगतील, जे माझ्या अनुभवानुसार तितकेसे खरे नाही. मी अनेकदा पुणे ते नाशिक, पुणे ते कोल्हापूर ,पुणे ते सोलापूर, पुणे ते सांगली, पुणे ते अहमदनगर,पुणे ते रत्नागिरी असा प्रवास रात्री बाराच्या सुमारास प्रवाश्यास सुरवात करुन केला आहे. त्या अनुभवानुसार गाडीच्या पाठिमागे लाइट नसणे, त्यामुळे मागची गाडी अत्यंत जवळच आल्यावरच पुढची गाडी दिसणे.किंवा अत्यंत छोट्या रस्त्यावर देखील समोरच्या डायव्हरचे डोळे दिपतील त्याला काही दिसणार नाही
इतक्या प्रखर तीव्रतेचे हेडलाइट लावून गाडी चालवणे अस्या प्रकारामुळे अपघात होतात. मी वर सांगितलेली कारणे या मानवी चूकाच आहेत ना ? हेडलाइट लावताना समोरच्याला त्रास होणार नाही आणि स्वतः ला पण योग्य दिसू शकेल ,ही काळजी घेणे सहजशक्य आहे. मी एकदा मित्राबरोबर श्रीरामपूर येथून संगमनेर मार्गे नाशिकला येत होतो .गाडी संगमनेरजवळील एका पुलावर  होती. आमची दुचाकी आणि एका बाजुने नाशिकला येत होती .समोरुन एक कार संगमनेरहुन श्रीरामपुर कडे साधरणतःताशी 40किमीच्या वेगात जात होती.आमच्याही वेग साधरण तितकाच होता. दोन्ही वाहने त्यांच्या त्यांचा हद्दीत शेवटच्या लेनमधून जात होती.इतक्यात आमच्या मध्ये एक खासगी कंपनीची बस साधरणतः60ते 70किमीच्या वेगाने कार आणि आमच्या मध्ये आली.आता पुलावर ओव्हरटेक करता येत नाही, असा नियम आहे. पण समोर दिसतोय ना मोकळा रस्ता करा ओव्हरटेक. पुल असला काय नसला काय कोण बघतयं असा विचारतयं असा विचारात त्या खासगी कंपनीचा बस डायव्हर बस चालवत होता.आता स्टिअरींग व्हिल आणि
गियरचा सराव झाला की झालो बस डायव्हर अस्या अविर्भावात गाडी चालवणाऱ्या व्यक्तींना कोणतं तंत्रज्ञान साह्य करेल .या अस्या गोष्टीमुळेच असे अपघात होतात असे मला वाटतयं 
 नागरीकशास्त्र हा शाळेतील समाजशास्त्र विषयांतर्गत खुपच कमी महत्त्व देवून आटोपण्याचा विषय नाही. आतापर्यंत आपण असेच केल्याची शिक्षा आता आपण भोगतोय .जेव्हा नागरीकशास्त्राला अत्यंत जास्त महत्त्व आपणाकडून दिले जाईल.नाहीतर आहेच लेखाच्या सुरवातीला सांगितलेल्या नावात अजून एकाची भर ! 
#ही_माझी_एक_हजार_सहासष्ठवी_ब्लॉगपोस्ट आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?