गुजरातमध्ये अवतरल्या पर्यावरण पूरक एसटीबसेस

 

  मराठीतील ज्येष्ठ साहित्यिक विंदा करंदीकर यांच्या कवितेतील एक प्रसिद्ध वाक्य आहे, "देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे".सध्या महाराष्ट्र एसटी सोडून अन्य राज्यातील एसटीने या वाक्यांमध्ये सांगितलेल्या बाबी सत्यात आणल्याचे दिसत आहे. एकेकाळी महाराष्ट्र एसटीची नक्कल इतर राज्यातील करायच्या एका अर्थाने महाराष्ट्र एसटी इतर राज्यांना विविध संकल्पना पुरवायची ,ज्याची नक्कल इतर राज्यातील एसटी महामंडळाकडून करण्यात येत असे.मात्र कालांतराने वर सांगितलेल्या वाक्यातील पुढच्या अर्धा भाग देखील महाराष्ट्र एसटी सोडून अन्य एसटीने प्रत्यक्षात आणला आहे. आज महाराष्ट्र एसटी देशाला नविन संकल्पना देत नाहीये , तर एकेकाळी महाराष्ट्र एसटीची संकल्पनेची नक्कल करणाऱ्या तेलंगणा, गुजरात राज्याच्या एसटी अनेक नाविन्यपूर्ण संकल्पना राबवत आहे. आज सप्टेंबर 2022 मध्ये गुजरातमध्ये जून्या एसटी बसेसच्या इंजिनाचे रूपांतर अत्यंत पर्यावरणपूरक असलेल्या  बिएस 6 इंजिनामध्ये करण्याचा सपाटा लावण्यात आला आहे. गुजरात एसटीच्या सोशल मिडीया अकाउंटवर गेल्यास आज इतक्या जून्या एसटी बसेच्या इंजिनाचे रूपांतर बि एस 6इंजिनात केले गेले.जे काल पेक्षा 20बसेसपेक्षा जास्त आहे, अश्या आशयाच्या पोस्ट दिसत आहेत.या नव्या बसेसला आकर्षक

असी भगवी रंगसंगती देखील करण्यात आली आहे. गुजरात एसटी असे बदल करण्यात मग्न असताना आपली महाराष्ट्र एसटी या बदलापासून कैक किलोमीटर दुर असल्याचे दिसून येत आहे.
    राजाचा रंक होणे म्हणजे काय ?याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणून आपल्या एसटीकडे बघता येइल, असी आपल्या महाराष्ट्र एसटीची अवस्था आहे. तेलंगणा सारखे राज्य आपल्या एसटीकडून देण्यात येते त्यापेक्षा कितीतरी जास्त आरामदायी सेवा पुरवणाऱ्या बसेसमधून सेवा पुरवली जाते.भारतातीलच नव्हे तर आशिया खंडातील सर्वात लांब बस ही कर्नाटक एसटी चालवते.अंबारी या नावाने प्रसिद्ध असलेल्या या बसमध्ये 48 जण झोपून प्रवास करु शकतात.12मीटर लांब असणारी अंबारी सेवा शिर्डी सारख्या आपल्या महाराष्ट्रातील गावापर्यंत पोहोचली आहे.  
    काही दिवसांपूर्वी गुजरात एसटीमध्ये लिक्वीफाईड नँचरल गँसवर चालणाऱ्या बसेस मोठ्या प्रमाणात तयार करण्यात आल्या .मुळ वापरातील बसेसच्या इंजिनामध्ये बदल करत त्यांना एलएनजीवर चालण्यासाठी तयार करण्यात आले.आपल्या एसटीच्या वर्कशाँपची हे साध्य करण्याची क्षमता निश्चित आहे. मात्र आपल्या एसटीच्या वर्कशॉपमध्ये जून्या गाड्यांची बांधणी काढत त्याच चेसीवर नव्याने बांधणी करण्याचेच कार्य प्रामुख्याने केले जाते.या नव्या बांधणी केलेल्या बसेस वजानाने हलक्या आहेत. तसेच अधिक आरामदायी आहेत.माइल्ड स्टीलने बांधलेल्या या बसेस एम एस या नावाने ओळखल्या जातात. विठाई, किंवा लाल पांढरे आडवे पट्टे मारलेल्या साध्या बसेस 
आपण बघतो त्या याच एम एस बसेस असतात. माझ्यामते या जून्या चेसीसवर नव्याने बस बांधणी करण्याबरोबर बसेस अधिक पर्यावरणस्नेही होण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे
.     आज दिल्लीत 10 वर्षापेक्षा जास्त जूनी वाहाने प्रदुषणामुळे चालवता येत नाहीत. पर्यावरणाबाबत सध्या अनेक घडामोडी घडत आहे. देव न करो या घडामोडीत या पुढे बिएस6च्याच बसेसला परवानगी असा नियम लागू न होवो, तसे झाल्यास त्याचा मोठा फटाका आपल्या एसटीला बसेल.त्यामुळे सदर फटका कमी बसण्यासाठी आजपासूनच आपण गुजरात एसटीच्या धर्तीवर बदल केले पाहिजे. आयत्यावेळी हे बदल करता येणे अशक्य आहे. जर हे बदल आपण करु शकलो तर आणि तरच आपल्या एसटीला गतवैभव प्राप्त होईल.नाहीतर आपल्या एसटीची वाटचाल मध्यप्रदेश आणि छत्तीसगड एसटी सारखी होण्यापासून कोणीच रोखू शकणार नाही.  ही स्थिती न येवो यासाठी  प्रयत्न करण्यातच आपले हित आहे.
#ही_माझी_एकहजार_सत्याहत्तर_ब्लॉगपोस्ट_आहे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?