पाकिस्तानच्या राजकारणात लष्कराची उडी

       


   गेल्या काही महिन्यांपासून सुरु असलेल्या पाकिस्तानच्या राजकारणाच्या सत्तानाट्यात  आतापर्यंत तटस्थतेची भूमिका घेणाऱ्या पाकिस्तानी लष्कराची उडी  झाली आहे . पाकिस्तानी लष्कराच्या प्रमुखपदी नेमणूक करण्याच्या अधिकार विद्यमान सरकारला नाही अशा मुद्दा पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे नेते माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी त्यांच्या राजकीय सभेत उपस्थित केल्यानंतर पाकिस्तानी लष्कराचा  या सत्तानाट्यात प्रवेश झाला  विद्यमान पाकिस्तानी सरकार हे गैर मार्गाने सत्तेत आले आहेत विद्यमान सरकारमधील पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांवर भष्ट्राचाराचे आरोप सिद्ध झाले आहेतत्याना न्ययालयाने शिक्षा देखील सुनावली आहे  हे मंत्री जामिनावर बाहेर आहेत त्यामुळे त्यांच्याकडून गुणवत्तेच्या आधारे पाकिस्तानच्या लष्करप्रमुखाची नेमणूक होऊ शकणार नाही . हे मंत्री गुणवत्तेला फाटा देत त्यांना अनुकूल भूमिका घेणाऱ्या व्यक्तीची पाकिस्तानी लष्करप्रमुख म्हणून नेमणूक करतील .पाकिस्तानच्या प्रशासनात लष्करप्रमुखांचे स्थान बघता त्या व्यक्तीवर सुयोग्य व्यक्तीचीच नेमणूक झाली पाहिजे विद्यमान सरकारनसध्याच्या लष्कर प्रमुखांना तात्पुरती मुदतवाढ देऊन  नॅशनल असेम्ब्ली च्या निवडणुका घ्याव्यात .जर त्या निवडणुकीत विद्यमान सरकार निवडून आले तर त्यावेळेस त्यांनी लष्करप्रमूखांची नेमणूक केल्यास आमची काही अडचण नाही अशी भूमिका इम्रान खान यांनी जाहीर केली आहे 

विद्यमान पाकिस्तान लष्करप्रमख कमर जावेद बाजवा हे नोव्हेंबर २०२२मध्ये सेवानिवृत्त होत आहेत त्यांनाच तीन वर्ष मुदतवाढ देण्यात यावी असा मतप्रवाह पाकिस्तानातं आहे मुळात विद्यमान पाकिस्तानी लष्कर प्रमुखांची नेमणूक नोव्हेंबर २०१६ मध्ये तीन वर्षांसाठी झाली होती त्यांना २०१९ मध्ये तीन वर्षांसासाठी मुदतवाढ देण्यात आली होती जी येत्या नोव्हेंबर मध्ये समाप्त होत आहे . पाकिस्तानी संविधानानुसार लष्करप्रमुखाची नेमणूक एका वेळी तीन वर्षापर्यंत करता येते तसेच ते ६४ वर्षापर्यंत लष्करात सेवा देऊ शकतात विद्यमान लष्करप्रमुख ६१ वर्षाचे आहेत या हिशोबाने ते अजून तीन वर्ष सेवा देऊ शकतात . विद्यमान लष्करप्रमुखांना मुदतवाढ माजी पंतप्रधान इम्रान खान यांनी दिली होती 

पाकिस्तानच्या प्रशासनात लष्कराचे एक वेगळे एखादा  राजकीय पक्ष वाटावा असे स्थान आहे . पंतप्रधान आणि इतर  उचचपदस्थ याना असावेत असे वेतनभत्ते पाकिस्तानी लष्करात आहेत तसेच अनेक अधिकार देखील आहेत पाकिस्तानची गुप्तचर संघटना पाकिस्तानी लष्कराला उत्तरदायित्व आहे  पाकिस्तात्नी गुप्तचर यंत्रणेच्या प्रमुखाची नेमणूक  पाकिस्तानी पंतप्रधान लष्करपृखांच्या मान्यतेशिवाय करू शकत नाही . या उलट भारतीय लष्करात वेतन कमी आहे अधिकार देखील कमी आहेत भारताची गुप्तचर यंत्रणा RAW ही गृहविभागाला उत्तदायी आहे तिचा प्रमुख नेमताना लष्कराची काहीही भूमिका नसते परिणामी एकेकाळी एकाच देशाचे भाग असून एकाचवेळी स्वातंत्र्य मिळून दोन्ही देश लोकशाहीच्या बाबत वेगळ्या पातळीवर  आहेत 

पाकिस्तानी लष्कराचे सैन्याशीं काहीही संबंध नसणारे कितीतरी उद्योग आहेत जसे कपड्याची खाद्यपदार्थ तयार करण्याचे कारखाने वैगेरे . तसेच गेल्या ७५ वर्षांपैकी सुमारे  ३८ वर्षे देशात लष्करी राजवट होती  अश्या   संस्थेच्या प्रमुख त्यामुळे  अत्यंत महत्वाचा ठरतो . हा लेख लिहण्यापर्यंत या बाबत पाकिस्तानी लष्करकडून काहीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही नाहीं  मात्र ती येणार हे नक्की ती कशी येते यावरच पाकिस्तानचे भवितव्य अवलूंबून आहे तेव्हा येणारे काही   दिवस  पाकिस्तानसाठी रात्र वैऱ्याची आहे  हेच सिद्ध करणारे आहेत हे   नक्की  

#ही_माझी_एकहजार_आठ्याहत्तर_ब्लॉगपोस्ट_आहे


  

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?