धनत्रयोदशी विशेष


बाल गोपाळ अबाल वृद्ध ज्या सणाची आतुरतेने वाट बघत असतात , ज्याच्या बाबतीत दिवाळी सण मोठा , नाही आनंदाला तोटा ,असे म्हटले जाते , त्या दिवाळीचा आज पहिला दिवस अर्थात धनत्रयोदशी . त्या निमित्ताने सर्वांना मनापासून शुभेच्छा.

आजच्या दिवशी वैद्यकशास्त्राची देवता असलेल्या धन्वंतरीची पुजा करुन आपल्या चांगल्या आरोग्याची मनोकामना केली जाते. धन्वंतरीकडे ,दिर्घायूसाठी प्रार्थना केली जाते .काही समाज घटकात आज धनाची देवता असणाऱ्या कुबेराचे पुजन केले जाते.

 दिवसामागे काही दंतकथा सांगितल्या जातात त्यौेकी एक म्हणजे

 या दिवशी कथित भविष्यवाणीनुसार हेमा राजाचा पुत्र आपल्या सोळाव्या वर्षी मुत्यूमुखी पडणार होता. आपल्या मुलाने जीवनातील सर्व सुख उपभोगावे म्हणून राजा, राणी त्यांचे लग्न करून देतात. लग्नानंतर चौथा दिवस त्यांचा मुत्यूमुखी पडण्याचा दिवस असतो. या दिवशी रात्रभर त्यांची पत्नी त्याला झोपू देत नाही. तसेच त्यांच्या अवतीभोवती सोन्या-चांदीच्या मोहरा ठेवते. सर्व महालात लखलखीत प्रकाश केला जातो. त्यावेळी यमराज त्याच्या खोलीत सर्प रूपाने प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो. मात्र सोने-चांदी, मोहरांनी त्यांचे डोळे दिपून जाऊन तो माघारी फिरतो आणि राजाच्या मुलांला जीवदान मिळते. म्हणून या दिवसाला यमदीपदान असे म्हटले जाते. या दिवशी घराबाहेर दिवा लावून वातीचे टोक दक्षिण दिशेस केले जाते. त्यामुळे घरात येणारा अपमृत्यू टळतो, अशी धार्मिक धारणा आहे .पुन्हा एकदा आपण सर्वांना धनत्रयोदशी च्या आणि दिवाळीच्या मनःपूर्वक शुभेच्छा देऊन सध्यापुरते थांबतो नमस्कार


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?