पुण्यातील घटनेचे अन्वीयार्थ

     

     पुण्यात बेमोसमी पावसाने रस्त्यांना नद्याचे स्वरुप आल्याचे आपण सर्वांनी बघीतले . यावर विविध माध्यमातून पुण्यात झालेल्या अनिर्बंधपणे झालेल्या नागरीकरणास जवाबदार धरण्यात आले. पुण्याप्रमाणे अन्य शहरे देखील अनिर्बंध नागरीकरणाची बळी ठरली असल्याचे यावेळी सांगण्यात आले हे सर्व घडत होते जगाला नागरीकरणाची काहीही माहिती नसताना युरोप खंडातील लोक जवळपास अर्धनग्न अवस्थेत फिरत असतांना सध्याच्या युरोप खंडातील देशांना  अमेरिका देशाला लाजवेल अश्या प्रकारचे नगर नियोजन करणाऱ्या देशात.  आजपासून किमान  साडेतीन हजार वर्षांपूर्वी  ज्या देशात सुनियोजित शहरे  होती , ज्यामध्ये सांडपाणी वाहून जाण्यासाठी स्वतंत्र्य व्यवस्था होती दळणवणासाठी पुरेसे रुंद आणि पक्के बांधकाम होती रस्ते होते . सार्वजनिक स्नानगृहे होती अन्न साठवायला पक्क्या विटांनी बांधलेली कोठारे होती त्या देशात साडेतीन ते चार हजार वर्षात जगाला आदर्शवत अनुकरणीय वाटेल अश्या सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणापासून जगात आपले हसे होईल अश्या बकाल शहरीकरणापर्यंत आपण केलेला प्रवास पुण्यात आपणाला त्यावेळी दिसला 
    सध्या अत्यंत कमी वेळेत मोठ्या प्रमाणत पाऊस पडत आहे हे मान्य केले तरी . या बदलापुढे आपल्या यंत्रणा लगेच हात टेकतात हे जगाला सुनियोजीत नागरीकरण शिकवणाऱ्या आपल्या देशाला निश्चितच भूषणावह नाही आपल्या प्राचीन साहित्यात विमाने , टीव्ही , प्लँस्टीक सर्जरीचे तंत्र अस्तित्वात असल्याचे दावे अनेकदा करण्यात येतात . या दाव्याच्या सत्यतेबाबत अनेक प्रतिदावे देखील करण्यात येतात त्यामुळे असे तंज्ञान खरेच अस्तित्वात होते का हे समजत नाही  . मात्र सिंधू संस्कृतीत उत्कृष्ट शहारनियोजन होते याबाबत कोणीही शंका उपस्थित करत नाही एकेकाळी जगाला सुनियोजित नागरीकरणाविषयी सांगणाऱ्या आपल्या देशात असे काय झाले की काहिस्या जास्त पावसाने आपली शहरे मान टाकू लागली . मध्यपूर्वेतून आलेल्या आक्रमकांनी आणि ब्रिटिशांनी केलेल्या लुटीमुळे आपले ते ज्ञान लयास गेले असले तर ज्याप्रमाणे जगात अन्याय करणाऱ्या पेक्षा अन्याय सहन करणारा अधिक दोषी असतो त्याप्रमाणे या ऱ्हासास आपणच जवाबदार आहोत मध्यपूर्वेत जाण्यासाठी आजच्या आधुनिक दळणवलांच्या काळातील सर्वात आधुनिक अश्या विमानाने  जाण्यास देखील सुमारे दोन तास लागतात तेथून येऊन येऊन किती आक्रमक येणार ? त्यामुळे त्यांनी ज्ञान जाळले याला काहीही अर्थ नाही असे मला वाटते आपण सिंधू संस्कृतीच्या उत्तम नागरीकरणपासून दूर का गेलो ? याचा विचार देखील पुण्यात आपणास अनुभवयाला आलेली  आपत्ती पुन्हा अनुभवयास लागू नये म्हणून करावयाच्या उपाययोजनमध्ये केल्यास ऊत्तम 
       सिंधू संस्कृतीच्या ऱ्हासाची जी अनेक कारणे सांगितली जातात त्यातील एक प्रमुख कारण म्हणजे हवामान बदल हे आहे .सध्या आपण हवामानबदलाचा अनुभव घेतच आहोत त्यामुळे बदलेल्या हवामानामुळे काय होऊ शकते  याचे अत्यंत ठळक उदाहरण आपल्याकडे असल्याने  सिंधू संस्कृतीच्या नागरीकरणात काही त्रुटी होत्या का ? ज्यामुळे त्यांच्या ऱ्हास झाला हे सुद्धा आपणस समजेल त्या चुका आपणस पुढील नियोजनात टाळता येऊ 
शकतात का ?यावर देखील आपणांस काम करता येईल सध्या ज्यास छदमं विज्ञान म्हणून हिणवण्यात येते अश्या गोष्टींवर बऱ्याच मोठ्या प्रमाणात संशोधन करण्यात येते तो निधी याकडे वाळवल्यास आपणस हे सहजतेने करता येऊ शकते 
पुण्यातील आपत्तीने आपणास इतिहासाकडे बघायचा दिलेल्या या नव्या दृष्टिकोनाने आपले खरोखर भले होणार आहे आहे हे १०० टक्के खरे आहे . या अभ्यासातून आपले अनेक नागरी प्रश्न देखील सुटू शकतात गरज आहे तो इतिहास अअभ्यासाची 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?