पाकिस्तानातील राजकीय भूकंप

   

      इम्रान खान हे कधी सरकारविरोधी आंदोलनांची हाक  देतात याकडे समस्त पाकिस्तानी जनता  डोळ्यात तेल घालून लक्ष देत असताना , इम्रान खान यांनी मी ऑक्टोबर महिन्यातच आंदोलन सुरु करेल असे जाहीर केले असताना शुक्रवार २१ ऑक्टोबर रोजी  एका नाट्यमय घडामोडीत पाकिस्तानी निवडणूक आयोगातर्फे , इम्रान खान याना ५  वर्षासाठी राजकीय पद  भूषवण्यास  मनाई करणारा निर्णय जाहीर करण्यात आला . पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६३ च्या उपकलम ३ नुसार पंतप्रधानपदी असतांना देशाला मिळालेल्या भेटवस्तूंची परस्पर विक्री केल्यामुळे देशहिताला काहीशी बाधा उत्पन्न झाली या आरोपाखाली त्यांच्यावर हि कार्यवाही करण्यात आली .या निर्णयामुळे पाकिस्तानी सत्ताधिकारी वर्गाला काहीसी सुखावणारी स्थिती उत्पन्न झाल्याची बातमी या संदर्भात वार्तांकन करताना अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिले आहे पाकिस्तानी निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे पाकिस्तानात विविध शहरात लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे      
   पाकिस्तानी निवडणूक आयोगाचे अध्यक्ष सिकंदर सुलतान राजा यांच्या अध्यक्षतेखाली स्थापित चार सदस्यीय आयोगाने एकमताने हा निकाल दिला . पाकिस्तानी निवडणूक कायदा २०१७ च्या कलम १३७ , १६७ , आणि १७३ चे इम्रान खान यांच्याकडून उल्लंघन झाल्याने त्याच्यावर आम्हला हि कार्यवाही करावी लागली असे निवडणूक
आयोगाने आदेश देताना सांगितले आहे  पाकिस्तानी सर्वोच्च न्यायालायने फेब्रुवारी २०१८ मध्ये दिलेल्या एका निकालानुसार पाकिस्तानी संविधानाच्या कलम ६२ आणि ६३ नुसार दोषी झालेल्या व्यक्तीला राजकीय पक्षाचे अध्यक्षपद धारण करता येत नाही हा निकाल जाहीर करण्यापर्यंत इम्रान खान हे त्यांनी २० वर्षांपूर्वी स्थाहपण केलेल्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाचे अध्यक्ष आहेत मात्र या निकालामुळे त्यांना आता पक्षाचे अध्यक्ष म्हणून उभे राहता येणार नसल्याने , आणि १६ ऑक्टोबर रोजी झालेल्या पाकिस्तानच्या आपल्या लोकसभा संख्या सदनाच्या अर्थात नॅशनल असेम्ब्लीच्या ८ जगासाठी झालेल्या पोट  निवडणुकीत ६ जागांवर विजय मिळवून सुद्धा त्या जागेचे प्रतिनिधित्व करता येणार नाहीये इम्रान खान हे विरोधी पक्षाचे महत्त्वाचे नेते असल्याने पाकिस्तानात मोठा राजकीय भूकंप झाल्यासारखी स्थिती आहे 
   पाकिस्तानी तेहरीके इन्साफ या पक्षातर्फे निवडणूक आयोगाला न्यायदानाचे अधिकार नसल्याने आम्ही हा निर्णय मान्य करणार नसल्याचे आणि या निकलाविरोधात इस्लामाबाद उच्च न्यायलायत दाद मागणार असल्याचे जाहीर केले आहे पाकिस्तानी  पंजाब विधानसभेच्या निवडणुकीत तसेच विविध राजकीय सभांच्या वेळी इम्रान खान यांना मिळणाऱ्या अभुतपुर्व पाठिंबा आणि नुकत्याच झालेल्या नँशनल अस्मेब्ली ( भारताच्या लोकसभा सदृश्य) मध्ये मिळालेल्या यशामुळे सत्ताधिकाऱ्याचा संयम सुटला आहे. त्यामुळे त्यांनी दबाव तंत्राचा वापर करत, हातातील पोपट झालेल्या निवडणूक आयोगामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे, असा आरोप पाकिस्तान तेहरीके इंसाफ पक्षातर्फे करण्या आला आहे. 
पाकिस्तानमध्ये सध्या केंद्रीय पातळीवर सत्तेत असलेल्या पाकिस्तान डेमोक्रॅटिक मुव्हमेटमार्फत या वर्षाच्या आँगस्ट महिन्यात इम्रान खान यांच्या विरोधात पाकिस्तानी निवडणूक आयोगात तक्रार दाखल करण्यात आली होती.त्याचा निकाल  पाकिस्तानी निवडणूक आयोगामार्फत शुक्रवार 21 आँक्टोबर रोजी  देण्यात आला . त्यामुळे सध्या पाकिस्तानात राजकीय सत्तेचा विचार करता भुकंप झाल्यासारखी स्थिती आहे. भारताचा विचार करता ही घटनाभारतासाठी एकाचवेळी खुप चांगली आणि खुप वाइट असी एकमेकांच्या परस्पर विरोधी आहे. पाकिस्तानी सत्ताधिकारी वर्गामध्ये इम्रान खान इतर राजकारण्यापेक्षा जास्त भारतविरोधी समजले जातात.त्यामुळे पाकिस्तानच्या राजकरणातून त्यांचा पत्ता कट होणे भारतासाठी अत्यंत चांगले आहेत. मात्र इम्रान खान यांच्या पत्ता कट होताना झालेल्या राजकीय उलथापालथीमुळे पाकिस्तानात राजकीय अस्थिरता निर्माण होण्याचा मोठा धोका उत्पन होतोय .या धोक्यामुळे पाकिस्तानात लष्करी उठाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या आधी
पाकिस्तानात जेव्हा जेव्हा लष्करी उठाव झाले आहेत, तेव्हा भारत आणि पाकिस्तानातील राजनैतिक सबंध न्युनतमच्या न्युनतम जवळपास शुन्यवत पातळीवर आल्याचा, आणि काश्मीरमध्ये दहशतवादाच्या कारवाया वाढल्याचा  इतिहास आहे. भारत सध्या मध्य आशियाई देशांसी मोठ्या प्रमाणात व्यापार करतो जो इराण अफगाणिस्तान या लांबच्या मार्गाने होतो.जो पाकिस्तान मार्गे झाल्यास भारताला चांगले आहे. त्यामुळे भारत आणि पाकिस्तान मधील राजनैतिक सबंध किमान पातळीवर राहणे आवश्यक आहे. त्यामध्ये वाइट बदल होत असल्याने ही घटना भारतासाठी वाइट देखील आहे. ही घटना भारतासाठी वरदान ठरते की शाप ठरते यावरच या घटनेचे विश्लेषण करणे भारतासाठी उत्तम आहे.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?