शतरंज के हम सिकंदर हमसे आगे ना कोई !

   


    यहाके हम सिकंदर हमसे  ना आगे कोई ! असे एका हिंदी चित्रपटातील गाण्याचे बोल आहेत . जगात  आम्हीच सर्वश्रेष्ठ आहोत . हे जगाला दाखवूंन देण्याच्या पार्श्वभूमीवरचे हे गाणे भारतीय युवा बुद्धिबळपटूंनी  २२ ऑक्टोबर रोजी प्रत्यक्षात आणून दिवाळी सण सुरु होण्याच्या आधीच दिवाळी सण साजरा केला आहे , इंडोनेशिया देशातील बाली या शहरात झालेल्या आशियाई युवा बुद्धिबळ विजेतेपद स्पर्धेत विविध प्रकारात मिळून २७ वैयक्तिक आणि १९ सांघिक पदके भारतीय बुद्धिबळपटूंनी मिळवली आहेत या स्पर्धेत एकूण १०८ वैयक्तिक पदके देण्यात आली त्यापैकी अचूक २५ % पदके भारतीय खेळाडूंनी मिळवली हे विशेष  . वैयक्तिक पदकांमध्ये १३ पदके ही सुवर्ण, ६ रौप्य ,आणि ८ कांस्य पदके आहेत .  भारताला सांघिक प्रकारात ८ सुवर्ण , ७ रौप्य , आणि ६ कांस्य पदके मिळाली विविध वयोगटात झालेल्या या स्पर्धेत काही गटात भारताला संघ होण्यसासाठी पुरेसे खेळाडूं नसताना भारतीय खेळाडूंनी हा भीम पराक्रम केला आहे त्याबद्दल भारतीय युवा बुद्धिबळ खेळाडूंचे कौतुक करावे तितके कमीच 

         भारताने मिळवेललेल्या ४६ पदकांपैकी १० पदके हि कलासिकल  या प्रकारच्या खेळातील आहेत या १० पदकांसह भारताने या स्पर्धेत सर्वसाधारण गटात दुसरा क्रमांक मिळवला तर भारतापॆक्षा फक्त एका पदक जास्त मिळवत व्हिएतनाम पहिल्या क्रमांकावर राहिले .  व्हिएतनामने ११ पदके मिळवली . या स्पर्धेत सर्वांचे आकर्षण ठरला भारतातर्फे १० वर्षाखालील खुल्या गटात प्रतिनिधित्व करणारा खेळाडू माधवेंद्र प्रताप शर्मा . माधवेंद्र प्रताप






शर्मा यांनी बुद्धिबळाच्या क्लासिकल , रॅपिड आणि ब्लिट्झ या तिन्ही प्रकारात सुवर्णपदक मिळवले ,  माधवेंद्र प्रताप शर्मा हे त्यांनी स्पर्धेत खेळलेल्या सर्वांच्या सर्व २३ डावात अपराजित राहिले . माधवेंद्र प्रताप शर्मा यांनी  वैयक्तिक आणि सांघिक अशा एकूण सहा सुवर्णपदके जिंकली, क्लासिकल, रॅपिड आणि ब्लिट्झ या तीन फॉरमॅटमध्ये प्रत्येकी एक.एक सुअवर्णपदक त्यांनी मिळवले / चार्वी यांनी  पाच सुवर्ण आणि एक रौप्य,तर भाग्यश्री यांनी  तीन सुवर्ण तसेच  इथनयांनी  दोन सुवर्ण, दोन रौप्य आणि एक कांस्यपदक इतक्या पदांची कमाई करत भारत बुद्धिबळातील महासत्ता असल्याचे पुन्हा एका सिद्ध केले . 

जसा क्रिकेट हा खेळ टेस्ट वनडे आणि टी २० या तीन प्रकारात खेळाला जातो त्याचप्रमाणे स्पर्धात्मक बुद्धिबळ सुद्धा क्लासिकल रॅपिड ब्लिट्झ या तीन प्रकारात खेळाला जातो या तिन्ही प्रकारात खेळाडूंना खेळायला मिळणाऱ्या एकूण वेळात फरक असतो . बिल्ट्झ प्रकारात प्रत्येक खेळाडूंला सर्वसाधारणपणे १० मिनिटे दिली जातात हि  वेळ

एकमेकांना जोडलेल्या २  स्टॉपवॉचने मोजली जाते  एका खेळाडूला एक स्टॉपवॉच दिलेली असते त्याने खिल्ली केल्यानंतर घडल्याची कि दाबल्यावर त्याचे घड्याळ बंद पडते आणि दुसऱ्याचे सुरु होते डाव अर्धवट राहिल्यास सर्वप्रथम ज्या खेळाडूची वेळ संपते तो खेळाडू डाव हरतो . रॅपिड आणि मध्ये सर्वसाधारणपणे पाऊण ते एक तास खेळाडूंना देण्यात येतो तर क्लासिक्लमध्ये हा वेळ सुमारे दीड तास असतो बाकी सर्व नियम सर्व प्रकारांना सामनाच असतात . भारताने या तिन्ही प्रकारात अत्यंत अभिनदंनस्पद कामगिरी केली आहे या स्पर्धा ८ वर्षाखालील , १० वर्षाखालील , १२ वर्षाखालील १४ वर्षांखालील . १६ वर्षाखालील आणि १८ वर्षाखालील महिला गट आणि खुला गट या प्रकारे बुद्धिबळाच्या तिन्ही प्रकरारात खेळवण्यात आल्या . भारताने या सर्व प्रकारात अत्यंत उत्तम कामगिरी केली आहे 

भारत हा बुद्धिबळातील महसता म्हणून ओळखला जातो , गेल्या काही वर्षांपासून भारतीय बुद्धिबळपटू अत्यंत चमकदार कामगिरी  करत आहेत मात्र सी फॉर क्रिकेट असे समजणाऱ्या काही लोंकांमुळे त्यांना पुरेशी प्रसिद्धी मिळत नाहीये . आपण सी फॉर क्रिकेट समजल्यामुळे अजूनही वसाहतवादाचे ओझे बाळगून आहोत हेच त्यांच्या लक्षात येत नाही जेव्हा आपण सी फॉर चेस असे म्हणू तेव्हाच आपण खऱ्या अर्हताःने ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ हेच खरे 







टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?