भवताल एक अत्यंत वाचणीय दिवाळी अंक

     

        आपल्या महाराष्ट्राला दिवाळी अंकाची शतकौत्तर वर्षाची परंपरा आहे. अनेक विषयांवरचे दिवाळी अंक महाराष्ट्रात प्रसिद्ध होतात. जे एखाद दुसरा अपवाद वगळता अत्यंत वाचणीय असतात. आपल्या महाराष्ट्रीयन माणसाची दिवाळी एक वेळ चकली, अनारसे अस्या खाद्य पदार्थाशिवाय साजरी होवू शकते, मात्र दिवाळी अंकाशिवाय होणे अशक्यच असे बोलले जाते .तर अस्या गौरवशाली परंपरेचा भाग होण्यासाठी मी नुकताच भवताल हा दिवाळी अंक वाचला तो कसा वाटला , हे सांगण्यासाठी आजचे लेखन
         तर मित्रांनो, पर्यावरण या विषयासाठी वाहिलेल्या भवताल या दिवाळी अंकाचे हे सलग ८वे वर्षे ,या आधी भुजल, सुक्ष्मजीव, परंपरागत जलव्यवस्था, पाउस,खडक देवराई ,अधिवास या विषयांवर भवतालकडून विशेषांक काढण्यात आले आहे. या वर्षी त्यांनी सडे पठार या विषयांवर आपला दिवाळी अंक काढला आहे. आपल्याकडे पश्चिम घाटात आणि जगभरात विविध ठिकाणी जिथे पश्चिम घाटासारखी स्थिती आहे. तिथे डोंगर दऱ्यात, घाटमाथ्यावर पठारी प्रदेश आढळतो. आपल्याकडे त्यास सडे पठार म्हणतात.   लोकसत्ताचे माजी वरीष्ठ उपसंपादक पर्यावरणीय.पत्रकारीता करणारे अभिजीत घोरपडे, यांच्या संपादकीय मार्गदर्शनाखाली तयार झालेला अंक नेहमीप्रमाणे माहितीपूर्ण झाला आहे. .१४४ पानाच्या या अंकात फक्त एकच जाहिरात आहे अन्य दिवाळी 
अंकात अनेक जाहिरात असताना या अंकात फक्त एकच जाहिरात आहे अनेकदा जाहिरातीमुळे दिवाळी अंक वाचताना सलगता राहत नाही  या उलट या दिवाळी अंकात जाहिरात नसल्याने अंक वाचायला सुरवात केल्यावर कधी वाचून संपतो हे समजत नाही भवताल दिवाळी अंकात मात्र सड्याची अनेक छायाचित्रे आहेत ज्यामुळे अंक  अत्यंत वाचनीय झाला आहे सतत जर मजकूर वाचत बसला तर काहीसे थकायला होते वाचनाचा उत्साह कमी होतो मात्र लेखात चित्र असेल तर वाचन काहीसे सुलभ होते . याचा अत्यंत योग्य पद्धतीने वापर अंकात केला आहे अंकातील साराच पाने निसर्गात आढळणाऱ्या रंगसंगतीतलं आहेत त्यामुळे अंक अत्यंत आकर्षक झाला आहे  
           भवताल आपले लक्ष वेधून घेतो, ते त्याचा मुखपुष्ठापासुन। सातारा या शहरातील रहिवासी असलेल्या गणेश ढाणे यांनी टिपलेल्या सरड्याचे छायाचित्र मुखपुष्ठावर आहे. जे आपणास अंक हातात घेण्यापासून रोखू शकत नाही. सरड्याची त्रीमितीय प्रतीमा अत्यंत उत्तम आली आहे. सरड्याचा त्वचेचे रंग यात अत्यंत अचूक रीत्या टिपलेले आहेत. दिवाळी अंक अद्भुत ,पार्श्वभूमी, अनोखे विश्व, स्थित्यंतर, काही सडे पठार, आणि शिकवण संवर्धन दृष्टी  अस्या सहा विभागात विभागला आहे. अद्भुत या भागात सडे पठारावरील वनस्पती आणि प्राणी यांची दुनिया किती
वैशिष्ट्यपुर्ण असते. अनेक प्राणी, वनस्पती  या ठिकाणी कसे उत्क्रांत होतात ,हे सांगितले आहे. पार्श्वभूमी या भागात सडे पठारांची निर्मिती कसी झाली?मानव या सड्यांवर कधीपासून रहात आहे, याचा आढावा घेण्यात आला आहे. अनोखे विश्व या भागात तेथील प्राणी कस्या पद्धतीने जगतात? ते त्यांची पाण्याची गरज कसी भागवतात?  त्या ठिकाणी प्राणीजीवनाची विविधता कसी आहे?याबाबत माहिती देण्यात आली आहे.स्थितंतर या भागात पावसाळा, हिवाळा आणि उन्हाळा या विविध ऋतूत सड्यावरचे जीवन कसे बदलते? यावर प्रकाश टाकलेला आहे. काही सडे पठारे यात महाराष्ट्रातील काही सडे पठारांची ओळख करून देण्यात आली आहे शिकवण संवर्धन दृष्टी या भागात सडे पठारांचे संवर्धन करणे का गरजेचे आहे, ते कस्या पद्धतीने करता येईल याबाबत सांगण्यात आले आहे.
          मी ज्या ठिकणी राहतो त्या  नाशिकच्या सभोवताली असणाऱ्या चांदवड डोंगररांग आणि अंजनेरी परिसर जैविकदृष्या किती श्रीमंत आहे तसेच कोकणात आणि गोव्यात फक्त समुद्रकिनारेच प्रेक्षणीय स्थळे आहेत  असे नव्हे तर अनेक सडे सुद्धा निसर्गाची उधळण केल्यामुळे पर्यटनस्थळे आहेत याची माहिती मला या दिवाळी अंकातून येते तसेच हिवाळा आणि उन्हाळ्यात आपल्या रुक्ष डोळ्यांना काहीसा त्रास होईल अस्या  स्थितीत असणारे सडे पावसाळयाच्या दिवसात कितीतरी  नेत्रसुख देत निसर्गाची उधळण करत असतात याची माहिती सुद्धा आपणास या अंकातून मिळते . आपले लहानसे आयुष्य देखील तेथील छोट्याशा वनस्पती किती सहजतेने जगतात . पावसाळा संपल्यानंतर नष्ट झाल्यावर  दुसऱ्या वर्षी पावसाळ्यात पुन्हा उगवून  पुन्हा निसर्गाचे देणे आपल्याला देतात .मानवाने देखील असेच आयुष्य जगायला हवे असा काहीसा जीवनविषयक दृष्टिकोन देखील आपणास या अंकातून पानास मिळतो भवताल या दिवाळी अंकामुळे माझी दिवाळी मात्र ज्ञानवर्धक झाली आपण देखील दुर्घटनेसे देर  भरी या हिंदी वाक्यप्रचारानुसार उशिरा का होईना आपण हा अनेक नक्की वाचा 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?