जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर ?

     

 जग तिसऱ्या महायुद्धाच्या उंबरठ्यावर  तर नाही ना ? अशा प्रश्न उपस्थित व्हावाअशी घडामोड १६  नोव्हेंबर रोजी जागतिक प्रमाण वेळेनुसार सकाळी सहाच्या सुमारास,   युक्रेन पोलंड सीमारेषेपासून सहा किलोमीटर दूर असणाऱ्या एका पोलंडच्या खेडेगावात घडली . बीबीसीने सर्वप्रथम दिलेल्या बातमीनुसार रशियन  एक क्षेपणास्त्र  तर स्थानिक प्रमाणवेनुसार पहाटे पावणेचारच्या सुमारास पोलंड आणि युक्रेन या सीमेपासून सहा किलोमीटर अंतरावर अंतर पोलंडचा हद्दीत कोसळले ज्यामध्ये दोन जणांचा मृत्यू झाला तर तीन जण जखमी झाले  या हल्ल्याचे वृत्त समजताच इंडोनेशयातील बाली शहरात सुरु असलेल्या जी २० चे १७ वे अधिवेशन तात्कळ थांबवून अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांच्या अध्यक्षतेखाली जी आणि नाटो राष्टांची बैठक झाली या बैठकांमधून आपणास  जागतिक स्तरावर या घटनेचे किती गंभीर प्रतिसाद उमटले आहेत हे समजून येते या बैठकीच्या वेळी रशियाचे अध्यक्ष ब्लडमिर पुतीन उपस्थित होते जी २० या परिषदेला उपस्थित असणारे रशियाचे सरंक्षण मंत्री हे देखील अत्यंत घाईघाईने बाली शहरातून मास्कोसासाठी निघून गेल्याने वातवरण अत्यंत तणावग्रस्त झाले युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी युद्धाला चिघळवणारी घटना असे म्हणत या घटनेचा निषेध केल्यामुळे गोंधळात आणखी भर पडली.
   मात्र कालांतराने बीबीसीने  दिलेल्या  बातमीनुसार सदर क्षेपणास्त्र रशियाचे नसून युक्रेनचे क्षेपणास्त्रविरोधी  रॉकेट असण्याची दाट शक्यता असून ते काही चुकीमुळे डागले  गेले असावे   मात्र अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडेन यांनी रशियाकडून क्षेपणास्त्र हेतुत: डागण्यात आल्याची शक्यता कमी असल्याचे जाहीर केले. त्यानंतर पोलंडनेही रशियाचा हल्ला नसल्याचा निर्वाळा दिला. प्राथमिक तपासणीनुसार पोलंडमध्ये कोसळलेले क्षेपणास्त्र हे युक्रेनच्या क्षेपणास्त्रविरोधी यंत्रणेतील असावे, अशी शक्यता अमेरिकन अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यानंतर क्षेपणास्त्राचा स्फोट पूर्वनियोजित हल्ला असल्याचे कोणतेही संकेत नसल्याचे पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज डुडा यांनीही जाहीर केले. त्यामुळे या घटनेतील तणाव काहीसा निवळला     
   पोलंड हाअमेरिकेच्या नेर्तृत्वाखालील लष्करी संघटना नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनझेशगनचा  (संक्षिप्त स्वरूप नाटो ) सदस्य देश आहे या संघटनेचा तत्वानुसार एखाद्या सदस्य राष्ट्रावरील हल्ला हा सर्व सदस्य राष्टांवर केलेला हल्ला समजण्यात येतो त्यामुळे रशियाने जाणून बुजून हा हल्ला केला असल्याचे स्पष्ट झाले असले तर अमेरिकेला देखील त्यास प्रत्युत्तर देणे आवश्यक ठरले असते त्यामुळे जग तिसऱ्या महायुद्धाचा खाईत लोटले जाण्याचा धोका उत्पन्न झाला असता जो आपल्या सुदैवाने टाळला आहे
      जग मिसाईल सदृश्य गोष्टींमुळे तिसऱ्या महायुद्धाच्या छायेत जाण्याची हि दुसरी वेळ या आधी रशियाच्या सैबेरिया या भागातून अलास्का या अमेरिकेच्या भागात जाणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमुळे रशियाने अमेरिकेवर क्षेपणास्त्र डगल्याचा गैरसमज अमेरिकी लष्करी अधिकाऱ्यांचा होऊन ती क्षेपणास्त्र अमेरिकेवर आदळण्याच्या आधीच अमेरिकेच्या क्षेपणास्त्र विरोधी रॉकेटद्वारा हवेतच नष्ट करण्याची योजनेस अमेरिन लष्करी अधिकारी अंतिम स्वरूप देत असताना ती क्षेपणास्त्र नसून पक्षी असल्याचे स्पष्ट पुढील अनर्थ टाळला
      पोलंड या देशाने काही दिवसापूर्वी रशिया आणि युक्रेन या युद्धाबाबत रशियाचा विरोधात वक्तव्य केल्याने पोलंड आणि रशियाचे संबंध काहीसे ताणले गेले होते काही कारणांमुळे  रशियाने या आधी जिंकलेल्या युक्रेनच्या  भागातून काहीशी माघार घेतल्याने रशिया युक्रेनवर आणि त्यास समर्थन देणाऱ्या देशांविरोधात जोरदार लष्करी कारवाई करेल असा जगाचा अंदाज होता त्यामुळे या हल्ल्याबाबत रशियावर प्रथमतः खापर फोडले गेले मात्र सत्य परिस्थिती समजल्याने जग तिसऱ्या महायुध्दापासून अत्यत थोडक्यात बचावले आहे मात्र धोका अजून टाळलेला नाही अजूनही आपल्या सर्वांवर तिसऱ्या महायुद्धाची टांगती तलवार आहेच


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?