पाकिस्तानात सध्या चाललंय तरी काय ?

 


पाकिस्तानात सध्या चाललंय तरी काय ? अस  प्रश्न उपस्थित व्हावा . अश्या घडामोडी सध्या पाकिस्तानात घडत आहेत . पाकिस्तानचे नवनियुक्त लष्करप्रमुख असिफ मुनीर हे पदाची सूत्रे हाती घेऊन २४ तास होत नाही तोच पाकिस्तातनने दहशतवादी संघटना म्हणून  जाहीर केलेल्या तेहरीके तालिबाबान पाकिस्तान या संघटनेकडून  शस्त्रबंदी मागे घेत असल्याचेआणि यापुढे सर्व पाकिस्तानात दहशतवादी हल्ले करणार असल्याचे जाहीर करण्यात आले ते नुसते जाहीर करून थांबले नाहीत तर पुढच्याच दिवशी पाकिस्तानमधील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जवळपास देशाच्या क्षेत्रफळाच्या ५० % क्षेत्रफळ असलेल्या बलुचिस्थान प्रांताची राजधानी असलेल्या क्वेटा शहरात एका बॉम्बस्फोट देखील केला ज्यामध्ये एका पोलिसासह एकूण ४ जणांना प्राणास मुकावे लागले . बॉम्बस्फोटात  मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची संख्या कमी असली तरी नवीन लष्करप्रमुखांच्या पुढे कोणते आव्हान आहे ? याची हि चुणूकच म्हणावी लागेल . पाकिस्तानातील लष्कराची तेथील राजकारणावर आणि प्रशासनावर मोठी पकड आहे पाकिस्तानी लष्कराच्या संमतीशिवाय तिथे कोणताही पंतप्रधान राज्य करू शकत नाही हे बघता पाकिस्तानी लष्कराला असे आव्हान देणे किती मोठी गोष्ट आहे हे समजते . 

     तेहरीके तालिबाबान पाकिस्तान  हि अफगाणिस्तानमधील तालिबानची पाकिस्तानमधील आवृत्ती आहे  संपूर्ण पाकिस्तानात शरिया लागू करण्यात यावा . पाकिस्तानचा संपूर्ण कारभार इस्लामी पद्धतीने चालवण्यात यावा अशी त्यांची प्रमुख मागणी आहे . आपली मागणी पूर्ण होण्यासाठी त्यांनी खैबर ए पख्तुन्वा (पूर्वीचे नाव वायव्य सरहद्द प्रांत ) या प्रांतात आणि गेल्या काही वर्षापर्यंत स्वतंत्र अस्तिव असलेल्या मात्र सध्या   खैबर ए पख्तुन्वा प्रातांचाच  भाग असलेल्या फेदरली ऍडमीमस्ट्रेड ट्रायबल एरिया ( जो फाटा या संक्षिप्त नावाने प्रसिद्ध आहे {याच प्रदेशाचा एक भाग म्हणजे स्वात खोरे ज्या भागातून मलाया युसूफ येते }) या प्रदेशांमध्ये या संघटनेने अनेक दहशतवादी हल्ले केले आहेत मलाया युसूफ या नोबेल विजेतीवर देखील याच दहशतवाद्यांनी हल्ला केला होता . त्यांचे वाढते हल्ले बघून माजी लष्करप्रमुख जनरल करीब बाजवा यांनी लष्करप्रमुख म्हणून दुसरा कार्यकाळ सुरु असताना त्यांनी या तेहरीके तालिबान पाकिस्तानशी शांततेत प्रस्थापित करण्यासाठी अनेक करार करत त्यांच्याशी शस्त्रसंधी केली होती ते करार शस्त्रसंधी मोडत असल्याचे त्यांनी जाहीर केले आणि लगेच कृती देखील केली आहे 

          भारताची पाकिस्तानबरोबर मोठी सीमा आहे  त्याची अनेक महत्वाची शहरे भारत पाक सीमेपासून अत्यंत जवळ आहेत. आपल्या पंजाब मध्ये शेतात तण जाळले तर त्याचा परिणाम तेथिल पंजाबवर होतो पाकिस्तानकडे  अण्वस्त्र आहेत पाकिस्तान आणि चीन यांची मैत्री आहे चीन आपला प्रमुख शत्रू आहे  या दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे असे सांगत पाकिस्तान सरकार चीनकडे मदत मागू शकते दहशतवाद्यना भारताची फूस आहे असा कांगावा पाकिस्तान करू शकते काही महिन्यापूर्वी तेथील सरकारच्या उचपदस्थाने चीनवरील हल्ला हा 
पाकिस्तानवरील हल्ला समजला जाऊन त्यास तसेच उत्तर देण्यात येईल असे सांगितले होते आता हि गोष्ट चीन करू शकतो  या बाबी लक्षात घेता पाकिस्तान आपला शत्रू असला तरी त्याच्यात शांतता राहणेच भारतासाठी चांगले आहे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?