प्रखर राष्टवादाचा बळी चीन

 


   गेल्या काही दिवसापासून चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कोव्हीड १९ चा प्रतिबंध करण्यास लादण्यात आलेल्या  लॉकडाऊनला  विरोध करण्यासाठी चीनमधील नागरिक रस्त्यावर उतरल्याचा बातम्या न्यूजचॅनेलवर येत आहेत. १९८९ जून ३ रोजी बीजिंगमध्ये झालेल्या तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी ज्या प्रकारचे आंदोलन झाले होते त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु असल्याचचे या बातम्यांमधून सांगण्यात येत आहे . चीनमध्ये माध्यमांवर प्रचंड बंधने आहेत तिथून सरकारविरोधी कोनतिकच बातमी बाहेर जात नाही त्यामुळे अनेकदा त वरून ताकभात या प्रमाणे तेथील बातम्यांवरून अंदाज बांधत परिस्थितीची कल्पना करावी लागते . ज्यामध्ये काहीवेळेस वास्तवात असणाऱ्या परिस्थितीपेक्षा भयानक कल्पना केली जाऊ शकते ज्यामुळे तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी ज्या प्रकारचे आंदोलन झाले होते त्या प्रमाणे मोठ्या प्रमाणत आंदोलन सुरु असल्याची बातमी देखील कल्पना परिस्थितीपेक्षा गंभीर असे असू शकेल मात्र तसे नसल्यास परिस्थिती आणि त्याच्या बातम्या यात फारसा फरक नसल्यास स्थिती अत्यंत गंभीर आहे असे आपण म्हणू शकतो याही वेळेस हि स्थिती सोशल मीडियाद्वारे जगाला समजली आहे 

      आपल्याकडे कठोर  लॉकडाऊन उठवून सुमारे दोन वर्ष झाले आहेत कठोर लॉकडाऊन सोडा आपल्याकडे कोणतीच बंधने सध्या नाहीत लॉकडाऊन पूर्वी ज्या सहजतेने आपण व्यवहार करायचो तसेच आता आहे आपल्याकडे आता अत्यंत तुरळक रुग्ण सापडत असल्यानं अनेक कोव्हीड १९ ची रुग्णालयाने सोइ आपण केव्हाच मोडून काढल्या आहेत जगभरात देखील अशीच स्थिती आहे जगाचे सर्व व्यवहार पूर्वपदावर आले आहेत मात्र

कोव्हीड १९ च्या चीनमध्ये सुरु झाला त्या चीनमध्ये अजूनही परिस्थिती चिंताजनक आहे भीती वाटावी इतक्या मोठ्या प्रमाणात कोव्हीड १९ चे रुग्ण सापडत आहेत त्यामुळे चिनी सरकारने आता जगासाठी इतिहासाचा भाग झालेल्या कडक लॉक डाऊनची अंमलबाजवणी पुन्हा सुरु केली आहे किंबहुना जेव्हा कोव्हीड १९चा उद्रेक चीनमध्ये झाला तेव्हापासून चीनमध्ये कडक लॉकडाउनच असल्यासारखी स्थिती आहे जगाला कोव्हीड १९ ची ओळख होण्याच्या आधी सुमारे सहा ते नऊ आधी चीनला कोव्हीड १९ची ओळख झाली होती तेव्हा चीनकडून जगभरात व्यवहार नित्यनियमाने सुरु ठेवण्यात येत असले तरी चीनमध्ये अंतर्गत लॉकडाऊन होते .  म्हणजे आपण समजू शकतो चिनी नागरिक किती काळापासून बंदिस्त जीवन जगत आहेत 

सध्या सुरु असलेल्या आंदोलनाची सुरवात सिंकीयांग प्रांतातील एका शहारत झाली ( १९६२ पासून चीनने आपला  अनधिकृतरित्या ताब्यात ठेवलेल्या पूर्व लडाखचा प्रदेश चीनने याच सिंकीयांग प्रांतात समाविष्ट केला आहे याच प्रांतात उघूर मुस्लिमबांधवांवर चीन  अत्याचार करतो असे समजले जाते . याचा उच्चर काही ठिकाणी झिंकियांग असा देखील केलेला असू शकतो मात्र झिंकियांग असो किंवा सिंकीयांग एकच प्रदेश आहे हे लक्षात घेणे आवश्यक आहे यालाच इस्ट तुर्कस्तान देखील म्हणतात  ) तेथील एका शहारत कोव्हीड १९चे रुग्ण एखाद्या तुरुंगात कैदी ठेवावे अश्या प्रकारे कुलुपाने साखळीने बंद केलेल्या इमारतीत ठेवले असताना दुर्दैवाने त्या इमारतीत आग लागते शहरात  लॉकडाऊन असल्याने त्याठिकाणी अग्निशामक यंत्रणा पोहोचण्यास उशीर होतो इमारत तुरंगासारखी 

 केल्याने रुग्ण देखील बाहेर पडू शकत नाही  परिणामी १० रुग्णाचा होरपळुन मृत्यू होतो त्यामुळे विविध कारखान्यात होत असलेला लॉक डाऊनच्या विरोधातील छोटा छोटा विरोध मोठे स्वरूप धारण करतो जो चीनची आर्थिक राजधानी असलेल्या शांघाय या शहरासह चीनची राजधानी बीजिंगमध्ये  मोठ्या प्रमाणत दृश्य स्वरूपात दिसला आहे  

     जगाने बऱ्याच आधी मोठ्या प्रमाणत नियंत्रणात आणलेल्या कोव्हीड १९वर चीनमध्ये अजून नियंत्रण का नाही ? या प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर देयचे झाल्यास चीन  प्रखर राष्टवादाचा बळी ठरल्याने चीनमध्ये अशी स्थिती उद्भवली आहे  चिनी  शास्त्रज्ञांनी शोधलेली कोव्हीड १९ वरची औषधे फारशी परिणमकारक नाहीत हे कोव्हीड १९च्या जागतिक साथीच्या सुरवातीच्या दिवसातच स्पष्ट झाले होते आपल्या भारतासह जगभरातील बहुसंख्य देशांनी कोव्हीड १९च्या विरुद्धच्या लढाईत चिनी औषधांना निरोप देत पाश्चात्य देशातील औषधाना जवळ केले होते . पाशात्य देशातील कोव्हीड १९ ला प्रतिबंध करणारी औषधे अधिक परिणमकाक असल्याने बहुतांश जग कोव्हीड १९च्या लढाईत मोठ्या प्रमाणात यशस्वी ठरले . ज्यांनी मात्र चिनी औषधांनाच जवळ केले असे देश अजूनही काही प्रमाणत या रोगाशी लढत आहे या लढत असणाऱ्या देशांचा म्होरक्या असलेल्या चीनमध्ये आपली औषधे फारशी परिणमकारक दिसत नाही हे स्पष्ट होत असून देखील प्रखर राष्ट्रवादी भूमिका घेत चिनी शास्त्रज्ञांनी तयार केलेल्या औषधांचाच वापर सुरु ठेवला ज्यामुळे चीनमध्ये कोव्हीड १९ चा उद्रेक चीनमध्ये शांत झाला नाही . परिणामी

जगाची घडी साथपूर्व काळातील जीवनसामान झाली असली तरी चीनमध्ये लॉक डाऊन सुरूच ठेवावे लागले खूपकाळ बंदिस्त जीवन जगावे लागत असल्याने नागरिकांचा मनात त्याविशषयी घृणा उत्पन्न झाली  या जीवनाविरोधात लपत छपत दबल्या आवाजत विरोध सुरु झाला या विरोधाच्या बातम्या Wion  News सारख्या वृत्तवाहिन्या ऑक्टोबरचे शेवटच्या  १० दिवसापासून दाखवत होत्याच मात्र हॉस्पिटलमधील घटनेने त्याचा अचानक भडका उडाला आणि सर्वत्र या बातम्या दाखवण्यास सुरवात झाली इतकेच 

या विषयीचा काही बातम्यांमध्ये तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी माध्यमे आता आहेत तितकी सजग नसल्याने आता तसे हत्याकांड चीन करू शकणार नाही असे सांगितले जात आहे हा आशावाद खरेच प्रत्यक्षात उतरला तर उत्तम आहे कारण कोणत्याही देशातील सरकार दुसऱ्या देशाचा विरोधी भूमिका घेत असते देशातील सामान्य नागरिक नेहमीच दुसऱ्याविषयी ममत्व बाळगून असतो आणि कोणत्याही आंदोलांत सर्वाधिक नुकसान हे सामान्य नागरिकांचेच होत असते चिनी सामान्य नागरिक सुद्धा याला अपवाद नाही यावेळी तियान्मेन चौकातील हत्याकांडाच्या वेळी घडली तशी घटना घडल्याने चीनवर काही प्रमाणत बंधने लादण्यात आली तर त्याचा फटका चिनी सामान्य नागरिकांनाच बसेल सत्ताधिकारी वर्ग या त्रासापासून दूरच राहील 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?