हवामान बदल समस्त मानवजातीसमोरील संकट

 


आपण महाराष्ट्रीय लोक विविध राजकारणी लोकांनी   महनीय व्यक्तिमत्वाबाबत केलेली विधाने,ज्यामुळे सामाजिक शांतता भंग होणे  पूर्वी एम एस सी बी या नावाने परिचित असलेल्या मंडळाच्या जे आता चार वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये विभाजित केले आहे त्यांच्या कर्मचाऱ्यांनी स्वहितासाठी केलेला संपामुळे त्रस्त असताना जगभरात मात्र लोक हवामानाच्या  लहरीपणामुळे त्रासलेले आहेत जगातील एकमेव महाशक्ती सर्वात विकसित देश म्हणून ज्या अमेरिकेचा उल्लेख होतो त्याअमेरिकेच्या प्रशासनाने देखील या हवामानाच्या लहरीपांपुढे गुडघे टेकले आहेत .अत्यंत विकसित समजल्या जाणाऱ्या अमेरिकेत सुद्धा अचानक मोठ्या प्रमाणत आलेल्या शीतलहरींमुळे नागरिकांचा बळी जाण्याचा घटना घडला यावरून निसर्गाने आपली ताकद काय आहे ? हे जगाला एकप्रकारे दाखवून दिले  आहे असेच म्हणावे लागेल 

गेल्या डिसेंबरचा शेवटचा आठवडा अमेरिका आणि युनाटेड किंगडम या दोन देशांसह संपूर्ण पश्चिम युरोपासाठी हवामानाचा विचार करता अत्यंत नरकामय यातना देणारा ठरला अमेरिका देशाचा पूर्वेकडच्या किनाऱ्यावर (अटलांटिक महासागराचा किनारा ) कॅनडा देशाच्या मध्यापर्यंत बहुदा शतकात येणारे शीतलहरींचे वादळ आले ज्याने तापमानाच्या नीचांकाचे मागील कित्येक वर्षाचे रेकॉर्ड मोडले युनाटेड किंगडम या वर्षातील बहुतांश काळ

थंड हवामान असलेल्या देशात सुद्धा हिवाळ्याच्या सुरवातीला चिंताजनक स्थिती निर्माण केली . आता जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अमेरिका देशाच्या पश्चिम देशाच्या किनाऱ्यावर (पॅसिफिक महासागराचा किनारा ) असेच एक शीतवादळ आकारला येत असल्याचे दिसून येत आहे 

अमेरिकेचे माजी  उपराष्ट्राध्यक्ष अल गोर यांची निर्मिती असलेल्या हवामान बदलाच्या संकटाच्या परिणामाची चर्चा करणाऱ्या  डे आफ्टर टुमारो या चित्रपटात सुद्धा आणि काही अचानक होणाऱ्या हवामानबदलामुळे उत्तर अमेरिकेचा आणि पश्चिम युरोपचा बहुतांश भागात तापमान अचानक खाली जाते असा प्रसंग चित्रित करण्यात आला आहे आज याचा पूर्णतः नाही मात्र बऱ्याच अंशी अनुभव सध्या ऊत्तर अमेरिकी भागाने घेतला आहे जगात एखाद्या समस्येने लोक मोठ्या प्रमाणत त्रस्त्र असले तरी जो पर्यंत अमेरिकेला त्या  गोष्टीचा अनुभव येत नाही तो पर्यंत जगात ती समस्याच नसते असा अमेरिकेन नागरिकांचा सर्वसाधारण दृष्टिकोन जागतिक समस्येबाबत असतो जागतिक हवामान बदलाचे संकट अधिक गंभीर होण्यासाठी आतापर्यंत अमेरिकन नागरिकांचे बेछूट वागणेच जवाबदार आहे त्याच अमेरिकेला आता हवामान बदलाच्या संकटाला सामोरे जावे लागले असल्याने या चित्रात सकारत्मक बदल होईल असा विश्वास बाळगायला हरकत नसावी 

सध्या अमेरिकेच्या संसदेत (ज्याला काँग्रेस म्हणतात ) हवामान बदलाविषयी बेपर्वाची भूमिका घेणाऱ्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असले तरी अमेरिकेचा अध्यक्ष डेमोक्रेट्रीक पक्षाचा आहे हि बाब सुखावणारी आहे हवामान बदलाविषयी मानवाचेकाही कर्तव्य आहे असे मानणारे अमेरिकेचे माजी  उपराष्ट्राध्यक्ष अल गोर हे डेमोक्रेक्तिक पक्षाचेच होते या उलट बहुसंख्य रिपब्लीकन पक्षाचे समर्थक बायबल मधील नोवाची गोष्ट तसेच

हिंदू पुराणातील जलप्रलयाचा गोष्टीचा आधार घेत हवामान बदलाच्या बाबतीत मानवाचे योगदान जवळपास शून्य आहे हवामान बदल हि दर काही वर्षांनी होणारी नैसर्गिक प्रक्रिया आहे या मताचे आहेत त्यामुळे त्यांचा हवामान बदलाविषयक कार्यक्रमाच्या ध्येयधोरणानुसार स्वतःवर काही बंधने लादून घेण्यास सक्त विरोध असतो माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कार्यकाळातच अमेरिका पॅरिस करारातून बाहेर पडली होती डोनाल्ड ट्रम्प हे रिपब्लिकन पक्षाचे आहेत हा मुद्दा पण लक्षत घेयला हवा अमेरिकेला झळ लागल्याने हा मुद्दा आता जागतिक स्तरावर व्यापक स्तरावर चर्चिला जाईल ज्यामध्ये भारतासारख्या दरदोईचा विचार करता हवामान बदलाच्या बाबतीत साह्य करणाऱ्या ग्रीन हाऊसचे कमी उत्सर्जन करणाऱ्या मात्र लोकसंख्येच्या मोठ्या संख्येमुळे एकूण प्रमाण अधिक असलेल्या देशांचा आणि दरडोई चा विचार करता जगात सर्वाधिक असलेल्या अमेरिकेचा मोठा संघर्ष होऊ शकतो हवामान बदलाविरुद्धचा युद्धात असे झाल्याचा इतिहास आहे मात्र या इतिहासातून शिकत त्या चुका टाळण्यातचतच समस्त मानवजातीचे कल्याण आहे हे मात्र नक्की 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?