पाश्चात्त्यांचे चुकलेले भविष्य

         


  आपला भारत १९४७ साली स्वतंत्र्य झाला त्यावेळी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष पश्चिमी युरोपीय देशातील प्रमुखांनी आपलया भारताताबत अंदाज व्यक्त करताना इतक्या विविधता असणाऱ्या देशाचे किमान चार ते पाच तुकडे पडतील या उलट पाकिस्तान या देशात किमान एक धर्म तरी सामान असल्याने तो देश मोठ्या प्रमाणत प्रगती करेल असे अंदाज व्यक्त केले होते . आज ७५ वर्षानंतर पाश्चात्यांचे अंदाज पूर्णतः चुकल्याचे स्पष्ट होत आहे . 

   गेल्या ७५ वर्षात भारत एक मोठी आर्थिक ताकद म्हणून उदयास आला आहे . १९९१ चा दुर्देवी अपवाद वगळता भारताला आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागावी लागलेली नाही .१९७५ नंतरच्या   दोन वर्षांचा अपवाद वगळता भारतात लोकशाही व्यवस्थित सुरु आहे काँग्रेस नंतर भाजपा सारख्या अत्यंत भिन्न विचारसरणीच्या सरकाकडे शांततेत सत्तानंतरण झाले आहे . भारताच्या फक्त इंदिरा गांधी यांची पंतप्रधानपदी असताना हत्या झाली आहे (राजीव गांधी यांची हत्या झाली तेव्हा  ते पंतप्रधान नव्हते ) भारताचा एक इंच जमीन देखील स्वतंत्र झालेली नाही याच्या पूर्ण उलट स्थिती पाकिस्तानची आहे जगात संयुक्त राष्ट्रसंघाची मान्यता आहे असे जगात २१० देश आहेत या २१० देशांपैकी सर्वाधिक म्हणजे १७ वेळा आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर आहे ७५ वर्षात १७ वेळा म्हणजे सरासरी सव्वाचार वर्षांनी पाकिस्तानने आंतराष्ट्रीय नाणेनिधीकडे मदत मागितली आहे . स्वतंत्र्य झाल्यावर २५ वर्षात पाकिस्तानचे दोन तुकडे पडले . ७५ वर्षाच्या एकूण कालखंडापैकी ३८ वर्ष देशात अधिकृत लष्कराची सत्ता होती अन्यवेळी लष्करच्या पाठींब्यावर उभारलेला लोकशाहीचा देखावा होता पाकिस्तानात ३८ वर्ष असेलेल्या लोकशाही दरम्यान जे पंतप्रधान झाले त्यातील नवाज शरीफ , इम्रान खान अश्या काही मोजक्या पंतप्रधानांचा अपवाद वगळता बहुतेक सर्व पंतप्रधानाची हत्या झाली आहे किंवा सत्तेतून पायउतार झाल्यावर त्यांना पाकिस्तान सोडून दुसऱ्या देशात आश्रय घ्यावा लागला आहे . 

         आज २०२३ साली देखील तो देश पुन्हा एकदा फुटीच्या उंबरठ्यावर उभा आहे . पाकिस्तानचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग केले तर पश्चिम भागात मोडणाऱ्या खैबर ए पख्तुनवावा (पूर्वीचा वायव्य सरहद प्रांत ) आणि बलुचिस्तान या  दोन प्रांतात  पाकिस्तानपासून वेगळे होऊन स्वतःच्या वेगळा देश करण्याच्या फुटीरतावादी चळवळी अत्यंत जोमात आहेत . बलुचिस्तानसातील फुटीतारतावादी संघटना व्यक्तीकडून देशात सातत्याने दहशतवादी हल्ले होत आहे भारताविरुद्ध लढण्यासाठी उपयोगी पडेल म्हणून पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या
भूमीवर जन्माला घातलेला तालिबान नावाचा अजगर आता आपल्या जन्मदात्यासच गिळू पहात आहे . पेराल ते उगवेल या म्हणीचा रोज अनुभव सध्या पाकिस्तान घेत आहे तालिबानचा हा अजगर पाकिस्तानी सैन्यावर हल्ले करत आहे . अफगाणिस्तान पाकिस्तान या  सीमावर्ती भागातील पाकिस्तानी जनतेचे रोजचे जगणे नरकप्राय करत आहेत ज्याचा विरोधात लढण्यास तयार होण्याचे आवाहन पाकिस्तानी जनतेला करण्याची वेळ पाकिस्तानी राजकर्त्यानावर आली आहे . 
        आपल्याकडे देशात कितीही संकटे आली , सत्ताधिकारी वर्गाला आपला मोठ्या फरकाने पराभव होईल असे स्पष्ट दिसत असताना देखील शांततेत निवडणुका झाल्या आहेत कारण देशात तळागाळापर्यंत लोकशाही रुजली आहे मात्र पाकिस्तानात लोकशाही रुजलीच नसल्याने इस्लमाबाद महानगरपालिका आणि कराची महानगरपलिकच्या निवडणुका या सारख्या स्थानिक निवडणुका देखील पाकिस्तानात वादाच्या भोवऱ्यात सापडल्या आहेत इस्लामाबादमध्ये पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार ३१ डिसेंबरला इस्लमबाद महानगरपालिकेच्या निवडणुका होणार होत्या त्यासाठी मतदानपत्रिका देखील छापलेल्या होत्या (पाकिस्तानात आज देखील आपल्याकडे पूर्वी होत असे कागदी मतप्रत्रिकेवर मतदान होते )  मतदानपूर्व चाचणीत पाकिस्तानमधील विरोधी पक्ष इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इंसाफ या पक्षाला बहुमत मिळेल असा अंदाज व्यक्त करण्यात येत होता अचानक निवडणुकीच्या आधी इस्लामाबाद महानगरपालिकेत लोकसंख्येचा विचार करता नगरसेवकांची सध्या असणारी १०१ हि संख्या १२५ करण्याची गरज केंद्रीय सत्तेला वाटू लागली त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी निवडणूक आयोगाला सांगून प्रक्रिया थांबवली हि निवडणूक प्रक्रिया सुरु होण्याचा सहा महिने आधी इस्लामाबाद महानगरपालिकेच्या नागरसेवकांची संख्या ५१ वरून १०१ करण्यात आली होती हे आपण लक्षात घेयला हवे या बाबत इम्रान खान यांनी इस्लामाबाद उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले न्यायालयाने पूर्वनियोजित वेळापत्रकानुसार निवडणुका घेण्याचे आदेश३० डिसेंबर रोजी  दिले मात्र एका दिवसात निवडणूक घेणे अश्यक असल्याचे पाकिस्तानी निवडणूक आयोगाने सांगितले तयारी करण्यासाठी वेळ मागिताला त्यानुसार येत्या ९ 
जानेवारीस इस्लमबाबाद मध्ये महानगरपालिकेच्या  निवडणुका होणार आहेत आता यावेळी निवडणुका होतात का ? हे बघणे उत्सुकतेचे ठरेल एकीकडे देशाच्या राजकीय राजधानीच्या शहराबाबत हा गोधळ सुरु असताना देशाच्या आर्थिक राजधानीच्या शहराबाबत अर्थात कराची महानगरपालिकेच्या निवडणुकीत देखील प्रभागाच्या सीमेवरून केंद्रात सत्तेत असलेल्या आघाडीतील दोन पक्षात अर्थात मुत्तहिदा कौमी मूव्हमेंट (जो एम क्यू एम या नावाने प्रसिद्ध आहे ) आणि पाकिस्तानी पीपल्स पार्टी (जी पी पी पी नावाने प्रसिद्ध आहे ) वादास तोंड फुटले जर आमच्या म्हणण्यानुसार प्रभाग रचना न केल्यास आम्ही सिंध विधानसभेच्या सत्तेतून बाहेर पडतो अशी धमकी त्यांनी दिली पी पी पी च्या मते निवडणूक प्रक्रिया सुरु केल्यावर असे करता येणार नाही यामुद्यावरून पाकिस्तानात मोठा वादंग होत आहे आपल्याकडे प्रभाग रचनेवरून वाद होत असले तरी ते निवडणूक प्रक्रिया सुरु होण्यापर्यतच असतात एकदा निवडणूक प्रक्रिया सुरु झाल्यावर आपल्याकडे असे वाद निर्माण होत नाही 
    त्यामुळे  आपला भारत १९४७ साली स्वतंत्र्य झाला त्यावेळी तत्कालीन अमेरिकी अध्यक्ष पश्चिमी युरोपीय देशातील प्रमुखांनी आपल्या भारतात लोकशाही रुजणार नाही पाकिस्तानात मात्र लोकशाही रुजेल असा जो अंदाज व्यक्त केला होता तो पूर्णतः चुकल्याचे दिसून येत आहे हेच खरे 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?