हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ?


राज्य लोकसेवा आयोगाच्यामार्फत घेण्यात येणाऱ्या  परीक्षेद्वारे राज्य प्रशासनातील वर्ग एक आणि दोनच्या अधिकारीवर्गाच्या पदावर  नियुक्तहोण्यासाठी प्रयत्नशील युवकांच्या  आणि युवतींच्या आंदोलनाने १३ जानेवारीचा संपूर्ण दिवस धगधगता ठेवला . ज्याचा जोर प्रामुख्याने पुण्यात होंता मात्र औरंगाबाद कोल्हापूर या  शहरांसह  राज्यभरात ठिकठिकाणी  याबाबतचे आंदोलन झाले .गेल्यावर्षी  २६ जूनच्या  सुमारास महाराष्ट्र लोकसेवा  आयोगाने अभ्यासात केलेले बदल मागे घेऊन जुन्याच पद्धतीनेपरीक्षा घेण्यात याव्यात अशी उभा भावी अधिकाऱ्यांची (?) मागणी आहे आम्ही सुमारे  दोन वर्ष आधीपासून या परीक्षेचा अभ्यास करत आहोत . आम्हाला इतक्या  लवकर हे बदल स्वीकारत नव्याने अभयास करणे जमणार नाही तरी या बदलानुसार परीक्षा २०२५ पासून घेण्यात याव्यात अशी त्यांची मागणी आहे 
        या भावी अधिकऱ्यांची मागणी लक्षात घेतल्यास एक  प्रश्न निर्माण होत आहे ज्याकडे काहीसे दुर्लक्ष होत असल्याने त्याकडे  लक्ष वेधण्यासाठी हा लेखनप्रपंच .तर तो प्रश्न आहे  हि तरुणाई प्रशासनातील आव्हाने पेलू शकेल ? प्रशासनात घर गाड्या तसेच अन्य सोयीसवलती मोठ्या प्रमाणत मिळत असल्या तरी जवाबदारी देखील मोठी असते . प्रशासनात काम करताना अनेक संकटे अचानक येतात त्या संकटाना तोंड देण्यासाठी पुरेशा वेळ  सुद्धा अनेकदा मिळत नाही काही दिवसापूर्वीच नाशिक जवळील एका खासगी कंपनीत मोठा स्फोट झाला त्यावेळी संबंधित तालुक्याचे प्रांताधिकारी तलसीलदार यांना प्रचंड काळ न  थकता अविरत श्रम करावे लागले . अनेक महत्त्वाचे मोठ्या प्रमाणात समजावर परिणाम होतील असे  निर्णय घ्यावे लागले कोव्हीड १९ ची साथ जगभरात मोठ्या प्रमाणत हाहाकार उडवत असताना देखील या यंत्रणांना मोठ्या कष्टाला सामोरे जावे लागले 
नाशिकजवळील खासगी कंपनीत स्फोट होईल याचे भविष्य कोणी वर्तवले नव्हते कि या भागातील प्रशासनास काही तयारी करण्याची संधी मिळाली अत्यंत अचानक या भागतील प्रशासनास या संकटाला सामोरे जावे लागले . कोव्हीड १९ च्या साथरोगासारखे संकट या आधी जगाने अनुभवलेले नव्हते त्यामुळे पूर्वानुभवाव काहीही नव्हता त्यामुळे संपूर्णपणे नव्यानेच आलेले हे संकट होते मी वर उल्लेखलेली  संकटे हि निव्वळ प्रातिनिधिक आहेत या सारख्या अनेक संकटाचा सामना प्रशासनास सातत्याने करावा लागतो या सारख्या अनेक संकटाचा सामना करायला खूप कमी वेळा मिळतो  अश्यावेळी आता आंदोलन करणारे भावी अधिकारी उद्या प्रशासनात गेले तर अश्याच प्रकारे आंदोलने करत या सारख्या संकटाचा सामना करत त्यापासून पळ काढणार का ? हा मुद्दा या निमित्याने चर्चिला जायलाच हवा  जर अस्या वेळी अधिकारी वर्गाने कच खाल्ली तर त्यांचे मोठे नकारात्मक परिणाम समजावर होतील त्यास जवाबदार कोण असे म्हटल्यास ?याच अधिकारी वर्गाला जवाबदार धरावे लागेल 
        मुळात स्पर्धा परीक्षांच्या अभ्यासक्रमात होणारे हे बदल नव्या काळात कोणत्या समस्येचा सामना या यंत्रणेला करावा लागू शकतो ? याचा अंदाज बांधत त्याची पूर्वतयारी या यंत्रणेत येण्यास उछुक् असणाऱ्या उमेदवारणकडून व्हावी हा उद्देश डोळ्यासमोर ठेवूनचकेलेले असतात मी सुद्धा केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षेचे (ज्यास आपल्याकडे साधारणतः यूपीएससी संबोधतात ) दोनदा प्रयत्न केला त्यामुळे या स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी किती कष्ट करावे लागतात हे जवळून अनुभवले आहेत त्यामुळे आंदोलन करणाऱ्या उमेदवारांनाचा 
उद्रेग मी समजू शकतो दोन ते अडीच वर्ष ज्यांनी अक्षरशः पोटाला चिमटा काढत अभ्यास केला त्यांचा निराशेतून असा संताप होणे स्वाभाविकवचा आहे अभ्यासिकेत अभ्यास करायला मिळवा म्हणून अभ्यासिका चालकांची मुजोरी सहन करणारे अनेक उमेदवार मी पुण्यातील सदाशिव पेठ नारायण पेठ नवी पेठ या भागात बघिले आहेत पुण्यात ज्या स्थितीत हे उमेदवार राहतात ते बघितल्यासअगदी दगडाचे काळीज असणाऱ्या मनुष्याला देखील वाईट वाटेल मात्र या उमेदवारणाचे देखील काही चुकलेले आहेच ? आपण ज्या सवलतींचा आग्रह धरतोय त्या प्रकारच्या सवलती आपली प्रशासनात नवड झाल्यावर मिळतील का ? जर  मिळणार नसतील तर त्या संकटाला सामोरे जाण्याची तयारी आपण आता पासूनच करायला नको का ? सवयी  अंगी बाळगण्यास काहीसा वेळ लागतो त्या चटकन लागत नाही . त्यामुळे या बदलांना सामोरे जात त्यासाठी स्वतः तयार करण्यातच हित आहे हे या उमेदवारांना समजवून सांगायला  हवे 
    मुळात या प्रकारचे बदल होणार आहेत ते आयोगाने मागच्या वर्षी जूनच्या शेवटच्या आठवाड्यतच जाहीर केले होते त्यावेळी हे बदल जाहीर करताना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने या आधीच हे बदल २०२३ च्या परीक्षेपासून लागू होतील असे जाहीर केले  होते . मात्र त्यावेळी माध्यमाकडे अन्य  राजकीय विषयांचा दारुगोळा असल्याने त्यांनी या
विषयाबाबत पुरेशी जनजागृती केली नाही त्यामुळे स्पर्धा परीक्षेच्या उमेदवारणाकडे याबाबत पुरेशी माहिती पोहोचलीच नाही त्यामुळे मोठ्या संख्येने उमेदवार यापासून अनभिज्ञ राहिले ज्याची फळे आपणास आता दिसत आहेत . जी दुर्दैवीच  आहेत 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?