जोशीमठाच्या आपत्तीतून आपण घ्यावयाचे धडे

               

   उत्तराखंड राज्यातील जोशीमठ या शहरात भौगोलिक स्थितीमुळे झालेली आणीबाणीची स्थिती ऐव्हाना आपणास मोठ्या प्रमाणात माहिती झालेली असेल.विविध भुगर्भ शास्त्रज्ञांनी या आधी दिलेले सुरक्षेतेचे इशारे देखील आपणास माध्यमांमार्फत आपणास ठाउक असतील जोशीमठ येथील संकट भयानक आहेच ,यात शंकाच नाही. मात्र पुर्णतः जोशीमठ सारखेच नाही मात्र त्याच तीव्रतेचे संकट आपल्या महाराष्ट्रात आहे, ते म्हणजे कोकणाचे .
             कोकणचे भुगर्भ अत्यंत सुरक्षीत असले तरी  सयुंक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणीय संघटनेने कोकणच्या  पर्यावरणाचा समावेश पृथ्वीवरील अत्यंत संवेदनशील पर्यावरणात करण्यात केला आहे. कोकणात मोठे प्रकल्प नको असा अहवाल माधवराव चितळे आणि गाडगीळ समितीमार्फत आधीच देण्यात आला आहे. तरीदेखील काही प्रकल्प कोकणच्या माथी मारण्यात येत आहे. ज्यामुळे भविष्यात मोठी समस्या उभी ठाकली तर आश्चर्य वाटायला नको. उत्तराखंड राज्यात देखील या आधी देण्यात आलेले सुरक्षीतचे नियम पायदळी तूडवल्याचे परीणाम आपण बघत आहोतच. तोच धोका कोकणात देखील आहे. विकासाबाबत नव्याने  विचार करायची वेळ आली आहे, हेच यातून सिद्ध होत आहे.
      उत्तराखंड आणि कोकण याचा तसा अर्था अर्थी संबध नसला तरी दोन्ही ठिकाणी मोठे प्रकल्प उभारण्यात येवू नये, असे स्पष्ट निर्देश आहेत,हे आपण लक्षात घेयला हवे. कोकणचा विकास झाला पाहिजे, यात दुमत नाही, मात्र कोणत्या गोष्टी आल्या म्हणजे विकास झाला, याबबतचे निकष आपण कोकणासाठी बदलायला हवेत .अन्य ठिकाणी
ज्या गोष्टी विकासासाशी जोडण्यात येतात त्याच बाबींची पूर्तता केली म्हणजे कोकणाचा विकास झाला असे समजू नये . विकासाचा हाच अर्थ लावल्याने जोशीमठ शहरात काहीसे जास्त प्रमाणत शहरीकरण करण्यात आले ज्याची शिक्षा आज जोशीमठ भोगतोय .  
        कोकणांत अणुविद्यत प्रकल्प , किंवा तेल शुद्धीकरण प्रकल्प आल्यास तेथील खनिजाचे मोठ्या प्रमाणत उत्खन झाल्यास कोकणच्या पर्यावरणास मोठी हानी पोहोचू शकते याची आपण जाणीव ठेवणे अत्यावश्यक आहे . कोकणाचा पर्यटनांचा दृष्टिकोनातून विकास करण्यात यावा असे  आपल्याकडे सातत्याने म्हंटले जाते .उत्तरखंडाचा पर्यटनाचा विकास करताना काही चुका झाल्या हे आता समोर येत आहे कोकणचा पर्यटनाचा माध्यमातून विकास करताना या चुका टाळायला हव्यात 
     काही जण माझी  उत्तराखंड आणि कोकणची तुलनाच अप्रस्तुत अयोग्य अनाठायी संबंध जोडून केलेली तुलना आहे असे समजतील त्यांना मी सांगू इच्छितो कि भलेही भूगर्भीय रचना दोन्ही ठिकाणी भिन्न असेल मात्र दोन्ही ठिकाणे विकासाबाबत अति संवेदनशील आहेत हा सामान धागा मात्र कोणीही नाकारू शकत नाही अंधाधूंत
पद्धतीने कोकणाचा विकास केल्यास भलेही कोकणची जमीन धसणार नाही मात्र अन्य पर्यावरणीय गंभीर समस्या मात्र नक्की उत्पन्न होऊ शकतात
     कोकणातील खाड्या या कोकणच्या पर्यावरणाच्या फुफुस्से आहेत पर्यटनाच्या दृष्टीने विकास करताना त्यांचे अस्तिव धोक्यात येता कामा नये तसेच कोकणातील देवराईचे जंगल खारफुटीचे जंगल या बाबी देखील कोकणच्या पर्यावरणाच्या  दृष्टीने महत्त्वाच्या आहेत त्यांचे संवर्धन करत कोकणचा पर्यावरणीय विकास करण्यात यावा त्यांस हानी पोहोचेल अशे प्रकल्प कोकणात आणू  नयेत 
 . उत्तराखंड आणि कोकणातील भौगोलिक रचना बऱ्याच अंशी भिन्न असल्याने उत्तराखंडमधील संकट तंतोतंत येथे उद्भवणार नाही बऱ्याच मोठ्या प्रमाणतयाचे स्वरूप वेगळे असतानाच मात्र उत्तराखंडमधीलसंकटासारकाही स्थिती येणारच नाही असे नाही आताजोशी मठाचा आपत्तीच्या वेळी १९७६ च्या मिश्रा आयोगाचा सातत्यानेसंदर्भ देऊन या आयोगाची कशी पायमल्ली करण्यात आली हे सांगण्यात येत आहेदेव न करो अजून ३० ते ३५ वर्षांनी आम्हला
कोकणच्या बाबतीत गाडगीळ , चितळे समितीच्या अहवालात सांगण्यात आलेल्या गोष्टींची पायमल्ली केल्यामुळे आज कोकण भकास झाले आहे असे ऐकायला ना मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?