अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान

                


   सध्या पाकिस्तानातील घडामोडी बघितल्यास या सर्व घडामोडींचे वर्णन अशांत राजकीय वादळाच्या उंबरठ्यावर पाकिस्तान  असेच करावे लागेल एकीकडे रोजच्या जगण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसासाठी सर्वसामान्य जनता  झगडत असताना पाकिस्तानमधील राजकारणी मात्र एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झोडण्यात व्यस्त आहेत . रविवार १५ जानेवारीला सिंध प्रांतातील विविध महानगरपालिका  नगरपालिकांसाठी झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या झालेल्या निवडणुकीत इम्रान खान त्यांच्या पाकिस्तन तेहरीके इन्साफ या पक्षाला मिळालेल्या अनपेक्षित धक्याने गेल्या काही दिवसापासून सुरु असलेल्या राजकारणाच्या चिखलफेकीला मोठ्या प्रमाणत  उत्तेजन मिळाले आहे . सिंध प्रांतात १५ जानेवारीला झालेल्या निवडणुकीत अत्यंत कमी मतदान झाले . अल जझीरा या वृत्तवाहिनीने दिलेल्या बातमीनुसार रविवारी दुपारपर्यंत अनेक मतदान बूथपर्यंत जेमतेम १० ते १५ नागरिकांनी मतदान केले होते . याच वृत्तवाहिनीने दिलेल्या दुसऱ्या बातमीनुसार सिंधमध्ये झालेल्या निवडणुकीत प्रांतात सत्ताधिकारी असलेल्या पाकिस्तान पीपल्स पार्टी ने राक्षसी वाटावे असे बहुमत मिळवले आहे . एप्रिल २०२२ मध्ये इम्रान खान यांच्या विरोधात अविश्वासाचा ठराव समंत करून त्यांना पंतप्रधानपदावरून दूर केल्यावर पाकिस्तानी पंजाबमध्ये झालेल्या प्रत्येक पोटनिवडणुकीत इम्रान खान यांच्या पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाला अपवाद वगळता   प्रत्येक ठिकाणी यश मिळाले होते एप्रिल २०२२ नंतर इम्रान खान यांनी पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांतात घेतलेल्या राजकीय सभेत लाखोंनी लोक सहभागी झाले होते त्यामुळे संपूर्ण पाकिस्तानातं आपलीच हवा आहेअसे मानून इम्रान खान आपली रणनीती आखात होते  त्याच आधारावर ते तेथील पंतप्रधांवर अविश्वासाचा प्रस्ताव आणण्याची रणनीती आखत आहे  असे वृत्त डी डब्ल्यू या जर्मन सरकारच्या मालकी असणाऱ्या वृत्तवाहिनीने  गेल्या आठवड्यात दिलेल्या बातमीत सांगतिले होते  त्या पार्श्वभूमीवर आपण हे निकाल बघायला हवे हा लेख लिहण्यापर्यंत य निकालावर काहीही हिंसक प्रतिक्रिया पाकिस्तानात उमटल्याचे वृत्त नाही मात्र आपण हा लेख वाचत असताना त्यामध्ये बदल होऊन पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाकडून निकालाच्या विरोधात पाकिस्तानात हिंसक आंदोलन सुरु करण्याची शक्यता नाकारता येत नाही 

            पाकिस्तानात सर्वत्र सार्वत्रिक निवडणुका घेण्यात याव्यात या मागणीसाठी सरकारवर दबाव आणण्यासाठी ते पाकिस्तानी पंजाब आणि खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या विधानसभा विसर्जित करण्याचा त्यांचा

प्रयोग होता पाकिस्तान तेहरीके इन्साफ या पक्षाने  सत्ताधिकारी वर्गाकडून  लोकांना मतदानासाठी बाहेर पडण्यस्साठी भीती वाटेल असे वातावरण निर्माण करण्यात आले तसेच निवडणुकीत मोठ्या प्रमाणत गैरप्रकार करण्यात आल्याचे आरोप करण्यात येत आहे निकाल काहीही सांगितले जात असले तरी सर्वसामान्य पाकिस्तानी आमच्या बरोबर आहे असा दावा पाकिस्तन तेहरीके इन्साफ या पक्षकाडून करण्यात येत आहे तर सिंधमध्ये मोठ्या प्रमाणत जिंकलेली पाकिस्तन पीपल्स पार्टी ज्या पाकिस्तान डेमोक्रेक्तिक मूव्हमेंट या आघाडीचा भाग आहे त्याच्या विविध घटक पक्षांच्या नेत्यांकडून पाकिस्तानी जनतेला कोण त्यांचे खरे हित  करू इच्छितो ते समजले आहे इम्रान खान यांच्या बोल्ल्यातील फोलपणा त्यांना लक्षात आला आहे असे सांगितले आहे 

             पाकिस्तनचे आघाडीचे वृत्तपत्र असलेल्या डॉन या वृत्तपत्राच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आलेल्या बातमीनुसार इम्रान खान १७ जानेवारीला खैबर ए पख्तुन्वा या प्रांताच्या विधानसभेचे विसर्जन करावे असं प्रस्ताव तेथील मुख्यमंत्र्यांमार्फत तेथील राज्यपाला सादर करणार आहेत त्यावर तेथील राज्यपालांनी सही केल्यानंतर तेथील विधानसभा विसर्जित होईल पाकिस्तानी संविधानानुसार जर प्रांताच्या राज्यपालांनी जर ४८ तासात विधानसभा विसर्जित करण्याचा प्रस्तावावर सही न केल्यास ती आपोआप विसर्जित होते याच प्रकारे प्रांताच्या राज्यपालांनी स्वाक्षरी केली नसली तरी ४८ तासांची मुदत संपल्याने १४ जानेवारीला पाकिस्तानी पंजाबची विधानसभा विसर्जित झाली आहे पाकिस्तानी प्रशासकीय व्यवस्थेनुसार तेथील प्रांतीय निवडणुका आणि संसदेच्या निवडणुका एकाच वेळी होतात पाकिस्तानमधील एकूण विधानसभेच्या जागांपैकी सुमारे ६७ % या दोन प्रांतातून येतात त्यामुळे या प्रांतात निवडणुका झाल्यास संपूर्णपाकिस्तानातथेतील संसदेच्या निवडणुका घेणे क्रमप्राप्त आहे असा इम्रान खान यांचा दावा आहे केंद्रीय सत्तेत असणाऱ्या आघाडीतील पक्षांचा दुट्टपीपणा समोर आणण्यासाठी  इम्रान खान पाकिस्तानी पंतप्रधानांवर अविश्वासच्च प्रस्तव दाखल करू इच्छित आहे जर आघाडीतील पक्षांनी पंतप्रधांनाना साथ दिल्यास पुढच्या निवडणुकीत पाकिस्तानातील आर्थिक
दयनीय अवस्थेच्या वेळी त्यांनी गुळाच्या ढेपी प्रमाणे सत्तेस चिकटले अशा आरोप करता येण्यासारखी स्थिती 
निर्माण  करणच्या इम्रान खान यांचा प्रयत्न असल्याचे फ्रांस २४ या वृत्तवाहिनीतील बातमीत सांगितले आहे 
       मात्र या सर्व राजकीय साठेमारतीत तेथील जनता विनाकारण पिसली जात आहेपाकिस्तानच्या तिजोरीत परकीय चलनाचा साथ खूपच कमी जवळपास शून्यवत असल्याने पाकिस्तानची आयात जवळपास पूर्णपणे बंद आहे ज्यामुळे पुरामुळे देशातील शेती उध्वस्त झालेल्या पाकिस्तानात लोकांना खाण्यासासाठी अन्नाची कमतरता आहे पुरांमुळे देशांर्गत उपादान नष्ट झाले आहे त्यातच आयात करता येत नसल्याने पाकिस्तानी सर्वसामान्य जनता दुहेरी संकटाला सापडली आहे मात्र या राजकीय आरोप प्रत्यारोपित त्यांच्याकडे कोणाचेच लक्ष नाहीये आणि तेच मोठे दुर्दैव आहे 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?