लासलगावची बखर -


जगातील
प्रत्येक शहराला इतिहास असतो . मात्र फारच कमी शहरांचा इतिहासाची पद्धतशीरपणे नोंद ठेवली जाते पाश्चात्य देशापेक्षा आपल्या भारतात तर हे प्रमाण खूपच ढासळते . मात्र सध्या या चित्रात सकारत्मक बदल होत आहे  पूर्वी लिहल्या गेलेला अनेक शहरांच्या इतिहास त्या शहरातील महत्वाच्या व्यक्ती ता शहरातील महत्वाच्या संस्था त्यांच्या इतिहास याच्या जाणीपूर्वक नोंदी ठेवण्याचे काम सध्या अत्यंत वेगाने होत आहे या नव्या  मोहिमेत फक्त महानगरांचाच इतिहास लिहला जात नाहीय्ये तर अगदी तालुक्यस्तरवरील किंवा एखद्या तालुक्याचे मुख्यालय नसणाऱ्या मात्र त्या तालुक्यतातील महत्त्वाची बाजरपेठ असणाऱ्या गावांचा देखील समावेश होत आहे याच मालिकेतील एक गाव म्हणजे नाशिक जिल्ह्यतील लासलगाव . कांद्याचा उत्पनासाठी सर्व जगभरात प्रसिद्ध असलेल्या या लासलगावच्या इतिहासाला पुस्तकात शब्दबद्ध केले आहे लासलगावचेच रहिवाशी असणाऱ्या संजय बिरार यांनीलासलगावची बखर असे नाव असलेले आणि  पुणे आणि नाशिक येथे आपले कार्यालय असणाऱ्या वैशाली प्रकाशनतर्फे प्रकाशित हे पुस्तक मी नुकतेच नाशिकमधील जेष्ठ समाजसेवक डॉ संदीप भानोसे यांच्या वैयक्तिक संग्रहातून त्यांच्याकडून  मागून घेऊन वाचले    

 सुमारे २०० पानाच्या या पुस्तकात विविध अस्या ३२ प्रकारांतून लासलगावचा भूगोल , गावाची स्थापना कधी झाली ? गावातील विविध शासकीय संस्था , धार्मिक स्थळे , गावाचे नाव जगभरात उंचावणाऱ्या व्यक्ती , गावाचा राजकीय  पट, गावातील सुधारणेचे विविध टप्पे , गावातील विविध सुधारणेत मोलाचे योगदान देणाऱ्या यक्ती , गावातील करमणुकीच्या साधनांचा विकास , यांच्या आढावा नाशिक जिल्ह्यासाठी एक विशेष प्रकरण घेऊन करण्यात आला आहे  .पुस्तकाचे मुखपृष्ठ अत्यंत रंजक आहेजुन्या काळात गावांना असे अस्या वेशीचे चित्र पुस्तकाकडे आपल्याला खेचून घेते पुस्तकाचे मलपृष्ठ देखील आकर्षक अश्या रक्तवर्णी लाल आणि सोनेरी रंगात आहे जे अत्यंत आकर्षक दिसते  पुस्तकाची भाषा अत्यंत सहज सोपी चटकन समजणारी आहे  . गावाविषयीमाहिती देतांना वर्णनात्मक माहितीवर अधिक भर दिला आहे संख्यातांक माहितीचा भडीमार कऱण्यात आलेला नाही मात्र संखात्मक माहितीकडे अगदीच दुर्लक्ष केले आहे असेही नाही मात्र त्याचे प्रमाण कमी अगदीच गरज लागेल तिथेच सांख्यतम्क माहिती दिल्याने पुस्तक बोजड क्लीष्ट समजण्यास अवघड झालेले नाही तर पुस्तक अत्यंत वाचनीय झाले आहे  पुस्तक वाचायला घेतल्यावर तेवूच नये असे वाटावे अश्या प्रकारे खिळवून ठेवण्यात लेखक यशस्वी झाला आहे पुस्तक माहितीपूर्ण असून देखील सदर  पुस्तक परिपूर्ण नसून निव्वळ  विषयांची तोंडओळख करून देणारे आहे अशा प्राजंळ दावा लेखकाने आपल्या मनोगतातून केला आहे पुस्तकाला ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ यांची प्रस्तावना असून प्रस्तवावनेत त्यांनी संजय बिरार 
 यांच्या उभा धाडसाचे उपक्रम कौतुक केले असून अधिकाधिक व्यक्तींनी अशा प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली आहे

  आपल्याला अनेकदा दुसऱ्या देशाची मोठ्या प्रमाणत माहिती असते मात्र पिकते तिथे विकत नाही या म्हणीप्रमाणे आपण ज्या प्रदेशात राहतो त्या प्रदेशातील व्यक्तीचीच आपणास पुरेशी माहिती नसते   जे कदापि भूषणावह नाही आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून महाराष्ट्रातील प्रत्येकाने किमान नाशिक जिल्ह्यातील त्यातही या ना त्या कारणाने निफाड तालुक्याशी संपर्क असणाऱ्या व्यक्तीने तर हे पुस्तक वाचलेच पाहिजेमग कधी वाचायला घेत आहेत हे पुस्तक 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?