का आणि कसे लिहावे,हे सांगणारे पुस्तक "लिहते व्हा,"


आपल्याकडे सतराव्या शतकात  समर्थ रामदास स्वामी यांनी आपल्या उद्धबोधनात, दिसामंजी काहीतरी लिहावे, असे सांगितले आहे. त्यानंतरही अनेकांनी लिहण्याचे फायदे सांगितले आहेच. लिहण्यामुळे स्मरणशक्ती कसी विकसित होते, यावर देखील अनेकांनी लिहिले आहे.मात्र लिखाण करायचे ठरवल्यावर नक्की लिहायचे तरी काय ? आणि ते कसे सुरू करायचे,? या प्रश्नांबाबत मार्गदर्शन करणारे लेखन आपल्याकडे तसे कमीच.आणि या विषयावर जे लेखन उपलब्ध आहे ते देखील एखाद दुसऱ्या लेखाच्या स्वरुपात.मात्र फक्त याच विषयावर लिहलेले पुस्तक जर आपणास मिळाले तर ? सोन्याहून पिवळे असीच आपली स्थिती होणार हे नक्की. हा दुग्धशर्करा योग आपल्यासाठी जूळवून आणला आहे,नाशिकमधील व्यवसायाने बांधकाम व्यावसायिक , मात्र बाल साहित्याची मोठ्या प्रमाणात निर्मिती करणारे ज्येष्ठ साहित्यिक संतोष हुडलीकर यांनी.पुण्याचा पृथ्वीराज प्रकाशन या प्रकाशनातर्फे प्रकाशित  संतोष हुडलीकर यांच्या या पुस्तकात आपणास या सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतातच तसेच लेखनाविषयी अन्य माहिती देखील मिळते‌.मी नुकतेच हे पुस्तक वाचले.
सुमारे १७६ पानांच्या या पुस्तकात आपणास लेखन कोणत्या विषयावर करावे? ते का करावे? त्यांची सुरवात कमी करावी?लेखनास सुरवात वयाच्या कोणत्या टप्प्यात करावी?पुढील पिढीला आपला सांस्कृतिक वारस्याची माहिती देण्यासाठी लेखन कसे उपयोगी पडते."मरावे परी कीर्तीरूपे उरावे", ही म्हण प्रत्यक्ष आयुष्यात येण्यासाठी लेखन कसे उपयोगी पडते?, लेखन करताना काय काळजी घ्यावी? लेखन करणे आपल्या मनस्वास्थ्यासाठी का आवश्यक आहे? आपल्या लेखनात प्रगती कमी करावी? या सारख्या अनेक प्रश्नांची उत्तरे मिळण्यासह आयुष्यात रोजगाराचे
साधन म्हणून आपण लेखनाकडे कसे बघू शकतो. जर आपण अर्थार्जनासाठी लेखनाकडे बघितल्यास काय काळजी घ्यावी  याची तोंडओळख देखील होते. लेखकाने ही सर्व माहिती सहज सोप्या चटकन समजणाऱ्या,मराठीत विविध प्रकरणातून दिली आहे.प्रत्येक प्रकरणाच्या आधी विषयाला अनुसरून विविध कोट देखील दिले आहेत.त्यामुळे विषय देखील चटकन आणि सहजतेने समजतो.लेखकाने लिहिलेल्या प्रत्येक मुद्यावर मोठ्या प्रमाणात लिहणे सहजशक्य असून देखील वाचकाला कंटाळवाणे वाटू नये,यांचे भान राखत प्रत्येक विषय आटोपशीरपणे मांडला आहे.त्यामुळे पुस्तकांची रंजकता वाढली आहे.एकदा पुस्तक हातात घेतल्यावर पुस्तक हातातून खाली ठेवावे हे वाटतच नाही 
लेखकाने पुस्तकाच्या अखेरच्या काही प्रकरणात सध्याच्या पिढीच्या लेखन न करण्याचा ते टाळण्याचा प्रवृत्तीवर
देखील भाष्य केले आहे.विषय समजावा लेखकाने विविध उदाहरणे देखील दिलेली आहेत. पुस्तकाचा फाँट देखील नेत्रसुखद आहे.त्याबद्दल प्रकाशकाचे देखील कौतूक करायला हवे. एखाद्या मुद्यावर किती लिहावे?किती लिहू नये हे देखील लेखकाने आपल्या लेखनातून मांडलंय कोण लिहू शकतो.कोण लिहू शकत नाही  यावर देखील लेखकाने एका प्रकरणात भाष्य  केले आहे. एका अर्थाने आपल्या लेखनाविषयीच्या सर्व संकल्पना किती खऱ्या आणिकिती  खोट्या आहेत.  हे समजण्यासह लेखनप्रक्रियेविषयी आपल्या जाणिवा वाढवण्याचे काम या पुस्तकामुळे नक्कीच होते. मग वाचणार ना हे पुस्तक.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?