पर्यटनाच्या निमित्ताने (भाग३)


मला हा मजकुर लिहीत असताना अनेकजण मी एसटीच्या मार्फत काढलेल्या सोलो ट्रिप मुळे ओळखतात. आतापर्यंत मी पुर्व विदर्भाचा (नागपूर प्रशासकीय विभाग) अपवाद वगळता आपली एसटी जाते अस्या सर्व कानाकोपऱ्यात अनेकदा फिरलो आहे.या फिरण्याचा प्रक्रियेत मला अनेक भलेबुरे अनुभव देखील आले. ते देखील मी वेळोवेळी पर्यटनाच्या निमित्ताने भाग एक आणि  भाग दोन यामध्ये सविस्तर सांगितले आहेच. ज्यांना ते वाचायचे असतील अस्या व्यक्तींना ते शोधणे सोईस्कर  व्हावे यासाठी त्यांचा लिंक मी खाली देईलच.
   तर माझ्या या प्रवास करण्याची सुरुवात एका अपघाताने झाली.अपघाताने म्हणजे रस्ते, रेल्वेवरील अपघात नव्हे तर माझ्या आयुष्यात अकस्मात घडलेल्या एका घटनेने .जर ती घटना माझ्या आयुष्यात घडली नसती तर मी जास्त फिरलोच नसतो असे म्हणा हवतर  कारण त्या अपघात अकस्मात घडणाऱ्या घटनेच्या आगोदर मी स्वतः एकट्याने फिरायला गेल्याचे आपणास फारसे आढळणार नाही 
  तर मी माझे पत्रकारितेचे शिक्षण संपवून पुण्यात एके ठिकाणी रुजु झालो‌.मी जेव्हा नाशिकहून नोकरी निमित्ताने पुण्यास आलो तेव्हा नाशिक पुणे हा राष्ट्रीय महामार्ग असला आणि नाशिक  ते पुणे अंतर फार जास्त नसले तरी नाशिक ते पुणे या प्रवास सहज सात ते आठ तास लागतं त्यामुळे मला मिळणाऱ्या साप्ताहिक सुट्टीत पुण्याहुन नाशिकला येणे अशक्यच. मात्र माझे रूममेट्स मात्र सातारा या शहरात असल्याने ते त्यांची साप्ताहिक सुट्टी मात्र
आपल्या घरी घालवत असे. मी ज्या ठिकाणी रहात असे त्या ठिकाणी असणाऱ्या अन्य रूममधील व्यक्ती काहीस्या छंदी होत्या.मी पडलो पुस्तकी किडा . त्यामुळे त्यांच्याशी माझे फार सौख्य होणे काहीसे अवघडच ना ! आणि माझ्या अन्य शिक्षणात मी पुणे परिसरातील अनेक किल्यावर मी गेलो होतो.त्यामुळे त्या ठिकाणी परत जाण्यात मला उत्सुकता नव्हती.
एकीकडे असी स्थिती असताना मी जिथे काम करत होतो तेथील कामाच्या स्वरूपामुळे मला पुणे परिसरातील विविध स्थळांची माहिती काढणे क्रमप्राप्त होते‌.त्यासाठी मी पर्याय निवडला तो एसटी बसेसचा. आता मी हाच पर्याय का निवडला इतर खासगी बसेस किंवा टॅक्सी तसेच जीपचा किंवा स्वतः घ्या गाडीचा पर्याय का निवडला नाही ते देवालाच माहीत . कदाचित माझ्यात एसटीची आवड निर्माण करावी असी त्याची इच्छा असावी,आणि इश्वरी इच्छेपुढे कोणाचे काही चालते का? ते आपणास माहिती आहेच .
     तर मी एसटीच्या मार्फत पुण्याचा आसपास फिरायला सुरवात केली. आता पुणे सुटलं तरी माझी आणि एसटीची साथ काही केल्या सुटतं नाहीये. सुरवातीला पुणे परिसरातील विविध स्थळांना भेट दिल्यावर मी अन्य जिल्ह्यांत जसे सातारा कोल्हापूर सोलापूर , अहमदनगर  अस्या पुणे लगतच्या जिल्ह्यात फिरायला लागलो जे अजूनही सूरूच आहे ‌. कामासाठी आवश्यक तेव्हढे फिरल्यावर त्या प्रवाश्यामुळे मला फिरायचा छंदच लागला.आणि तो पुर्ण करायला आपल्या एसटीच्या आवडेल तिथे प्रवास सारख्या योजना  किंवा महाराष्ट्रातील पाचही ज्योतिर्लिंग दर्शन,
अष्टविनायक दर्शन असी पॅकेजेस तयार होतीच . त्याचा वापर करत मी आपल्या महाराष्ट्रातच नव्हे तर महाराष्ट्राच्या लगतच्या गुजरात ,गोवा, कर्नाटक मध्यप्रदेश आदि राज्यात देखील फिरलो आणि अजूनही फिरेल  तूम्ही देखील फिरायला जावे असे माझे स्वानुभवातून आपणास सांगणे आहे ‌.त्यामुळे तूमचे अनुभव विश्व समृध्द होईल यात शंका नाही तूम्ही माझ्यासारख्या एसटीचा वापर नाही केला तरी चालेल मात्र फिरा असे माझे तूम्हाला सांगणे आहे.मग जाणार ना फिरायला?

पहिल्या भागाची लिंक 

दुसऱ्या भागाची लिंक 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?