भारत केनिया संबंध होणार अधिक मैत्रीचे

 


केनिया, आफ्रिका खंडाच्या ईशान्य दिशेला जो गेंड्याचा शिंगासारखा भाग दिसतो (त्याला हॉर्न ऑफ आफ्रिका असी संज्ञा आहे) त्यांच्या खालच्या भागातील हिंदी महासागरातील देश.जो त्या देशापासून सुरु होणाऱ्या खचदरीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. नॅशनल जीओग्राफी या चेनेलवर या देशातील प्राणिजगत देखील आपण अनेकदा बघीतले असेल   आपल्या भारता सारखाच वसाहातवादाचा शिकार झालेला देश म्हणजे केनिया .एकेकाळी क्रिकेटसाठी ओळखला जाणारा देश म्हणजे केनिया 

हे सांगायचे कारण म्हणजे नुकतेच केनियाच्या  अध्यक्षांनी भारताचा तीन दिवसांचा केलेला तर मित्रानो , आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू,यांच्या विशेष आमंत्रणावरून  केनिया प्रजासत्ताकचे अध्यक्ष, .डॉ. विल्यम समोई रुटो यांनी एका उच्चस्तरीय शिष्टमंडळासह ते डिसेंबर दरम्यान भारताचा दौरा केला मागच्या वर्षी पदभार स्वीकारल्यानंतर केनियाचे राष्ट्ट्राध्यक्ष  अध्यक्ष विल्यम रुटो यांचा हा फिलॅसिव्ह दौरा होता या आधी २०१७

साली त्यावेळचे राष्रट्राध्यक्ष उहुरु केन्याटा यांनी भारताचा दौरा केला होता तर पंतप्रधान मोदींनी जुलै 2016 मध्ये केनियाला भेट दिली होती. लोकसभेचे  अध्यक्ष ओम प्रसाद बिर्ला यांनी  सुद्धा वर्षाच्या सुरवातीला  जानेवारीला  केनियालाचा दौरा केला परराष्ट्र मंत्री,डॉ एस जयशंकर हे  जून 2021 मध्ये संयुक्त आयोगाच्या बैठकीसाठी केनियाला गेले होते.

         केनियाचे राष्ट्राध्यक्ष  .डॉ. विल्यम समोई रुटो यांच्या भारत दौऱ्यात वैद्यकीय क्षेत्र, शिक्षण क्षेत्र , क्रीडा क्षेत्र, डिजिटल ट्रान्सपोर्टेशन , बाजार व्यवस्थापन  आदी विविध क्षेत्रात सामंजस्याचे करार (मेमरेंडम ऑफ अन्डरस्टँडीग ) करण्यात आले तसेच राष्ट्रपती  द्रौपदी मुर्मू, यांच्याकडून एका विशेष भोजनाचे देखील आयोजन करण्यात आले होते .या खेरीज अरबी महासागरत भारताचे महत्व अधोरेखित व्हावे यासाठी नौदलाची ताकद वाढवण्याबाबत करावयाच्या उपाययोजनांची देखील यावेळी चर्चा करण्यात आली बंगालच्या उपसागरपासून पॅसिफिक महासागरापर्यंत असणाऱ्या क्षेत्रात भारताचे नाव जगभरात अत्यंत मानाने घेतले जाते तोच कित्ता भारताच्या पश्चिमेकडील समुद्रात घेण्यासाठी काय करता येऊ शकते केनिया याबाबत काय मदत करू शकतो याबाबत यावेळी चर्चा करण्यात आली

   केनिया हा आफ्रिकेतील भारताचा विकास भागीदारीतील एक अतिशय महत्त्वाचा साथीदार आहे.अलीकडच्या काळात केनियातील  तीन प्रकल्पांसाठी भारताकडून देण्यात आलेल्या  सुमारे 100 दशलक्षपेक्षा जास्त क्रेडिट

लाइन्सचा  केनियाला मोठ्या प्रमाणात फायदा झाला . क्रेडिट लाइन्स हा कोणत्याही दोन देशातील कर्जवाटपाचा एक नेहमी चालणारा प्रकार  आहे यामध्ये दीर्घ मुदतीचे कमी व्यजदरातील कर्ज देण्यात येते मात्र कर्ज देताना ज्या देशाकडून कर्ज देण्यात आले आहे त्याच देशातील विविध कंपन्यांकडून विविध प्रकारच्या सेवा घेण्याचे बंधन असणे या सारख्या अटी असतात . केनियाला भारताकडून पुरवण्यात येणाऱ्या  आयटीईसी स्लॉट्सचाही चांगला उपयोग झाला आहे. भारत दरवर्षी सुमारे 250 शिष्यवृत्ती, ITEC स्लॉट, 50 संरक्षण स्लॉट आणि सुमारे 48 ICCR शिष्यवृत्ती प्रदान करतो. आणि अनेक केनियन विद्यार्थी भारतात शिकतात,

 जेव्हा नाम चळवळ हि जोमाने सुरु होती तेव्हा आफ्रिकेमध्ये भारताचा दबदबा होता मात्र भारताचे  नामकडे दुर्लक्ष झाल्यावर भारत आणि आफ्रिका खंडातील देशातील संबंध काहीसे दुरावले ज्याचा फायदा चैनने उचलला आणि आफ्रिकेत मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली मात्र आता हि चूक सुधारत भारत पुन्हा एकदा आफ्रिकेकडे लक्ष देत आहे त्याच मालिकेत नुकतेच आफ्रिकेतील टांझानिया या देशातील झाम्बिर येथे परदेशी भूमीवरील पहिले इंडियन इन्स्टटयूट ऑफ टेक्नॉलॉजि उभारण्यात आले त्याच मालिकेत हा दौरा बघायला हवा

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?