नक्षलवाद्यांची सविस्तर माहिती देणारे पुस्तक :नक्षलनामा

           

  सध्या आपल्या देशातील नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात आलेल्या असला तरी, एकेकाळी या नक्षलवाद्याने देशातील सुरक्षा यंत्रणेची झोप उडविली होती. नक्षलवाद्यांकडून पोलीस प्रशासन, मुलकी प्रशासन (जिल्हाधिकारी, तहसीलदार  उपजिल्हाधिकारी या यंत्रणेस मुलकी प्रशासन म्हणतात)आणि स्थानिक लोकप्रतिनीधींच्या हत्या करणे , ही रोजचीच बाब झाली होती. वृत्तपत्रांचे मथळे सातत्याने या नक्षलवादाने केलेल्या क्रूर क्रमाने भरलेले आढळत. देशासमोरच्या अंतर्गत प्रश्नाचा विचार करता, सर्वात महत्त्वाचा अंतर्गत प्रश्न म्हणून नक्षलवादाचा उल्लेख सातत्याने केला जात असे. देशाचा सुजाण नागरीक म्हणून आता काहीस्या थंडावलेल्या या प्रश्नांची आपणास माहिती असणे अत्यावश्यक आहे. महाराष्ट्राच्या पुर्वेकडील भागाला असणाऱ्या प्रदेशात असणाऱ्या या समस्येबाबत मराठीत तशी मोजकीच पुस्तके लिहली गेली आहेत. त्यातही जी पुस्तके लिहली गेली आहेत त्यापैकी बहुसंख्य अन्य स्त्रोताचा संदर्भ घेवून लिहिलेली आहेत. लेखकाने प्रत्यक्ष त्या प्रदेशात फिरून नक्षलवादी आणि पोलीस अधिकाऱ्यांशी बोलून
मिळालेल्या माहितीनुसार लिहिलेली पुस्तके अजूनच तुरळक.. अन्य स्त्रोतावर विसंबून पुस्तके लिहल्यामुळे अनेकदा त्यात काही विसंगती दिसतात.त्यामुळे मुळातून संशोधन करुन प्रदेश भेटीतून मिळालेल्या पुस्तकांची मजा काही औरच .आणि आपणास ही मजा लूटता येते ज्येष्ठ पत्रकार के. प्रकाश कोळवणकर यांनी लिहिलेल्या नक्षलनामा या पुस्तकामुळे.
          पुस्तकाचे लेखक प्रकाश कोळवणकर हे विद्यार्थी दशेत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते होते.ते दैनिक सकाळमध्ये 10 वर्ष उपसंपादक होते या काळात त्यांनी विविध राज्यांतील निवडकीचे वार्तांकन केले.सकाळमध्ये त्यांनी लिहिलेल्या अनेक वृत्तमालिका गाजल्या . दैनिक सकाळपूर्वी त्यांनी दैनिक तरुण भारत आणि साप्ताहिक विवेकमध्येही त्यांनी काम केले होते.तसेच त्यांचे लेखन साप्ताहिक सोबत,लोकप्रभा आणि महाराष्ट्र टाइस्म,नवशक्ती लोकसत्ता आदि दैनिकांत त्यांनी लेखन केले आहे.या सर्व अनुभवांचे ज्ञानांचे प्रतिबिंब सदर पुस्तकात उमटलेले दिसते.
     या सुमारे 159पानांच्या या पुस्तकात नक्षलवाद आणि आदिवासी जीवन ,सरकारचे अपयश आणि नक्षलवादाचा प्रभाव, नक्षलवाद रोखण्यासाठी करावयाचा उपाययोजनेतील विविध विसंगती, नक्षलवाद्यांचे अंतिम उद्दिष्ट आणि त्यात आदिवासींचे स्थान, विविध नक्षलवादी संघटनांची माहिती, कम्युनिस्ट पक्षाची असणारे नक्षलवाद्यांचे संबंध, मराठी साहित्यात नक्षलवादाविषयीचा उल्लेख  पश्चिम बंगाल आणि तेलंगणा सारख्या राज्यातील साहित्यिकांची नक्षलवादाबाबतची भुमिका,नक्षलवादाचा सुरवात कशी झाली.?
नक्षलवाद्यांची सुरवात ज्या ठिकाणी  झाली तेथील वर्तमान स्थिती यांसारख्या अनेक मुद्यांबाबत आपणास माहिती देते. ते देखील अत्यंत ओघवत्या शैलीत . त्यामुळे नक्षलवादासारख्या कठीण कंटाळवाणा विषयावरील पुस्तक असून देखील विषय आपणास चटकन समजतो. पुस्तक कंटाळवाणे होते नाही.पुस्तकात वापरलेला फाँट देखील डोळ्यांना सुखावणारा आहे 
आता जरी नक्षलवाद बऱ्याच प्रमाणात नियंत्रणात असला तरी जो समाज आपला भुतकाळ विसरतो त्या समाजाचा भविष्यकाळ धूसरं होतो असे वचन आहे.त्या वचनानूसार आपला भुतकाळ सांगणारे पुस्तक आपण वाचायलाच हवे.



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?