भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होणार ?

 

   या वर्षी भारतीय क्रिडाविश्वाचा विचार करता इतिहास घडला आहे. जगातील महत्त्वाच्या आठ बुद्धीबळपटुंचा सहभाग असलेल्या  कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूषांचा गटात तीन तर महिला गटात दोन बुद्धीबळपटू  हे भारतीय आहेत. विद्यमान विश्वविजेत्यांशी कोण लढत देणार ?हे कॅन्डिडेट् स्पर्धेद्वारे ठरते, हे लक्षात घेता,  भारतीय बुद्धिबळपटुंनी किती लक्षणीय कामगिरी केली आहे,हे लक्षात येते‌ .कॅन्डिडेट् स्पर्धेत पुरूष गटात आठ खेळाडू असतात या वर्षी या आठ खेळाडूंपैकी 3 म्हणजे 37.5 टक्के तर महिला गटात आठ खेळाडूंपैकी 2म्हणजे 25टक्के खेळाडू भारतीय आहेत.जगात सुमारे 190 देशात बुद्धीबळ खेळले जाते.त्याचा विचार करता आपल्या बुद्धिबळपटुंनी किती उत्तम कामगिरी केली आहे.हे लक्षात येते. वरील आकडेवारी बघता या वर्षी कोणता तरी भारतीय बुद्धीबळपटू विश्वविजेता होण्याची दाट शक्यता वाटते.ही अव्वल कामगिरी करणारे पुरुष बुद्धीबळपटु आहेत नाशिकचे सुपुत्र सुपर ग्रँडमास्टर विदित गुजराथी, माजी विश्वविजेता मॅग्नस कार्लसन यांना एकाच वर्षात दोनदा हरवण्याचा पराक्रम करणारे ग्रँडमास्टर आर.प्रज्ञानंद , आणि ग्रँडमास्टर डी गुकेश तर महिला गटात ग्रँडमास्टर आर . वैशाली आणि  ग्रँडमास्टर कोनेरु हम्पी .
         कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरण्याचे विविध निकष आहेत. यापैकी एक म्हणजे विश्वचषक स्पर्धेतील अव्वल तीन खेळाडूंमध्ये स्थान मिळवणे. भारताचे १८ वर्षीय प्रज्ञानंद गेल्या वर्षीच्या विश्वचषक स्पर्धेत उपविजेता ठरले होते त्यामुळे यंदाच्या ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरणारे भारताचे ते पहिलेबुद्धिबळपटू होते. त्यानंतर विदित गुजराथी आणि
प्रज्ञानंदची बहीण आर. वैशालीने ‘कॅन्डिडेट्स’ स्पर्धेत प्रवेश मिळवला होता. या दोघांनी ग्रँड स्वीस स्पर्धेचे जेतेपद पटकावण्याची किमया साधली होती. या स्पर्धेतील पुरुष व महिला विभागांमधील अव्वल दोन खेळाडू ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरले.
       तसेच २०२३च्या ‘फिडे’ स्पर्धांच्या मालिकेत (फिडे सर्किट) सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या बुद्धिबळपटूलाही ‘कॅन्डिडेट्स’मध्ये स्थान मिळते. ‘फिडे सर्किट’मध्ये फॅबियानो करुआनाने सर्वोत्तम कामगिरी केली, तर गुकेश दुसऱ्या स्थानी राहिले. मात्र, करुआना यांनी विश्वचषक स्पर्धेत तिसरे स्थान मिळवत ‘कॅन्डिडेट्स’मधील आपली जागा आधीच निश्चित केली होती. त्यामुळे ‘फिडे सर्किट’मध्ये दुसऱ्या स्थानी राहिलेल्या गुकेशल यांनाही कॅन्डिडेट्स’मध्ये प्रवेश मिळाला.वर्षाच्या अखेरीस अनुभवी कोनेरु हम्पी क्रमवारीच्या आधारे ‘कॅन्डिडेट्स’साठी पात्र ठरल्या. जानेवारी २०२४मध्ये क्रमवारीत अव्वल असणारी खेळाडू या प्रतिष्ठेच्या स्पर्धेत स्थान मिळवणार असा निकष होता. अग्रस्थानी असलेल्या चार वेळच्या जगज्जेत्या हू यिफान यांनी ‘कॅन्डिडेट्स’मध्ये खेळण्यास आधीच नकार दिला होता. त्यामुळे क्रमवारीत दुसऱ्या स्थानी असलेल्या हम्पीचा यांचा स्पर्धेत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला 
    कॅन्डिडेट्सध्ये भारतीय खेळाडूंनी यश मिळाल्यास पुरुष गटातील खेळाडू विद्यमान बुद्धीबळ खेळातील पुरुष विश्वविजेता चीनचा नागरीक असलेल्या डिंग लारेन यांना विश्वविजेतापदासाठी आव्हान देतील तर महिला खेळाडू बुद्धीबळ महिला विश्वविजेता असणाऱ्या चीनच्याच  वेन्जून यांना आव्हान देतील गेली चार ते पाच वर्ष भारतीय
बुद्धीबळपटू सातत्याने चमकदार कामगिरी करत आहेत.त्याच्याच पुढचा प्रगत टप्पा म्हणून याकडे बघता येवू शकते‌ या आधी भारतातील ज्येष्ठ खेळाडू सुपर ग्रँडमास्टर विश्वनाथन आनंद हे पुरुष गटात  सलग पाच वर्ष तर  महिलांच्या गटात रॅपिड या उप प्रकारात कोनेरु  हंम्पी यांनी 2019साली. विश्वविजेतेपद मिळवले होते‌.त्यानंतर या वर्षी प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात भारतीय बुद्धीबळपटू कॅन्डिडेट्सध्ये पात्र ठरले आहेत. जे आपल्यासाठी अत्यंत अभिमानाची  बाब आहे.
(सदर लेखासाठी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील नामवंत बुद्धीबळ प्रशिक्षक माधव चव्हाण सर यांचे मोलाचे सहकार्य लाभले)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?