ग्रामीण जीवनाची अनुभुती देणारे पुस्तक "दिसामाजी"*

कोव्हिड 19च्या साथीमुळे लावण्यात आलेल्या लॉकडाउनच्या काळात अनेकांनी या अनाहुतपणे मिळालेल्या या सुट्टीचा वेगवेगळा वापर केल्याचे आपणास आठवत असेलच. बहुसंख्य लोकांनी विविध आरोग्य विषयक उपचार करत यामध्ये स्वतः ला कोरोनापासून दूर ठेवले काही लोकांनी ऑनलाईन पद्धतीचा वापर करत अनेक नवीन कला शिकून घेतल्या. काही जणांनी त्यांची करू करु असे म्हणत अनेक दिवस करायची राहुन गेलेली कामे या काळात केली. तर मुळचे कवी असलेले ज्येष्ठ पत्रकार प्रशांत भरवीरकर यांनी या सुट्टीचा वापर करत, समर्थ रामदास स्वामी यांची "दिसामजी काहीतरी लिहावे" ही शिकवण अंगी बाणवत ,  लेखन केले.कोणतेही लेखन जर पुस्तकरूपाने  प्रसिद्ध झाले तर ते चिरतरूण होते,हे माहिती असल्याने पुढे त्यांनी त्यांचे पुस्तक केले.ग्रंथाली प्रकाशनातर्फे प्रकाशित "दिसामजी" हेच ते पुस्तक. जे मी नुकतेच वाचले.
    प्रशांत भरवीरकर यांचे सुरुवातीचे आयुष्य निफाड तालुक्यात गेले असल्याने, या लेखनाला ग्रामीण जीवनाची पार्श्वभूमी आहे.  सदर पुस्तकात ललितपर असे 45लेख आहेत. लेखांची भाषा आत्मपर आहे. सहज ओघवती असल्याने लेख कुठेही कंटाळवाणे झालेले नाहीत ‌. लेखक मुळात कवी असल्याने साहित्याची मुळात असलेली जाण लेखातून सहजतेने उमटताना दिसते‌.सर्वच लेख आटोपशीर फाफटपसारा न मांडणारे झाले आहेत. त्यामुळे पुस्तक अत्यंत वाचणीय झाले आहेत.एकदा पुस्तक वाचायला सुरुवात केल्यावर कधी संपते ते समजतच नाही.सुमारे 200 पानांच्या  या पुस्तकात शेवटपर्यत आपली वाचनाबाबतची उत्सुकता कायम ठेवण्यात लेखक यशस्वी झाल्याचे पुस्तक वाचून झाल्यानंतर आपणास वाटावे असे हे पुस्तक आहे 
      पुस्तकांची रचना देखील उत्तम आहे.पुस्तक नेहमीच्या आकारातील नसुन काहीसे कॉफी टेबल्स बुक जसी रूंद असते तसे आहे..पुस्तकाचे मुखपृष्ठ आपली नजर पुस्तकाकडे वेधण्यात यशस्वी होते. ग्रामीण संस्कृती किती महान आहे हे आपणास पुस्तकाचे मुखपृष्ठ बघूनच समजते.पुस्तकाच्या अंतरंगात चित्रे जवळपास नसली तरी छपाईचा  फाँट उत्तम असल्याने पुस्तक वाचताना फक्त अक्षरेच आहेत,हे बघून कंटाळवाणे वाटत नाही.दिवसभर काम करुन दिवसांच्या अखेरीस रात्री शांत झोप लागावी,या हेतूने काही रम्य वाचायाची इच्छा असणाऱ्या व्यक्तींनी वारंवार वाचावे असे पुस्तक म्हणजे ,"दिसामाजी" हे पुस्तक होय असे मला वाटते‌.सहजसोपे अनुभव देखील किती रंजक पद्धतीने मांडता येवू शकतात ,हे आपणास या पुस्तकवाचनातून समजते‌ .समर्थ रामदास स्वामी यांच्या दिसामाजी काहीतरी ते लिहावे या उपदेशाची आठवण हे पुस्तक वाचताना होते‌‌.  सध्या अनेक ठिकाणी मराठी आणि इंग्रजी या भाषेची भेळ असलेली मिंग्लिश भाषेत लिहलेले आढळते .दिसामंजी या पुस्तकात या भाषेचा लवलेष देखील आढळतो नाही. पूर्णतः मराठी भाषेत सदर पुस्तक लिहलेले आहे.मात्र मराठीत लिहलेले आहे,म्हणजे ग्रंथप्रामाण्य मानत बोजड समजण्यासाठी अवघड अस्या शद्बांचा वापर केला असेल असे समजण्याचे काही कारण नाही.पुर्ण मराठी शद्ब वापरले तरी सहजसोपे कोणत्या पद्धतीने लिहीता येते हे सदर पुस्तक वाचल्यावर आपणास समजते‌.
पुस्तकात 45 लेख असले तरी त्यांची एक सुंदरशी गुंफून लेखकाने केलेली आढळते.प्रत्येक लेख एक स्वतंत्र्य असला तरी एक लेख वाचून झाल्यानंतर दुसरा लेख आपण पुर्णतः वेगळेच काहीतरी वाचत आहोत असे वाटत नाही तर एखाद्या फुलांच्या एका पाकळीतून दुसऱ्या पाकळीत जावे इतकी सहजता लेखकाने आपल्या लेखनात साकारली आहे 
मग वाचणार ना हे पुस्तक.

 अजिंक्य तरटे 
९५५२५९९४९५ 
९४२३५१५४०० 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?