माझे वाचन .... (भाग १ )

               


        कालचीच गोष्ट आहे , मला एका मित्राने  फोन  करून त्याच्या मुलाची व्यथा ऐकवली . त्यांची व्यथा अशी होती की, कितीही सांगितले.. विविध उपाय केले तरी त्याचा मुलगा काही केल्या वाचतच नव्हता . आपल्या मुलाने चांगले वाचनवीर व्हावे अशी इच्छा माझ्या मित्राची इच्छा होती मात्र त्याचा मुलगा काही केल्या ती पूर्ण करत नव्हता अखेरचा उपाय म्हणून तो माझ्याकडे आला होता तसा बघायला गेलो तर माझ्या मित्राने उपस्थित केलेला हा फक्त त्याचा एकटाच प्रश्न नाहीये .आजकाल अनेकांना या प्रश्नाने ग्रासलंय त्या अर्थी हा प्रश्न सामाजिक झाला आहे त्यामुळे हा प्रश्न अक्राळविक्राळ स्वरूप धारण करण्याच्या अगोदर त्याचे निराकारण करण्याच्या प्रयत्न केल्यास उत्तम या वचनानुसार हा प्रश्न सोडवण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न म्हणजे सदर लेखन आहे 
   तर मित्रानो मुलांच्या वाचनाची सुरवात होते ती पालकांपासून . पालक जर वाचणारे असतील तर मुले सुद्धा वाचायला लागतात हा सर्व साधारण इतिहास आहे  बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार करता  , ते नेहमी, मुले नेहमी मोठ्याच्या सांगण्यातून नव्हे तर कृतीतून शिकतात . मोठी जी कृती करतात तशीच कृती त्यांना करायची असते . असे सांगतात त्या न्यायाने जर आई वडील जर वाचणारे असतील मुले  सुद्धा वाचायला शिकतात त्यांना
वेगळे सांगावे लागत नाही.  माझे आई आणि वडील दोघेही उत्तम वाचक होते त्यांच्या वाचनाचा संस्कार माझ्यावर झाला आणि मी वाचायला लागालो ते इतके कि माझ्या काही मित्रांनी मला जिवंत खराखुरा सखाराम गटणे असे म्हणायला देखील लागले असो याच वाचनातून मी लिहायला लागलो ज्याचा अविष्कार आपण बघतच आहात असो मी प्रामुख्याने कोणती पुस्तके वाचतो ? तीच पुस्तके का वाचतो ? अन्य प्रकारची पुस्तके का वाचत नाही यावर मी याच लेखाच्या दुसऱ्या भागात बोलले असो 
                  आपण बाल  मानसशास्त्रज्ञांच्या विचार आपण जरा बाजूला ठेवूया क्षणभर,  आपल्या मराठीतच अनेक म्हणी वाक्यप्रचार  आहेत जे मुलांमध्ये एखादी गोष्ट विकसित करण्यामध्ये त्यांच्या पालकांची मोठी भूमिका असल्याचे दाखवूंन देतात जसे "खाण तशी माती " , आडातच नसेल तर पोहऱ्यात कोठून येणार .?  वगैरे  आता आई वडीलच फारसे वाचवणारे नसतील तर मुलांनी वाचले पाहिजे हा हट्ट धरण्यात काही अर्थ नाही जर पालकांनाच  वाचायला वेळ नसेल तर मुलांना देखील वाचायला वेळा नसणार हे उघड उघड गुपित आहे त्यामुळे आजकालची मुले वाचता
नाहीत अशी आरोड करणाऱ्या व्यक्ती किती वाचतात हे बघायला हवे या ठिकाणी कोणत्या भाषेत वाचतात ?कोणत्या प्रकारचे साहित्य वाचतात ?हा मुडदा फारशामहत्त्वाच्या नाही तर व्यक्तीने वाचायला हवे हा आहे ?  आता पुस्तक वाचायला सुरवात केल्यावर एखाद्या विषयात कशी काय गोडी निर्माण होते यावर मी याच लेखाच्या दुसऱ्या भागात बोलेल . तो पर्यंत सर्वांना जय महाराष्ट्र !

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?