माझे वाचन (भाग २ )

    


आपल्या पाल्याने वाचन करावे यामध्ये पालकांची काय भूमिका असते ?  हे आपण मागच्या भागात बघितले   या भागात आपण एखाद्याला ठराविक विषयावरची पुस्तके वाचायला कसे काय आवडू शकते ? यावर बोलूया . एखाद्यास ठराविक विषयाची पुस्तके आवडण्यात  त्याच्या सभोवातालच्या व्यक्ती कोणत्या प्रकारचे पुस्तक वाचतात तसेच पुस्तक वाचनास सुरवात करताना त्यास कोणत्या प्रकराची पुस्तके वाचायला मिळाली ? याचा मोठा प्रभाव असतो या खेरीज व्यक्तीच्या शैक्षणिक आणि व्यावसाईक गरजेचा देखील मोठा प्रभाव असतो ? जर एखाद्यास आयुष्याच्या एखाद्या टप्प्यावर विशिष्ट विषयाची पुस्तके वाचणे क्रमप्राप्त झाले तर आयुष्याच्या पुढील टप्यावर त्या विषयाची पुस्तके वाचायची गरज नसली तरी एखादा व्यक्ती त्याच विषयाची पुस्तके वाचू शकतो 

 माझ्याबाबत बोलायचे झाल्यास मी शाळेत असताना माझ्या शाळेच्या ग्रंथपाल असणाऱ्या मॅडम आम्हाला सातत्याने सांगत असत , अरे तुम्ही विविध विषयाची माहिती देणारी पुस्तके वाचायला हवी विविध साहित्यकृती वाचायचे हे तुमचे वय नाही .तुम्ही साहित्यकृती नंतरच्या आयुष्यात वाचू शकता सध्या तुम्ही विविध प्रकारची माहिती देणारी पुस्तके वाचून स्वतःचे सामान्यज्ञान वाढवले पाहिजे.  त्या आम्हाला जी पुस्तके निवडण्यास देत त्यातही विविध

प्रकारची माहिती देणारीच पुस्तके असे. विविध प्रकारच्या साहित्यकृती त्यामुळे मी बऱ्याच उशिरा वाचल्या पुढे मी स्पर्धा परीक्षेच्या तयारीच्यादरम्यान पुन्हा एकदा मी माहिती देणारी पुस्तके वाचायला सुरवात केली त्यामुळे माझ्यामध्ये माहितीची पुस्तके वाचायची  आवड निर्माण झाली . जे तुम्ही माझ्या फेसबुक अकाउंटवरील माझे वाचन या फोटो अल्बम किंवा याच ब्लॉगवर मी ज्या पुस्तकांची ओळख करून देतो त्याचे अवलोकन केल्यास  सहज लक्षात सुद्धा येईल 

माझ्या आतापर्यतच्या अनुभवानुसार सांगतोय मी ज्या प्रकारचे वाचन करतो तेच वाचन उत्तम असे समजणे चुकीचे आहे. जर कोणी साहित्यकृतीचे वाचन करत असेल तर ते  देखील योग्यच ठरेल. वाचनाचा कोणताच प्रकार योग्य किंवा अयोग्य नाहीये . वाचनाच्या प्रत्येक जातकुळीचे काही फायदे आहेत, तसेच तोटे आहेत.आता फक्त तोटे बघत, एखाद्या वाचनाच्या प्रकारास अयोग्य ठरवणे, पुर्णतः चूकीचे आहे.आता मी प्रामुख्याने ज्या प्रकारची पुस्तके वाचतो, त्यामुळे मला विविध विषयांचे ज्ञान होत असले तरी, भाषाशैली,शद्बांचे भांडार याबाबत मी काहीसा मागे पडतो,हे नाकारण्यात काही अर्थ नाही.माझ्याउलट जर एखादा

जण साहित्यकृती वाचत असेल तर, भलेही त्यांचे ज्ञान कमी असेल, मात्र तो शद्ब साठ्याबाबत प्रचंड  श्रीमंत असेल ,हे सुद्धा नाकारण्यात अर्थ नाही.आता विविध प्रकारचे ज्ञान,की विपूल प्रकारचा शद्बसाठा यापैकी कश्याला महत्व देयचे?आणि कश्याला नाही,? हे पूर्णपणे व्यक्तीवर अवलंबून आहे.त्याबाबत काहीही सांगणे सहजशक्य नाही. कोणत्याही प्रकारचे असले तरी चालेल मात्र ती व्यक्ती वाचन करत आहे का? याला महत्त्व देयला पाहिजे असे मला वाटते कारण अखेर वाचाल तर वाचाल!

या लेखाचा पहिला भाग वाचायचा असल्यास पुढील लिंकवर क्लिक करा 


https://ajinkyatartebookreview.blogspot.com/2024/02/blogpost_22.html?m=1

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?