नाशिकची इत्यंभूत माहिती देणारे पुस्तक, "तपोभूमी नाशिक"

नाशिक, महाराष्ट्रातील चवथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे शहर.स्वातंत्र्यवीर सावरकर,दादासाहेब फाळके, श्रीपाद अमृत डांगे, यांच्यासारख्या अनेक नामवंत व्यक्तींची जन्मभूमी असणारे शहर.जगात ज्या ४ ठिकाणी कुंभमेळा भरतो त्यातील एक ठिकाण म्हणजे नाशिक.खाद्यपेयांचा विचार करता द्राक्ष वाइन निर्यातीद्वारे आपल्या भारताला मोठ्या प्रमाणात परदेशी चलन मिळवून देणारे शहर म्हणजे नाशिक ‌. तर अस्या नाशिकची इतिहास काळापासून जडण घडण कशी झाली.दक्षीण काशी असी ओळख असणाऱ्या या शहर आणि परिसरात कोणकोणती मंदिरे आहेत? त्यांचा इतिहास काय आहे? तसेच प्राचीन काळात नाशिकला  कोणकोणत्या परदेशी पर्यटकांनी भेट दिली आहे? नाशिकचे सांस्कृतिक जीवन कोणत्या पद्धतीने समृध्द आहे? नाशिकची प्रसिद्ध व्यक्तिमत्वे कोणती? नाशिकची जगभरात ओळख असणारा कुंभमेळा मुळात काय आहे? कुंभमेळा कस्या प्रकारे आयोजित करण्यात येतो?नाशिक परिसरात कोणकोणत्या लेण्या आहेत? नाशिक परिसरात नाशिक वगळता कोणकोणती धार्मिक स्थळे आहेत? या सारख्या नाशिकविषयी आपणास पडणाऱ्या असंख्य प्रश्नांची योग्य उत्तरे आपणास हवी असतील तर आपणास महाराष्ट्र टाइम्समध्ये कार्यरत असणारे ज्येष्ठ पत्रकार रमेश पडवळ सरांनी लिहलेल्या तपोभूमी नाशिक या पुस्तकाखेरीज अन्य सक्षम उपाय तो कोणता? मी नुकताच नाशिकमधील महत्त्वाची सांस्कृतिक संस्था असणाऱ्या सार्वजनिक वाचनालय नाशिक अर्थात सावनाच्यामार्फत वाचले.
 
नाशिक्रामणिका या प्रकाशनातर्फे प्रकाशित या पुस्तकात सुमारे २०४ पानांच्या या पुस्तकात सहजसोप्या भाषेत,ओघवत्या भाषेत वर सांगितलेल्या गोष्टींची माहिती दिली आहे. पुस्तक माहितीवर आधारित असले तरी अन्य माहितीच्या पुस्तकांप्रमाणे हे पुस्तक रटाळ कंटाळवाणे झालेले नाही.तर वाचकांची नाशिकच्या बाबतचे जाणून  घेण्याबाबतची भुक  काही प्रमाणात वाढवणारे,आणि या वाढलेल्या भुकेची तितक्याच ताकदीने पुर्तता करणारे झाले आहे. पुस्तक वाचतांना कुठेही  कंटाळा येणार नाही,याबाबत लेखकाने काळजी घेतल्याचे पुस्तक वाचतान सहजतेने लक्षात येते‌.पुस्तकात पहिल्या परिच्छेदात सांगितलेल्या प्रश्नांची प्रकरणनिहाय माहिती देण्यात आलेली आहे.आपण पुस्तकाचे लेखक रमेश पडवळ सर यांना त्यांच्या मटा हेरीटेज वॉकमुळे ओळखतो‌.मटा हेरीटेज ,वॉकच्या वेळी दिसणारे त्यांचे व्यक्तीमत्तातील गुणवैशिष्टे,अभ्याक त्यांचा,या पुस्तक लेखनात सुद्धा जाणवतो.सदर पुस्तकाच्या शेवटी देण्यात आलेली संदर्भसुची त्यांनी पुस्तक निर्मितीसाठी घेतलेले कष्ट दाखवून देते‌.सध्याचा इंटरनेटच्या काळात एखाद्या परीसराविषयी माहिती सहजतेने उपलब्ध असताना तीच कॉपी पेस्ट न करता संदर्भग्रंथ अभ्यासून पुस्तक लिहल्यातून त्यांची पत्रकारीता किती उच्च दर्ज्याची आहे,हे समजते‌ महाराष्ट्र टाइम्स सारख्या

नामांकित वर्तमानपत्रात विविध जबाबदाऱ्या सांभळत त्यांनी सदर लेखन केले आहे ‌,जे खरोखरीच कौतूकास्पद आहे.समर्थ रामदास स्वामी यांची"दिसामंजी काहीतरी लिहावे,शहाणे करुन सोडावे सकल जन " ही उक्ती रमेश पडवळ सरांनी सार्थ केल्याचे पुस्तक वाचताना जाणवते.
आपण ज्या प्रदेशात राहतो, तेथील माहिती असणे,हे चांगल्या व्यक्तीमत्वाची ओळख आहे ‌.त्यामुळे किमान नाशिककरांनी हे पुस्तक वाचायलाच हवे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?