ग्रेनीयर वर्ष २०२३चा सविस्तर वृत्तांत "लोकसत्ता वर्षवेध २०२३"



स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींना गेल्या काळातील चालू घडामोडींचा अभ्यास चटकन होण्यासाठी अत्यंत उपयोगी पडणारा घटक म्हणजे इयर बुक.वर्षभर वर्तमानपत्रांची टिपणे काढून सुद्धा अनावधानाने टिपणातून सुटलेला मुद्दा विषय यांची उजळणी करण्याचा कामात स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या उमेदवारांना ही इयर बुक खुपचं उपयुक्त ठरतात. वर्षभरातील महत्त्वाच्या सर्व मुद्द्यांची माहिती एकाच ठिकाणी मिळत असल्याने, ती वाचून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या उमेदवारांचा वेळ देखील मोठ्या प्रमाणात वाचतो‌.स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तीं खेरीज पत्रकारांना एखाद्या मुद्द्यावर लेखन करताना संदर्भ म्हणून ही इयर बुक महत्त्वाची ठरतात.इंग्रजीत या प्रकारची अनेक इयर बुक गेल्या कित्येक वर्षांपासून प्रसिद्ध होत आहेत.मात्र त्यांचा वापर करण्यासाठी इंग्रजीवर हुकुमत असणे आवश्यक आहे. आज २०२४साली  देखील अनेक व्यक्ती अस्या आहेत की,,ज्यांची इंग्रजीवर फारशी हुकूमत नाही ‌एम‌.पी.एस.सी. ची तयारी करणारे विद्यार्थी, ग्रामीण भागातील पत्रकार अस्या प्रकारचा मोठा वर्ग यात समाविष्ट  होतो‌. हा वर्ग सदर माहिती इंग्रजीत असल्याने या इयर बुक पासून दूर आहे ‌परीणामी बुद्धीमत्ता असून देखील योग्य अभ्यास साहित्याचा अभावी ते स्पर्धेत मागे पडतात.एम.पी एस.सी खेरीज केंद्रीय स्तरावरील स्पर्धा परीक्षेची मराठी भाषेत तयारी करणारे विद्यार्थी देखील यात समाविष्ट होवू शकतात,यांना स्पर्धेत सहभागी होण्यासाठी ईयर बुक ही संकल्पना मराठी भाषेत असणे आवश्यक आहे.नेमकी हीच बाब हेरून गेली ११वर्ष लोकसत्ता वर्षवेध या नावाने इयर बुक काढत आहे.लोकसत्ता तर्फे २०२३या वर्षातील इयर बुक अर्थात वर्षवेध मी नुकतेच वाचले.
लोकसत्ता या दैनिकामार्फत प्रकाशित या वार्षिकात आपणास गेल्या २०२३या वर्षातील घटना या विविध प्रकरणांद्वारे सविस्तर अभ्यासता येतात. लोकसत्ता वर्षवेध मध्ये घटनांचे राज्यस्तरीय, राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय, , असे प्रदेशानुसार ,तसेच क्रिडा, आर्थिक राजकीय, सामाजिक,चर्चेतील व्यक्ती असे विषयानूसार वर्गीकरण केले आहे.ज्यामुळे या
घटना अभ्यासणे सोईचे जाते. या वार्षिकात फक्त दिनांक आणि त्या दिवशीची घटना असे दिलेले नसुन, काही लेख देखील समाविष्ट करण्यात आले आहेत.ज्यामुळे चालू घडामोडींचा अभ्यास करणाऱ्या व्यक्तींचा मोठा फायदा होतो‌ मी वर्षवेधचा सुरवातीपासूनचा वाचक आहे‌.सुरवातीच्या काही अंकामध्ये  लेख समाविष्ट नव्हते‌.मात्र गेल्या काही वर्षात प्रसिद्ध होत असणाऱ्या वर्षवेधमध्ये लेख समाविष्ट करण्यास त्यांनी सुरुवात केली आहे,ज्यामुळे अंकाचे उपयोगिता मुल्य खुपचं वाढले आहे.वर्षवेधमध्ये प्रसिद्ध होणाऱ्या लेखांचा वेगळा विभाग यावेळी नाहीये‌.तर अंकात विखुरलेल्या स्वरुपात लेख प्रसिद्ध करण्यात आले आहेत‌.लेख ज्या विषयावरील आहे‌.त्या विषयक घटना सांगितल्यानंतर लेख यावेळी प्रसिद्ध करण्यात आला आहे.यापुर्वी लेखांचा स्वतंत्र विभाग असे घटनांची तारखेनुसार माहिती देणारा एक विभाग आणि लेखांची माहिती देणारा दुसरा विभाग असे लोकसत्ता वर्षवेधचे स्वरूप असे जे यावेळी मोठ्या प्रमाणात बदलण्यात आले आहे.
     लोकसत्ताच्या संपादकीयामधून मांडण्यात येणाऱ्या राजकीय मतांमुळे लोकसत्ता अनेकांचा नावडता पेपर आहे,मात्र स्पर्धा परीक्षेची तयारी करताना आवश्यक असणाऱ्या सांख्यिकी माहिती तसेच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय घडामोडींची सविस्तर माहिती हवी असल्यास मराठीमध्ये लोकसत्ता शिवाय दुसरा पर्याय नाही,हे देखील तितकेच खरे आहे.त्यामुळे लोकसत्ताने प्रसिद्ध केलेल्या या इयर बुकचे वाचन त्यांची राजकीय मते क्षणभर बाजूला ठेवून स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त म्हणून केल्यास स्पर्धा परीक्षेत यशस्वी होणे अवघड नाही‌.फक्त स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या व्यक्तींनी नाही तर देशाचे जवाबदार नागरीक होण्यासाठी देखील लोकसत्ता वर्षवेध वाचायलाच हवा.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?