अपघाती मृत्यू, एक गंभीर गोष्ट

                           शनिवारी सायंकाळी टिव्हिवर बातम्या बघत  असताना एक बातमी ऐकली आणि मनात
धस्स झाले. बातमी महाराष्ट्रात  शनिवरी झालेल्या अपघाताती मृत्यू संबधित होती . मृत्यकांमध्ये  बहुतांशी तरुणाई होती . त्यामुळे अजूनच गांभिर्य  वाढले . यातील सर्वाधिक मोठा अपघात पुणे सोलापूर रस्त्यावर होता . या मागच्या कारणाचा मी वेध घेतला असता मला काही बाबी निर्दशनास आल्या . त्या सांगण्यासाठी आजचा लेखनप्रपंच
                    काही जण वाहतूक नियमांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आणि सुरक्षेचे नियम लक्षात न घेतल्यामुळे हे मृत्यू झालेले आहेत ,असे म्हणत अधिक कठोर नियम लागू करण्याचा प्रस्ताव सादर करतील . जे मला बिलकुल मान्य नाही .माझ्या मते बहुसंख्य अपघात हे सदोष रस्त्यामुळे होतात . मी अनेकदा पुणे सोलापूर रस्त्यावर फिरलो आहे ,मला या रस्त्यावर काम सुरु असताना कुठेही त्याची माहिती देणारे फलक दिसलेले नाहीत . खराब रस्ते मधुनच दिलेले डायव्हर्सन्स , यामुळे  पुणे सोलापूळ रस्त्यावर बहुसंख्य अपघात होतात,  असे माझे निरीक्षण आहे . पिंडी ते ब्रम्हांडी या न्यायाने सर्वत्र अशीच स्थिती असेल असे मानन्यास हरकत नसावी .
                        सर्वसामान्य प्रवास्यांवर वाहतूक नियम भंग केल्यावर अवाच्या सव्या दंड आकरणारे सरकार  या बाबत काय कार्यवाही करणार ? त्याबाबत सर्वसामान्य जनता सरकारला काही दंड करु शकते का ? चुकीच्या
पद्धतीने उभारलेले गतिरोधक ,अयोग्य ठिकाणी उभारलेले गतिरोधक यामुळे झालेल्या अपघाताला सर्वसामान्य प्रवासी कसे काय जवाबदार ? नाशिक ते औरंगाबाद या राज्य महामार्गावर नाशिक ते निफाड या 40 किलोमीटरच्या रस्त्यावर तब्बल 38 गतिरोधक आहेत . मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर नाशिक जवळील कोकणगाव जवळील अपघातात मृत्युमुखी पडलेल्या डाँक्टरांचा अपघात हा सदोष गतिरोधकांमुळे झाला होता , हे विसरुन चालणार नाही . अश्या मृत्यूबाबत सरकार काय भूमिका घेते हे बघणे अत्यंत आवश्यक आहे .तरच हे अपघात टाळता येतील . लोक दंडाच्या भितीने वाहतूकीचे नियम पाळतील सुद्धा मात्र सरकारी अनास्थेचे काय करायचे हा प्रश्न उरतोच ? त्यावर योग्य उत्तर  मिळाल्यासच सरकारच्या अपघात नियंत्रण मोहिमेला यश प्राप्त होईल , असे मला वाटते . यावर बरेच काही करता येण्यासारखे आहे . ते  केले जावे इतके बोलून आजपुरती रजा घेतो ,नमस्कार .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?