राष्ट्रकुल स्पर्धा , भारतीय माध्यमात न आलेल्या

            कर्नाटक राज्यात सत्तेचा खेळ सुरु आहे . त्याचा बरोबर महाराष्ट्रात विधानसभा  निवडणुकीचे वारे
वाहत आहे . अन्य काही राज्यात झुंडशाहीमुळे  अनेक लोकांच्ये बळी  जात आहे. काही राज्यात अतिरिक्त पावसामुळे तर काही राज्यात दुष्काळसदृश्य स्थितीमुळे भयानक स्थिती निर्माण झाली आहे.  या बातम्या
आपण माध्यमातून बघतो , मात्र भारतात एव्हढेच सुरु नसून भारतात विविध ठिकाणी विविध खेळाच्या राष्ट्रकुल स्पर्धा सुरु आहेत .
               दिल्ली येथे बुद्धिबळ या खेळाच्या  राष्ट्रकुल स्पर्धा नुकत्याच संपन्न झाल्या . सध्या कटक या शहरात टेबल टेनिस  या खेळाच्या राष्ट्रकुल स्पर्धा मोठ्या दिमाख्यात सुरु आहे . प्रिया देशपांडे यांच्यासारखे अनेक खेळाडू बलाढ्य अश्या ऑस्ट्रोलिया आदी देशाच्या खेळाडूंना  सहजतेने  पराभवाचे पाणी पाजत आहेत  . दुर्देवाने भारतीय माध्यमात या विषयी फारशे काही बोलले जात नाहोये . एका हाताच्या बोटावर मोजता येईल एव्हढ्या देशात खेळल्या जाणाऱ्या क्रिकेट विषयच आपल्याकडे चर्चिला जातोय . त्यातील काही खेळाडूंच्या  निवृत्तीविषयी गहण चर्चा आपण करतो /मात्र सध्या देशाचे नाव जगात  गौरवशाली करणाऱ्या याखेळाडूंविषयी
एका क्षणाचीही चर्चा आपण करत नाही . हे चित्र बदलायला हवे /
क्रिकेटच्या विश्वचषक सुरु असताना विबल्डन  आणि टूर दि फ्रांस या दोन मोठ्या स्पर्धा झाल्या मात्र आपल्याकडे याविषयी काहीही बोलले गेले नाही . कदाचित सायकलिंग आणि टेनिस हे खेळ क्रिकेटपेक्षा कमी लोकप्रिय असल्याने हे होत असावे असे म्हणावे तर क्रिकेटचा विश्वचषक संपल्यावर खूप काळ उलटला तरी अंजुन  या चित्रात सकारात्मक बदल झालेला नाही . काय आपले दुर्दैव यात सकारात्मक बदल होईल तो सुदिन म्हणायला  हवा  सध्या भारत आर्थिक स्तरावर जागतिक महासत्ता म्हणून उदयास येत आहे , त्या बरोबर क्रीडा क्षेत्रातील महासता म्हणून उदयास आलायस दुग्धशर्करा योगच म्हणायला हवा तो लवकरात लवकर येवो  हि ईश्वर चरणी प्रार्थना करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?