भारतीय रेल्वेची अपरिचित कहाणी भाग 2

भारतीय रेल्वेच्या पसारा खूप मोठा आहे . रेल्वेच्या संचलनासाठी त्याची विभागणी 17 विभागात करण्यात
आली आहे . या विभागाची विभागणी 68 उपविभागात करण्यात आली आहे . जसे नागपूर उपविभाग , भुसावळ उपविभाग , मुंबई उपविभाग वगैरे . तसेच रेल्वेच्या कार्याला साह्यभूत  ठरतील अश्या 16 उपकंपन्या देखील स्थापन करण्यात आल्या आहेत . या उपकंपन्यांतील 8  उपकंपन्यांची माहिती याचा आधी घेतली . आता  उरलेल्या कंपन्यांची ओळख करून घेऊ . ज्यांना आधी करून देण्यात आलेल्या कंपन्यांची ओळख करून घेयांची असेल त्यांनी या लेखाच्या शेवटी दिलेल्या लिंकवर क्लीक करावे . 
 (1) RITS भारतासह भारताबाहेरील रेल्वेमार्गाचे प्राथमिक नियोजन करणे , त्यांची उभारणी,  त्यांचे संचलन आणि यासाठी करावयाचे  तांत्रिक तसेच अभियांत्रीकी साह्य यासाठी या उपकंपनीची स्थापना 1974 साली करण्यात आली . बांगलादेश , म्यानमार ,या शेजारीदेशांसह , केनिया इथोपिनीया ,बोस्टनवा , केनिया बेनिन आदी आफ्रिकी देशात या उपकंपनीने  आपली सेवा दिली आहे . 
(2)CONCOR  रेल्वेच्या प्रसिद्ध अश्या उपकंपन्यांपैकी एक म्हणून CONCOR ओळखली जाते .  देशांर्गत आणि परदेशी माल  वाहतुकीसाठी कंटनेरची मदत करण्यासाठी या कंपनीची स्थापना 1988 साली करण्यात आली . 
(3)KRCL  सन 1990 साली स्थापन करण्यात आलेल्या या उपकंपनीचे काम म्हणजे रेल्वे मार्गाची उभारणी करणे आणि  , रेल्वेमार्गाला  ज्या ठिकाणी रस्ता मार्ग छेद देतो अश्या ठिकणी पुलाची निर्मिती करणे . 
(4)RVNL रेल्वे संरचनेची क्षमता तयार करणे आणि वाढविणे. बहुतेक बहुपक्षीय / द्विपक्षीय निधी संस्थांच्या माध्यमातून आणि प्रकल्पांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी घरगुती मार्केटद्वारे संसाधने एकत्रित करणे.यासाठी या उप कंपनीची स्थापना 2003 साली करण्यात आली . 
(5)DFCCIL माल वाहतुकीसाठी अधिकाधिक सोइ उपलब्ध करून देण्यासाठी या कंपनीची स्थापना 2006 साली स्थापन करण्यात आली . 
(6)BWEL    वैगन्स तयार करणे आणि स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन जॉब्स करणे यासाठी सन 1978 साली स्थापन करण्यात आली . 
(7) BSCL   रेल्वे रोलिंग स्टॉक तयार करण्यासाठी या कंपनीची स्थापना 1976 साली करण्यात आली . 
(8)  BCL    वैगन्सचे  उत्पादन, स्ट्रक्चरल फॅब्रिकेशन जॉब्स आणि मॅन्युफॅक्चरिंग उपक्रम, ईओटी क्रेनची परतफेड आदी कार्यासाठी या उपकंपनीची स्थापना 1976 साली करण्यात आली . 
भारतीय रेल्वेची प्राथमिक  ओळख या ठिकाणी मी तुम्हाला करून दिली .भारतीय रेल्वे  प्रचंड मोठी संस्था आहे . केंद्रीय लोकसेवा आयोग मार्फत आणि रेल्वेच्या 2 स्वायत्त संस्थांमार्फत ह्यासाठी मनुष्यबळ उभारले जाते . त्याविषयी  नंतर सांगेल तो पर्यंत  नमस्कार . 
माझ्या मागच्या लेखासाठी पुढील लाईनवर क्लीक करा . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?