व्यथा एका दुर्लक्षित भारतीय जगजेत्तीची

              सध्या  समस्त पारंपरिक भारतीय माध्यमे जसे वृत्तवाहिन्या , वृत्तपत्रे , रेडिओ ,  नववर्षाच्या आनंदांच्या बातम्या देत असताना या आनंदात दुधात साखर म्हणावी अशी  एक बातमी त्यांच्याकडून निसटून गेली आहे . ती सगळ्या लोकांपर्यंत पोहोचावी ,आणि त्यांचा आनदं व्दिगुणित  व्हावा   म्हणून या समाज  माध्यमाचा मार्फत मी आपणासी हा संवाद साधत आहे . आणि ती बातमी आहे .भारताची आघाडीची बुद्धिबळ महिला ग्रँडमास्टर असणारी कोनेरू हंपी यांनी महिला बुद्धिबळ खेळाडूंच्या जलदगती या प्रकारच्या स्पर्धेत जागतिक अजिंक्यपद मिळवण्याची . मित्रांनो , पुरुष गटात  विश्वनाथ आंनदच्या गैरहजेरीत खेळणाऱ्या भारतीय पुरुष खेळाडूंच्या या स्पर्धेत क्रमांक लागलाय तो 40 . यावरून तुम्ही या स्पर्धेची काठिण्य पातळी काय असेल याचा अंदाज घेऊ शकता .
हा विजय आणखी एका कारणाने मह्त्वाचा आहे ते म्हणजे आई झाल्यावर सन 2016ते 2018 हे दोन वर्ष त्या स्पर्धात्मक बुद्धिबळापासून पूर्णतः अलिप्त होत्या . जे कोणत्याही खेळ अथवा कलेशी निगडित व्यक्ती आहेत
.अश्या व्यक्तींना 2 वर्ष पूर्णतः  अलिप्त राहून त्यानंतर पुनरागमन करत थेट जागतिक विजेतेपद मिळवणे किती कठीण आहे , याची जाणीव असेल कोनेरू हंपी यांनी  वयाच्या 15व्या वर्षी महिलांच्या बुद्धिबळ क्षेत्रातील  अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा महिला ग्रँडमास्टर हा 'किताब घेतला . त्यांनी ज्यावेळी 'किताब घेतला त्यावेळी त्या सर्वात तरुण खेळाडू होत्या . त्यांनतर 17वर्षांनी त्यांनी या यशाला गवसणी घातली आहे .
                 महिला वर्ल्ड रॅपिड बुद्धिबळ स्पर्धेत चीनच्या ले टिंगजीविरुद्ध आरमागेडन गेम जिंकल्यानंतर भारताच्या कोनेरू हम्पी यांनी  विजेतेपद जिंकले. त्यांनी  12 व्या आणि अंतिम फेरीत विजय मिळवत चिनची महिला खेळाडू  खेळाडू तांग झोंगयी याच्या विरुद्ध उत्कृष्ट विजय मिळवला . आणि त्यांना  टिंगजी यांच्या  विरूद्ध टायब्रेकरमध्ये  खेळायला भाग पाडले.
 हंपी यांनी  बुद्धिबळाची आंतरराष्ट्रीय संघटना असलेल्या फेडरेशन ऑफ दि इच्छेस अर्थात  फिडेला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की की, “जेव्हा मी माझा तिसऱ्या दिवसातील पहिला खेळ  सुरू केला तेव्हा मला वाटत नव्हतं की मी अव्वल आहे.” मी पहिल्या तीनमध्ये स्थान मिळविण्याची आशा करत होतो. मला टायब्रेक
खेळण्याची अपेक्षा नव्हती त्यांनी मुलाखतीत पुढे सांगितले की   “मी पहिला गेम गमावला पण दुसर्‍या डावात पुनरागमन केले  हा डाव  खूप अवघड होता  परंतु मी तो जिंकला. शेवटच्या गेममध्ये मी चांगल्या स्थितीत होते आणि मग मी सहज जिंकले         हम्पी यांनी  एकूण नऊ गुण मिळवून  टिंगजी आणि तुर्की एकेटेरिना अटालिक यांच्या बरोबर गूण मिळवले . पहिल्या पाच  हम्पी यांनी 4.5.. फेऱ्यांमध्ये गुण मिळवून चांगली सुरुवात केली .मात्र  नंतर त्यानंतर  रशियाच्याइरिना बुल्मागाविरुद्ध पराभवा झाल्याने त्या काहीसा मागे पडल्या  . मात्र यामुळे खचून ज जाता हंपी यांनी  जोरदार पुनरागमन करत  त्यानी  अंतिम दोन फेऱ्या जिंकत विजेतेपदला गवसणी घातली . आणि वर्षाच्या अखेरीस आपल्या सर्वांना एक सुखद धक्का दिला . त्यांच्या या यशाबद्दल त्यांचे माझ्यासह ही पोस्ट वाचणाऱ्या सर्वांकडून अभिन्न अभिनंदन . भारतीय खेळाडू येत्या 2020या वर्षात  खऱ्या अर्थाने भारतीय असणाऱ्या या खेळात अशीच प्रगती करतील अशी अशा व्यक्त करून सध्यापुरते थांबतो . नमस्कार . 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?