मानसिक रोगाची राजधानी भारत ?

       
      "मन करावे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण"  असे श्री समर्थ रामदास स्वामींचे सुप्रसिद्ध वचन आहे . कोणतेही कार्य पूर्ण करायचे असल्यास त्यासाठी मनस्थिती उत्तम असणे अत्यावश्यक आहे . असा या वाचनाचा आहे . अर्थात .मनस्थिती उत्तम नसल्यास  काय होणार ? हे वेगळे सांगण्याची गरज नाही .कोणतेही कार्य होणारच नाही  , आणि  भारत त्या दिशेने तर वाटचाल करत नाहीये ना ? असा प्रश्न उपस्थित व्हावा,  अशा अहवाल 23डिसेंबर 2019 रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या लॅन्सेट या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे . इंडियन मेडिकल असोसियन या संस्थेमार्फत हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे . या अहवालत सांगितल्याप्रमाणे दर 7 भारतीयांपैकी एक भारतीय विविध मानसिक रोगांनी ग्रस्त आहे . टक्यांच्या भाषेत बोलायचे झाल्यास हे प्रमाण 14 % येते .  हे प्रमाण अर्थात चिंताजनक असून देखील भारतातील  पारंपरिक प्रसार माध्यमे  ज्यात वृत्तपत्रे , वृत्तवाहिन्या , रेडिओ यांचा समावेश होतो , त्यांनी या मुद्यांची यथोचित दखल न घेतल्याने मला समाज माध्यमांव्दारे  याची भीषणता आपणासमोर मांडावी लागत आहे . माझे आजचे लेखन त्यासाठीच .
    मित्रांनो भारतात प्रशिक्षित मनोपचार तज्ज्ञाची प्रचंड प्रमाणात कमतरता आहे . भारतात दर एक लाख  फक्त लोकसंख्येमागे ३ योग्य ते प्रक्षिशण घेतलेले तज्ञ् आहेत . जे जागतिक स्तरावर मान्य करण्यात
आलेल्या प्रमाणपेक्ष खूपच कमी आहे . भारतात सध्या सुमारे 67 हजार तज्ज्ञाची गरज आहे . मानसिक रोगाबाबत आजही समाजात योग्य त्या प्रमानात खुल्या प्रकारे बोलले जात नाही . अन्य शारीरिक आजाराप्रमाणे मनाला देखील आजार होऊ शकतात . यात वावगे काही नाही . हा दृष्टिकोन समाजात रुजणे अत्यावश्यक आहे . आता प्रसिद्ध करण्यात आलेल्या अहवालानुसार भारतात सर्वाधिक रुग्ण डिप्रेशन या आजाराने  ग्रस्त आहेत तर त्या नंतर नंबर लागतो , हे एन्झायटी या आजाराचा . मानसिक रोगात सर्वाधिक गंभीर असणाऱ्या स्किझोफेनिया या रुग्णाचे प्रमाण एकूण मानसिक रोगी यांचा विचार करता 9% आहे . ही  आकडेवारी बघता मेंदूतील रासायनिक असंतुलनामुळे मानसिक आजार होतात .  या बाबींवर त्या कडे दुर्लक्ष करता येणार नाही
 या विषयाची तयारी करण्यासाठी मी युट्युबवर शोध घेतला असतं मला दुर्दैवाने मिरर नाऊ या एकाच इंग्रजी वृत्तवाहिनीवर मला या अहवालासंदर्भात चर्चा केलेली आढळली . या लेखाच्या शेवटी मिरर नाऊ या वृत्तवाहिनीवरील लेखाची लिंक देण्यात आली आहे .  माझ्या आतापर्यंतच्या आकलनानुसार भारतात प्रादेशिक भाषेतील माध्यमी अधिक बघितली जातात . इंग्रजी माध्यमे बघणारा वर्ग अत्यंत तुरळक आहे . त्यामुळे या अत्यंत ज्वलंत विषयाची माहिती किती लोकांपर्यंत पोहोचली ? हा खरेच संशोधनाचा विषय ठरावा . या कार्यक्रमांत सांगितले की :तारे जमीपर " या चित्रपटामुळे ज्या प्रकारे अध्ययन अक्षम विद्यार्थ्यांबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती झाली त्या प्रकारची मोहीम सध्या राबवायला हवी . तुम्हाला काय वाटते ? मराठीमध्ये देवराई हा चित्रपट स्किझोफेनिया (छिन्नमानसिकता ) या रोगाविषयी आला होता . माझ्या आकलनानुसार हा या चित्रपटाने बिग ऑफिस वॉर फारशी कमाई न केल्याने अश्या  प्रकारचा प्रयोग यशस्वी होणार आंही . मित्रानो हा  विषय खूप मोठा हे याची मला जाणीव आहे . मात्र हे समाजमाध्यम आहे . याला शब्द मर्यादा असते  .वृत्तपत्रीय लेखांप्रमाणे  खूप मोठया प्रमाणात यावर लिहता येत नाही तरी इथेच थांबतो , नमस्कार .
  मिरर नाऊ  या वृत्तवाहिनीवरील लेखाची लिंक https://www.youtube.com/watch?v=Tjw6EzKmI1w

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?