60 व्या मन की बातच्या निमित्याने

                       आज माझी वर्षाखेरच्या रविवारची सकाळ रंगली , ती 60 व्या "मन की बात " च्या प्रक्षेपणनाने . माननीय पंतप्रधान नरेंद मोदी यांनी भाषणाची सुरवात केली युवकांना संबोधून . युवकांची शक्ती अत्यंत मोठी असते . ती काहीही करू शकते . असे त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला सांगितले . भाषणाच्या मध्यभागी त्यांनी विविध लोकांच्या गटाकडून करण्यात येणाऱ्या समाजसेवी कार्यांबाबत सांगितले . तर शेवट सूर्यग्रहणाच्या उल्लेखाने केला . . . आपल्या संबोधनात मोदींनी स्वामी विवेकानंद यांच्या कन्याकुमारी येथील शीला स्मारकाला 50वर्षे पूर्ण होत असल्याचा उल्लेख केला .तसेच भारतीयांनी महात्मा गांधींच्या आदर्श घेत सन 2022 पर्यंत स्वदेशी वास्तु वापरून  भारताच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले
                मात्र  ज्या युवकांच्या शक्तीचा उल्लेख त्यांनी आपल्या भाषणात केला .तो  युवकवर्ग  आज कोणत्या स्थितीत आहे .याविषयी त्यांनी सोईस्कर मौन धरणेच पसंत केले .. सूर्यग्रहण बघण्याचा आनंद काही औरच
असतो , असे सांगताना . देशातील वाढती अंधश्रद्धा ज्याचा प्रत्यय बनारस हिंदू विद्यापीठात लवकरच शिकवायला सुरवात करण्यात येणाऱ्या अभ्यासक्रमांतून येत आहे . त्याविषयी देखील काही बोलणे टाळणे . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या युनाटेड नेशनच्या अहवालानुसार सन 2019मध्ये हवामान बदलाचा सर्वाधिक फटका भारताला बसला आहे . याविषयी काहीच काहीच बोलले नाही .तसेच देशात मानासिक रुग्णाची वाढती संख्या चिंताजनक आहे यावर ते काहीही बोलले नाहीत  त्यांनी या मुद्यांवर बोलायला पाहिजे होते , असे मला वाटते .
    मित्रानो , आज देशात गेल्या 45वर्षातील सर्वात मोठी बेकारी आहे . अनेक तरुणांना हाताला काम नसल्याने घरी बसावे लागत आहे . दिनांक 28 डिसेंबर2019 ची अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद ज्यांनी ऐकली असेल त्यांना भारतीय अर्थव्यवस्था किती नाजूक वळणावर याची माहिती असेलच . परदेशी गंजाजळी संपली असताना देखील सन 1991साली नव्हती इतकी बेकारी आज आहे . स्वामी विवेकानंदाना अपेक्षित असणाऱ्या युवक वर्गाची गुणवैशिष्ट्ये आजच्या तरुणाईत ,आहेत का ? याचा विचार करता समोर येणारे चित्र फारशे संतुष्टजनक नाही . हे सांगायलाच नको . नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीनुसार देशातील सुमारे 14 टक्के जनता मानसिक रोगी असल्याचा अहवाल समोर आला आहे . 14% मानसिक रुग्ण असणे ही आरोग्यवव्यस्था काय पातळीवर आहे ? याची साक्ष देतेच . या अहवालानुसार सर्वाधिक मानसिक रुग्ण तरुण आहेत यावर भाष्य मला अपेक्षित होते .
             बनारस हिंदू विद्यापीठात अघोरी विद्या शिकवण्याचा कोर्स सुरु करण्यात येणार आहे . हे विद्यापीठ माननीय नरेंद्र मोदी यांच्या लोकसभा मतदार संघात येते . अघोरी विद्या कोणत्या निकषांव्दारे विज्ञानाच्या कसोटीवर खऱ्या उतरतात .हे  बनारस हिंदू विद्यापीठच जाणे . माझ्या विवेक बुद्धीनुसार हे कृत्य पूर्णतः अवैज्ञानिक आहे . यावर देखील माननीय नरेंद्र मोदी यांनी मौन बाळगले .
हवामन बदलाच्या आपणावर झालेला परिणाम सर्वांना माहिती आहेच .त्यावर सरकार काय करत आहे ? सामान्य नागरिकांनी काय करावे याबाबही त्यांनी भाष्य करायचे टाळले .
एकंदरीत आजची 60 वी  मन की बात देशापुढील मुलखाय मुद्यांना बगल देणारी ठरली हेच खरे


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?