ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?


 दोनच दिवसापूर्वी अमरनाथ यात्रेदरम्यान ढगफुटी होऊन काही जणांचा बळी गेला काही जण अजूनही बेपत्ता आहेत . त्यामुळे देशाच्या अनेक भागात मोठी चर्चा सुरु आहे ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ? तर ही ढगफुटी म्हणजे काय ? ती का निर्माण होते ? तिचे परिणाम काय हे सांगण्यासाठी आजच्या लेखाचे प्रयोजन . 

तर अत्यंत कमी वेळात म्हणजे तीन ते चार  तासात पंधरा दिवसात किंवा महिनाभरात पडतो तितका पाऊस सुमारे २५ ते ३० किलोमीटरच्या त्रिजेच्या प्रदेशात पडणे म्हणजे ढगफुटी होय हा प्रकार सामान्यतःडोंगराळ प्रदेश्यात घडतो . जसा अमरनाथ यात्रेच्या प्रदेश्यात घडला आहे आपण इतिहासाच्या धांडोळा घेतल्यास गेल्या काही वर्षात ढगफुटीच्या घटना वाढलेल्या दिसतात याला जगतिक हवामानबद्दल कारणीभूत आहे 

आता वळूया ढगफुटी का होते ? या प्रश्नाकडे. हे समजून घेण्याआधी आपल्याला पाऊस पडतो म्हणजे काय ?हे समजून घेणे आवश्यक आहे तर आपल्या वातावरणात पाण्याची वाफ असते शास्त्रीय भाषेत तिला बाष्प म्हणतात तर हे बाष्प कोणत्या तापमानास किती सामावले जाईल हे निश्चित आहे एखाद्या वेळी त्या विशिष्ट तापमानास जितके बाष्प सामावले जाऊ शकेल त्या पेक्षा जास्त बाष्प झाले की जास्तीचे बाष्प पावसाच्या रूपाने खाली कोसळते . सध्या जागतिक तापमानवाढीमुळे समुद्रातून किनाऱ्याकडे येणाऱ्या वाऱ्यांचे तापमान अधिक असल्याने त्यांच्याकडून पूर्वीपेक्षा अधिक बाष्प किनाऱ्याकडे येत आहे येत आहे किनाऱ्यावर कमी तापमानसह विविध अडथळे या वाऱ्यांना आल्याने  परिणामी पूर्वीपेक्षा अधिक पाऊस तिथे पडत आहे. जास्त तापमान बाष्प सामावून घेण्याची क्षमता अधिक तापमान कमी झाल्यास बाष्प सामावून घेण्याची क्षमता कमी असा त्यांचा संबंध आहे 
आपण आकाश्यात बघतो त्या ढगाचे विविध प्रकार आहेत त्यातील पवासही संबंधित ढग समुद्रसपाटीपासून सुमारे ३ ते ७ किलोमीटर अंतरावर तयार होतात  साधारणतः अमरनाथ यात्रमार्ग , उत्तराखंड राज्यतील विविध धार्मिक स्थळे या पट्यात येतात . त्यामुळे आपणास अधिकांसह घटना याच प्रदेश्यात घडताना दिसतात . 
मान्सुमच्या वेळी समुद्राकडून हिमालयाच्या दिशेने वारे वाहतात त्यास हिमालयाच्या अडथळा आल्याने ते वर जातात आणि पाऊस त्या प्रदेश्यात जास्त पाऊस पडतो मात्र डोंगराच्या पलीकडे कमी पाऊस पाडतो (आपल्या
सह्यद्रीमध्ये सुद्धा हा प्रकार घडतो  याचे ठळक उदाहरण म्हणजे कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याच्या मध्ये सांगली जिल्ह्याच्या एक चिंचोळा पट्टा येतो ज्यात खूपच कमी पाऊस पडतो )  वातावरणाच्या या भागात तुलनेने काहीसे थंड वारे वाहत असतात त्यांच्या संपर्कात आल्याने या ढगांचे तापमान कमी होते तापमान कमी झाल्यामुळे त्यांची बाष्प सामावून घेण्याची क्षमता देखील कमी होते.  परिणामी या ढगांमध्ये जास्तीचे   बाष्प तयार होते आणि ते वेगाने खाली येते आणि माध्यमांमध्ये आपण बातमी बघतो /वाचतो अमुक प्रदेश्यात ढगफुटी . 
ढगफुटीचे परिणाम ज्या प्रदेश्यात होते त्याचे आपण दोन प्रदेश्यात विभागणी करू शकतो एक ज्या प्रदेश्यात खरोखरच ढगफुटी होते तो प्रदेश आणि त्यांच्या लगतच्या प्रदेश . ज्या प्रदेश्यात ढगफुटी होते त्या प्रदेश्यात बंदुकीच्या गोळ्याची एक फेरी अंगावर तर येत नाही ना ?असे वाटवे इतक्या मोठ्या वेगाने आणि संख्येने आकाशातून पाऊस कोसळतो आपल्या नेहमीच्या पावसाच्या थेंबापेक्षा त्याचा आकार बराच मोठा असतो . त्यामुळे जेव्हा त्यांचा मनुष्याशी संपर्क होतो तेव्हा मनुष्यां ना प्राण्याला या पावसामुळे इजा होते थोडे तात्पुरत्या कारणासाठी केलेले कच्चे बांधकाम कोसळू देखील शकते . हे झाले ज्या प्रदेश्यात प्रत्यक्ष ढगफुटी होते त्या प्रदेश्यात .मात्र ढगफुटीमुळे जमिनीवर आलेलं पाणी वेगाने उताराकडे धावायला लागते परिणामी ढगफुटी झालेल्या प्रदेशाच्या सभोवताली असणाऱ्या प्रदेश्यात अचानक मोठे  पूर येतात आणि तेथील जनजीवन सुद्धा विस्कळीत होते 
ढगफुटीमुळे होणारे नुकसान कसे असते याची कलपना करायची झाल्यास आपण आपल्या शहरातील स्थानिक स्वराज संस्थेच्या   पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या असताना अचानक फुटल्या तर काय होऊ शकेल ?   याचा अंदाज बांधून करू शकतो पूर्णतः तसेच नाही मात्र या प्रकारचा विध्वसं ढगफुटीमुळे त्या प्रदेश्यात होतो 
     पूर्वीपेक्षा सध्या आपला हवामान खात्यावरील खर्च वाढला आहे . मात्र अजूनही अमेरिका पश्चिम युरोपीय देश हवमानवर जेव्हढी रक्कम खर्च करतात त्या तुलनेतआपला खर्च अजूनही कमी आहे तरी  अनेक आधुनिक उपकरणे वापरत अधिक अचूक अंदाज देण्याकडे हवामान खात्याचा प्रयत्न असतो . मात्र सध्या हवामान खूपच लहरी झाले आहे अमेरिका पश्चिमी युरोपीय देशांचे हवामानाविषयक अंदाज चुकत आहे त्यामुळे ढगफुटीबाबत पूर्वकल्पना येण्यास मुळातच बंधने आहेत त्यामुळे हे संकट येणार हे निश्चित समजून त्यास तोंड देण्यास तयार राहण्यातच आपले हित आहे .


#हि_माझी_एक_हजार_अठरावी_ ब्लॉगपोस्ट_आहे 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ