सिंहावलोकन २०२१ भारत आणि भारताचे शेजारी

       

    सन २०२१ हे वर्ष आणि भारत  भारताच्या शेजारील देश यांच्या विचार करता अत्यंत महत्त्वाचे ठरले यावर्षी भारताच्या शेजारील देशामध्ये अनेक घडामोडी घडल्या ईशान्य भारताबरोबर मुख भूमीचा अधिक सक्षम संपर्क स्थापित व्हाया म्हणून बांगलादेश आणि म्यानमार बरोबर झालेले करार ,नवरात्रीदरम्यान बांगलादेशातील हिंदूंवर झालेले हल्ले . मालदीव या देशात झालेले भारतविरोधी आंदोलने , अफगाणिस्तानातील तालिबानचा उदय , चीन बाबतच्या संबंधात वाढलेली कटुता , भूतानमध्ये त्यांच्या अंतर्गत भ्रष्टाचाराच्या प्रकरणात उघड झालेला भारतीय नागरिकाचा समावेश,  नेपाळच्या राजकारणी लोकांची भारत विरोधी वक्तव्ये आणि नेपाळचा विकासाबाबत भारतने उचलली पाऊले  ,श्रीलंकेमध्ये भारतीय प्रकल्पना झालेला विरोध आणि पाकिस्तानशी असणारे तणावाचे वातवरण या बाबींचा अभ्यास आपणास  २०२१ साली भारत आणि त्याच्या शेजारील देशांमाबरोबरचे संबंध बघताना करावा लागेल .
     नेपाळचे हंगामी पंतप्रधान के पी ओली शर्मा यांनी २० जून २०२१  मध्ये त्याच्या घरी आयोजित केलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमात भारत हा योगशात्राचा जनक नाही मुळात ब्रिटिशांच्या येण्या अगोदर भारत नावाची काही
संकल्पनाच अस्तित्वात नव्हती असे तारे तोडले यावरून बरच वादंग त्यावेळीस झाला होता तसेच नेपाळने त्यांच्या देशात कोरोनही या पंतजलीच्या उत्पादनावर देखील हे औषध योग्य प्रमाणीकरण करून केलेले नाही असे सांगत बंदी घातली  नेपाळच्या जयनगर ते भारताच्या कुरथा या दरम्यानच्या रेल्वेमार्गाचे नॅरोभारताला बांगलादेशने गेजमधून ब्राडगेज मध्ये रूपांतर याचा वर्षी झाले या रेल्वेमार्गामुळे नेपाळची रेल्वे सुधारण्यास मोठा हातभार लागणार आहे 
            म्यानमारच्या विचार करता ईशान्य भारताशी उर्वरित भारताचा अधिक चांगला संपर्क प्रस्थापित व्हावा यासाठी म्यानमारच्या  राखाइन या भारत म्यानमार आणि बांगलादेश या तीन देशाच्या सीमा एकत्र येणाऱ्या  राज्यातील सिंग्वे  बंदरापासून भारताच्या मणिपूर राज्यातील इंफाळ पर्यंत रस्ता यावर्षी उभारण्यात आला ज्यामुळे पश्चिम बंगालमधून सहजतेने ईशान्य भारताशी संपर्क साधता येणार आहे 
ईशान्य भारताची आणि पश्चिम बंगालचा सजहजेतेने संपर्क स्थापित व्हावा यासाठी बंगालदेशबरोबर अनेक करार यावर्षी करण्यात आले तसेच व्यापारवृद्धीसाठी देखील करार करण्यात आले सोनाडीयाहे बांगलादेशातील बंदर विकसित करण्यासाठी भारताला बांगलादेशने सांगितले यामुळे ईशान्य भारताशी संपर्क साधता येणार आहे याखेरीज अनेक नव्या रेल्वेमार्गाची उभारणी देखील या काळात होणार आहे बांगलादेशमध्ये नवरात्रीचा उत्सवादरम्यान मुस्लिम बांधवांसाठी पवित्र असणाऱ्या कुराण या धार्मिक ग्रंथाचा अपमान केल्यावरून दंगल झाली ज्याचे प्रतिसाद त्रिपुरा राज्यात उमटले 
श्रीलंकेने त्यांचे कोलंबो हे बंदर विकसित करण्यासाठी चिनी कंपनीला दिले हे बंदरजपानबरोबर विकसित करण्यासाठी उत्सुक होता मात्र हंम्बंपोट बंदराच्या प्रश्नावरून  जनमत कोणत्याही देशाला देण्यास तयार नाही असे सांगत नकार दिला आणि हे बंदर चीनला विकसित करण्यास दिले 
अफगाणिस्तान हा देश पुन्हा एकदादा तालिबान या कट्टर धार्मिक मानसिकता असणाऱ्या लोकांच्या हातात घेतला पाकिस्तानने अनधिकृतपणे पाकिस्तानच्या ताब्यात असणाऱ्या पाकव्याप्त काश्मीरमध्ये निवडणूक घेणे गिलगिट बाल्टिस्तान या भागला संपूर्ण राज्य म्हणून मान्यता देणे यावरून तणावाचे वातवरण निर्माण झाले 
मालदीवमध्ये २०१३ ते २०१८ या  काळात राष्ट्राध्यक्ष अंशाच्या अब्दुल यामिन यांनी भारताच्या मालदीवमधील उपस्थितीवरून आंदोलन केले चीनवरून सीमा प्रश्नावरून वादंगांचे अनेक प्रसंग उदभवले तसेच भारताच्या लष्कराकडून देखील चीन प्रश्नी महत्वाची विधाने करण्यात आली भूतानमध्ये राजद्रोहाच्या आरोपाखाली बंदिवासात असणाऱ्या  भारताच्या भूतान दुतावासात राजशिष्टाचार सचिव या पदावर कार्यरत असणाऱ्या श्रीमती वाग्नू  यांच्या  चौकशीमध्ये अनेक धक्कादाक खुलासे आल्याने भूतानमध्ये समाजजीवन पूर्णतः ढवळून निघाले 
       थोडक्यात मागील वर्ष हे भारतासाठी शेजारील देशाचा विचार करता वादळीच होते असे म्हणता येऊ शकते 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?