सिंहावलोकन २०२१ भारत आणि जग

     

 सरते वर्ष २०२१ भारतासाठी खूपच महत्त्वाचे ठरले या वर्षी मॉरिशस , युनाटेड किंग्डम , रशिया ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका यांच्याबाबत भारताला अनुकूल अश्या अनेक घडामोडी घडल्या त्यामुळे  या सरत्या वर्षात भारताचे  पररराष्ट्र धोरण खूपच यशस्वी ठरले असे म्हटल्यास वावगे ठरू नये अशी स्थिती निर्माण झाले आहे 
            वर्षाच्या सुरवातीलाच    आपले परराष्ट्रमंत्री मंत्री  एस जयशंकर यांनी  आफ्रिका खंडातील माँरीशियस या देशाबरोबर व्यापारी करार केला या करारानुसार माँरीसियस आणि भारत या दोन देशांमध्ये काही वस्तूंवर करमुक्त आयात - निर्यात होवू शकते.माँरीसियस हा देश जगभरात ज्या गोष्टींची निर्यात करतो, त्यातील सुमारे 75% वस्तू यात अंतर्भूत करण्यात आल्या आहेत. ज्यांची एकुण संख्या 310पेक्षा अधिक आहे. या वस्तूंमध्ये सुकवलेले मासे, फळे, भाज्या, काही यंत्रसामुग्री या वस्तूंचा समावेश करता येईल.भारताचा विचार करता भारताकडून माँरीसियसला आयटी विषयक, तंत्रज्ञानविषयक, अवकाश संशोधकविषयक  सेवा विनाअडथळा पुरवता येवू शकतील.भारताने या आधी या प्रकारचे करार आशियान संघटनेतील देश, युरोपीय युनियन, जपान आदी देशांबरोबर केला आहे. मात्र आफ्रिका खंडातील देशांबरोबरचा हा  या प्रकारचा पहिलाच करार आहे.
            मार्च महिन्याचा सुरवातीला जागतिक व्यापार संघटनेमध्ये भारताने ठेवलेल्या प्रस्तावाला अमेरीकेने मान्यता द्यावी यासाठी अमेरीकेच्या सिनेटमधील (आपल्या लोकसभा समकक्ष) सदस्यांनी राष्ट्राध्यक्ष जाँन बायडन यांना प्रस्ताव सादर केला  जागतिक व्यापार संघटनेच्या तीन प्रमुख धोरणापैकी एक असणाऱ्या बौद्धिक स्वामित्व च्या तरतूदीला  कोरोना काळात तात्पपुरत्या स्वरुपात का होईना थांबवावे अशी मागणी भारताने केली होती . या तरतूदीनुसार एखादे विशिष्ट  उत्पादन ,सेवा विकसीत करण्यासाठी एखाद्या कंपनीने, संस्थेने विशेष
परीश्रम , आर्थिक कष्ट घेतले असल्यास ती वस्तू बाजारात आल्यावर पुढील 20 वर्षे फक्त त्या कंपनीस ती सेवा, उत्पादननिर्मिती करता येते. इतरांना ते उत्पादन सेवा अन्य लोकांना देयचे असल्यास मुळ कंपनीला मोठ्या प्रमाणात राँयल्टी द्यावी लागते, तसेच या प्रक्रियेसाठी बराच कालावधी जातो. भारताच्या मते सध्या कोरोनाचे औषध निर्मितीचे जगभरात प्रयत्न सुरु आहेत. मात्र या तरतूदीमुळे उत्पादनात अडचण होवू शकते. परीणामी जिवित हानी होवू शकते. त्यामुळे सध्या तरतूदीला फाटा देण्यात यावा. अशी भारताची मागणी होती जिच्या समर्थार्थ अमेरिकी सिनेटमध्ये भारताला अनुकूल बदल झाले 
           परंपरावादी म्हणून ओळख असणाऱ्या सौदी अरेबियातील पुढील पिढी सहिष्णू  इस्लामेत्तर धर्मियांचा आदर करणारी आधूनिक विचारसरणीची बनावी, या हेतूने  भावी सौदी राजे प्रिन्स बिन सलमान यांच्या कडून काही बदल करण्यात येत आहेत. या बदलास vision 2030 असे म्हणतात. या बदलांनूसार सौदीतील शालेय अभ्यासक्रमांमध्ये या पुढे विविध धर्मीयांची ओळख करुन देण्यात येणार आहे. ज्यामध्ये हिंदू धर्मियांची ओळख करुन देताना रामायण आणि महाभारत या ग्रथांचा परीचय सौदी अरेबिया या देशातील मुलांना करुन देण्यात येणार  आहे. सौदीतील पहिली अधिकृत योगा शिक्षक  नाँली अलमरेया यांनी केलेल्या ट्टीट मुळे ही गोष्ट   जगासमोर आली. नाँली यांनी मुलाची समाजशास्त्र  विषयाची प्रश्नपत्रीका जगासमोर ट्टीटरद्वारा आणली. ज्यामुळे ही गोष्ट जगाला समजली. नाँली या सौदीत वास्तव्य करणाऱ्या भारतीय नागरीक आहेत .भारतीय संस्कृतीचा हा एक प्रकारे विजयच आहे 
            सन 2004 पासून नित्यनियमाने भारतीय नौदल दल आणि युकेची रॉयल नेव्ही यांच्यामध्ये होणारी  कोकण एक्सरसाईज  इंग्लिश चॅनेल या भागात झालीया वर्षी झालेल्या कोकण एक्सरसाईजमध्ये भारताकडून आयएनएस तब्बर आणि युनिटेड किंगडम ऑफ ग्रेट ब्रिटन अँड नॉर्दन आयर्लंड या देशाकडून एचएमएस 
वेस्टमिनिस्टर या दोन युद्धदनौकानदाम्यान झाली या दोन्ही युद्धनौका या फ्रिगेट  प्रकारच्या आहेत  ज्यामुळे अन्य जहाजांचे सरंक्षण करतात  या दोन्ही युद्धनौका  हवाई मार्गे जमिनीवरून आणि पाण्याचा आतून येणाऱ्या धोक्याला नामोहरम करू शकतात भारतातफे या युद्ध अभ्यासात  भाग घेणारी  आय एन एसतब्बर ही युद्धनौका आपण 2004 साली रशियाकडून विकत घेतली तर युकेकडून सहभाग नोंदवणारी युद्धनौका एचएमएस  वेस्टमिनिस्टर ही 1992  साली युकेच्या रॉयल नेव्ही मध्ये दाखल झाली 
            ऑस्ट्रेलिआ बाबत दोन घडामोडी घडल्या  एक सांस्कृतिक विश्वाशी निगडित आहे दुसरी राजकीय आहे तर भारताच्या प्राचीन शिल्पकला चित्रकला , धातुकाम याचा याच्या वारसा सांगणाऱ्या मात्र सुभाष कपूर या व्यक्तीकडून नैतिक अनैतिक मार्गाने ऑस्ट्रेलिया च्या राष्ट्रीय संग्रहात दाखल झालेल्या 14  कलाकृती ऑस्ट्रलिया आपल्या भारतास परत करणार आहेत ज्या नवी दिल्लीतील जुन्या किल्ल्यातील राष्ट्रीय संग्रहात ठेवल्या जाणार आहेत या व्यक्तीकडून भारताच्या जुन्या वारस्याशी नाते सांगणाऱ्या  एकूण 22 कलाकृती चोरून ,  स्मगलिंगच्या माध्यमातून किंवा नैतिक मार्गाचा अवलंब करत ऑस्ट्रलियाच्या राष्ट्रीय संग्रहाला विकल्या होत्या त्याचे हे कृत्य लक्षात आल्यावर ऑस्ट्रेलियाने त्या भारतास परत करण्याचे ठरवले .  सध्या  हा  सुभाष कपूर सध्या तुरुंगात आहे . या 14  कलाकृतीमध्ये बाराव्या ते अठराव्या शतकापर्यंत काढण्यात आलेल्या  चित्रांचा,  तयार करण्यात आलेल्या विविध देवतांच्या मुर्त्यांचा तसेच एका धातुकामांचा अनोखा नमुना असलेल्या गोष्टींचा आणि एका रंगवलेल्या कापडाचा समावेश आहे .ज्यामध्ये  6 चित्रे आहेत तर 6  मूर्त्यांचा समावेश आहे . सुभाष कपूर या व्यक्तीने अमेरिकेतील महत्त्वाचे  न्यूयॉर्क शहराचा प्रसिद्ध भाग मॅनहॅटन भागात स्वतःची एक आर्ट गॅलरी होती जिथे तो भारतातून ठेवलेल्या वस्तू ठेवत असे तसेच अनेक राष्ट्रीय संग्रहालयांना विकत असे .तसेच ऑस्ट्रोलियने भारताला Talisman Sabre या युद्ध अभ्यासात सहभागी करावे असे सूतोवाच केले  . हा युद्ध अभ्यास ऑस्ट्रोलीया  आणि अमेरिकेकडून संयुक्तरित्या आयोजित करण्यात येतो . या युद्ध अभ्यासात जमिनीवरील आणि पाण्यावरील तसेच हवाई तिन्ही प्रकारच्या युद्धाभ्यास केला वाजतो ऑस्ट्रोलियाच्या ईशान्य दिशेला असणाऱ्या कोरल रिल्फ प्रदेशात आणि हवाई बेटांवर हा युद्धाभ्यास होतोयामध्ये सहा ते सात देश सहभागी होत असतात दर दोन वर्षांनी हा युद्ध अभ्यास होतो 2021 सालचा युद्ध अअभ्यास झाल्यानंतर ऑस्ट्रलियाने हे  संकेत दिले आहेत 
            सोमवार ६ डिसेंबर रोजी रशियाचे अध्यक्ष ब्लादीमीर पुतीन पाच तासासाठी भारत दौऱ्यावर आले होते ब्लादीमीर पुतीन यांच्या भारत दौऱ्यादरम्यान अंतराळशास्त्र  , विज्ञान सरंक्षण, ऊर्जा , अवजड अभियांत्रिकी , व्यापार आणि गुंतवणूक  अश्या विविध क्षेत्रातील एकूण २८ करार करण्यात आली  हे सर्व करार लष्करी व लष्करी- तांत्रिक सहकार्याबाबतच्या भारत- रशिया सरकारी आयोगाच्या २१व्या भारत रशिया समीटमध्ये करण्यात आले तसेच रशिया जपान सीमेजवळच्या व्लाडिगोस्को या शहरात भारताची वकिलात ( conslute ) उभारण्यासाठी जमीन देण्यावरूनेहरू दोन्ही देशात सहमती  करण्यात आली.  
या सर्व बदलांमुळे भारत उद्याची महासत्ता आहे हे जगणे लक्षात घेतले असल्याची खात्री पडते 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?