पोस्ट्स

नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे

इमेज
जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंदाने स्वीकारतात नुसतेच स्वीकारतात असे नाही तर त

दृष्टिकोन बदलुया, मौन सोडूया!

इमेज
जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता, त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा  समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी दरवर्षी   १०   सप्टेंबर   हा   आत्महत्याविरोधी   जनजागृती   दिन   म्हणून   साजरा   करण्यात   येतो .  हा   दिन   २००३   पासून   जागतिक   आत्महत्या   विरोधी   संघटनेतर्फे ,(The International Association for Suicide Prevention  {IASP} आरोग्य   संघटना   आणि   जागतिक    मानसिक आरोग्य   संघ  { World Federation for Mental Health

पश्चिमी आशिया,इस्लामी जगत यांची मुळातून जडणघडण उगडणारे पुस्तक 'अधर्म युद्ध'

इमेज
जगाच्या नकाश्यात आपल्या भारतापासून डावीकडे नजर फिरवायला सुरवात केल्यानंतर इराण देशानंतर समुद्र काहीसा आत गेलेला दिसतो.जगातील सुमारे ६० टक्के नैसर्गिक इंधनाची वाहतूक ज्या प्रदेशातून होते ते इराणचे अखात ते हेच.या इराणच्याआ आखातापासून जगातील अत्यंत स्फोटक प्रदेशाला सुरवात होते जी त्यानंतर समुद्र पुन्हा आत जातो ,त्या ठिकाणाला अर्थात लाल समुद्राला वळसा घालत आफ्रिका खंडाच्या उत्तर दिशेकडील काही देश घेवून स्थिरावते .अरब महाद्विप, पश्चिम आशिया किंवा युरोपीय वसाहातवादी देशांच्या चष्म्यातून बघीतल्यास मध्यपुर्व (middel east)या विविध नावाने ओळखला प्रदेश तो हाच.नैसर्गिक उर्जासाधनांनी अत्यंत श्रीमंत किंबहुना याच श्रीमंतीच्या जोरावर अनेकदा जगाला भंडावून सोडणाऱ्या या प्रदेशाविषयी आपल्या मराठीत काहीसे कमी लिहले गेलेले आढळते‌. जे काही मराठीत लेखन उपलब्ध आहे,त्यामध्ये तेथील पर्यटन स्थळांची माहिती,या प्रदेशात बांधकांम मजूर म्हणून नोकरी करणाऱ्या भारतीयांचे अनुभव विश्व  याचाच जास्त भरणा आपणास दिसतो . मात्र देशांतर्गत राजकारण, तेथील समाजजीवन २०व्या शतकाच्या सुरवातीला त्या भागात नैसर्गिक इंधनाचे साठे सापडल्या

भारतावर दूरगामी परिणाम करणारी घटना !!!

इमेज
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हशिण यांनी देश सोडला असून त्यांनी भारतमार्गे लंडनला प्रयाण केल्याचे आपणस एव्हाना माहिती झाले असेलच . बंगलादेशमध्ये लष्कराच्या मदतीने काळजीवाहू सरकार स्थापन कऱण्यात आले असून पुढील सरकार सत्ता स्थापन करेपर्यंत हे काळजीवाहू सरकार सत्ता सांभाळेलअसे या संदर्भात विविध माध्यमामध्ये सांगण्यात येत आहे . बांगलादेशमधील हा सत्ता बदल फक्त त्या देशासाठीच नव्हे तर आपल्या भारतासासाठी देखील अत्यंत महत्वाचा ठरणार आहे   . भारतासाठीचे बदल आपण  तीन   प्रकारात विभाजित करू शकतो . पहिल्या प्रकारात आपण ईशान्य भारताला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यात , ईशान्य भारताचा उर्वरित भारताशी असणारा संपर्क वाढवण्यासंदर्भात सध्या   सुरु असणाऱ्या विविध उपाययोजना विचारत घेऊ शकतो . दुसऱ्या प्रकारात आपण भारत आणि बांगलादेश यांच्यात होणाऱ्या व्यापार आणि अन्य तरतुदींचा विचार करू शकतो.तर तिसऱ्या प्रकारात बांगलादेशातील अल्पसंख्याक समाजाचा विचार करु शकतो‌ ईशान्य भारताचा विचार करत

मला याचा अभिमान आहे?

इमेज
                             आपल्यापैकी अनेकांना एखादी व्यक्ती काही विशेष कारण नसेल तरीही आवडते‌. त्या व्यक्तीबाबत आपणास ममत्व वाटते.माझ्याबाबत देखील हा प्रकार घडतो.मला दोन व्यक्तीबाबत ममत्व वाटते .त्यातील एक इतिहासातील आहे‌.तर दुसरी व्यक्ती वर्तमानातील आहे‌. इतिहासातील व्यक्तीचे नाव आहे, नारायणराव पेशवा.ज्यांचा स्वत:चा आणि त्यांचा मुलाचा घराण्यातील सत्ता संघर्षात जीव गेला. (नारायणरावांचा खून प्रसिद्ध आहेच.तर त्यांचा मुलाला सवाई माधवराव यांना याच पेशव्यांचा सत्ता संघर्षातून आत्महत्या करावी लागली).वर्तमानकाळात असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे,सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद. आता या दोन एकमेकांशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तींबाबत एकाचवेळी ममत्व वाटायचे कारण काय ?असा आपणास प्रश्न पडला असेल ना? तर सांगतो मी, नारायणराव पेशवा आणि सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांच्यातील सामाईक दुवा म्हणजे आमच्या तिघांची जन्मतारीख एकच १०ऑगस्ट आहे. (अर्थात वर्ष वेगवेगळे) माझ्या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्ती म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष ममत्व आहे‌. आता यातील नारायण पेशव्यांचा बाबत या आधी वेगवेगळ्या ल

जो बायडेन यांच्या माघारीचे कवित्व !

इमेज
सोमवार २२ जूलैची सकाळ भारतीयांसाठी मोठ्या धक्क्याची ठरली. डेमोक्रेटीक पक्षाचे संभाव्य उमेदवार आणि विद्यमान राष्ट्रपती जो बायडेन यांनी गेल्या काही दिवसापासून सुरु असणाऱ्या पक्षांतर्गत विरोध, आणि सध्या झालेल्या कोव्हिड १९मुळे निर्माण झालेल्या प्रकृती अस्वाथामुळे हार मानत आपण अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाच्या स्पर्धेतून बाहेर पडत आहे. आपला पाठिंबा विद्यमान उपराष्ट्राध्यक्षा कमला हॅरिस यांना असल्याचे जाहिर केले, आणि जगभर एकच खळबळ उडाली. तसा हा निर्णय अनेकांना अपेक्षीतच होता. नाटो परिषदेच्या अधिवेशनाच्या वेळी युक्रेनचे राष्ट्रपती झेलंस्की यांचा उल्लेख पुतीन असा करणे, स्वत:च्या प्रचारादरम्यान उपराष्ट्राध्यक्ष म्हणून कमला हॅरिस यांंचा ऐवजी ट्रम्प असे उच्चारणे, अनेक चर्चासत्रांमध्ये मध्येच पेंगणे, बोलताना वारंवार अडखळणे‌, सभांमध्ये बोलताना मध्येच काही गरज नसताना मोठा पॉज घेणे. ज आदी काहीसी वृद्धवाची लक्षणे मोठ्या संख्येने दाखवणे, तसेच वयाची ८१वर्ष पुर्ण असणे आदी गोष्टींमुळे त्यांचा उमेदवारीला डेमोक्रेटीक पक्षातूनच मोठा विरोध होत होता.त्यातच आता जगभरातून जवळपास संपलेला कोव्हिड १९ संसर्ग त्यांन