दृष्टिकोन बदलुया, मौन सोडूया!


जगभरात लोक कोणत्या कारणांनी मृत्युमुखी पडतात ? या कारणांचा वेध घेतला असता, त्यातील पहिल्या क्रमांकावर जे लोकांच्या निधनाचे कारण येते ते म्हणजे आत्महत्या होय . एका अंदाजानुसार जगभरात दरवषी ७ लाख ३० हजार लोक आत्महत्या करून जीवन संपवतात . जगभरात दरवर्षी जितक्या आत्महत्या होतात.त्याच्या २० पट लोकांनी आत्महत्येसाठी प्रयत्न केलेला असतो मात्र त्यांचे प्रयत्न अयशस्वी होतात आणि त्यांचे प्राण वाचतात  आत्महत्या ही फक्त त्या व्यक्तीचीच  हत्या नसते तर जी व्यक्ती आत्महत्या करते त्या व्यक्तीच्या जवळचे त्यानंतर  जगूनही मेल्यासारखेच असतात . यामुळे जगभरात  आत्महत्या एक सामाजिक कलंक मानण्यात येतो हा सामाजिक कलंक जगातून नष्ट व्हावा  समाजात आत्महत्येबाबत व्यापक समाजजागृती व्हावी यासाठी
दरवर्षी १० सप्टेंबर हा आत्महत्याविरोधी जनजागृती दिन म्हणून साजरा करण्यात येतोहा दिन २००३ पासून जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेतर्फे,(The International Association for Suicide Prevention  {IASP} आरोग्य संघटना आणि जागतिक  मानसिक

आरोग्य संघ { World Federation for Mental Health (WFMH)} यांच्या मदतीने साजरा करण्यात येतो  जागतिक आत्महत्या विरोधी संघटनेची   , (The International Association for Suicide Preventio ची  स्थापना  १० सप्टेंबर १९९९ रोजी झाल्याने जागतिक आत्महत्या विरोधी दिन हा १० सप्टेंबर रोजी साजरा करण्यात येतो.हा दिन दरवर्षी एक संकल्पना घेऊन साजरा करण्यात येतो. २०२४ ची संकल्पना आहे "change the narrative" " दृष्टिकोन बदलूया, मौन सोडुया असे तीचे काहीसे मराठीकरण करता येईल‌.

 जगातील कोणतीही समस्या सोडवण्यासाठी आधी तीचे अस्तिव मान्य करावे लागते‌.ती समस्याच मुळात अस्तिवात नाही असा गैरसमज आपण केल्यास ती समस्या कधीही सुटत नाही.हो ही समस्या आहे, तीचा मी स्विकार करतो,असे मानून तीचा विचार केल्यास ती समस्या सुटण्यास मोठ्या प्रमाणात मदत होते‌.ज्याला आपण त्या समस्येकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणे असे म्हणू शकतो.एकदा आपण हा दृष्टिकोन स्विकारल्यानंतर ती समस्या सोडवण्यासाठी काय करावे लागेल,याबाबत विचारमंथन करावे लागेल. हे विचारमंन करण्यासाठी काही लोकांशी या बाबत बोलावे लागेल,काही गोष्टी नव्याने स्विकाराव्या लागतील थोडक्यात फक्त समस्या स्विकारुन ती समस्या सुटणार नाही‌.तीच्याबाबत काहीतरी कृती करावी लागेल. तीच्या बाबतचे मौन सोडावे लागेल तरच आपण ती समस्या सोडवू शकू. नेमकी हीच भुमिका या वर्षाची आहे.

आपल्या भारतातच नव्हे तर जगभरात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींकडे एक पळपुटा म्हणून बघितले जाते.अरे हे. काय कारण झाले आत्महत्मा करायला‌.जगात यापेक्षा अधिक दु:खात लोक असतात .मात्र ती आत्महत्या करत नाहीत तर परिस्थितीसी झगडतात.असे सरार्स बोलले जाते.मात्र यावेळी एका गोष्टीकडे मात्र दुर्लक्ष केले जाते ते म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्ती स्वतंत्र इंग्रजीत ज्याला युनिक म्हणतात तसी आहे.प्रत्येकाच्या शाररिक आणि मानसिक क्षमता वेगवेगळ्या आहेत.त्यामुळ सर्वांना एकाच मापात तोलने चूकीचे आहेजसे एखाद्याला उत्तम होणारा शर्ट दुसऱ्याला देखील उत्तम होईल असे समजणे जसे चूकीचे आहे,तसेच एखादा व्यक्ती एखाद्या स्थितीत आत्महत्या करतो तर दुसरा करत नाही तर करणारा काही फार ग्रेट समजणे चूकीचे आहे.तर आत्महत्या ज्या गोष्टींची कमतरता असल्याने होते‌.त्या गोष्टींचीच कमतरता आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींकडे होती,असे समजून या क्षमता वाढवण्यासाठी काय करता येईल याबाबत चर्चा करण्यासाठी पार्श्वभुमी तयार करणे,

तसेच ती करण्यासाठी मौन सोडणे आणि लेखात सुरवातीला सांगितल्याप्रमाणे हे घडण्यासाठी मुळात दृष्टिकोन बदलणे ही या वर्षाची मध्यवर्ती संकल्पना आहे.

मागील तीन वर्ष म्हणजे २०२३,२०२२आणि २०२१साली एकाच संकल्पनेवर हा दिवस साजरा करण्यात आला ती म्हणजे crating hope by doing action. २००३ पासून च्या संकल्पनेचा विचार करता २००३ साली  "Suicide Can Be Prevented! , २००४साली  "Saving Lives, Restoring Hope २००५साली  "Prevention of Suicide is Everybody's Business"२००६साली  "With Understanding New Hope" २००७साली    "Suicide prevention across the Life Span २००८ साली  "Think Globally, Plan Nationally, Act Locally २००९ साली  "Suicide Prevention in Different Cultures" २०१०साली  "Families, Community Systems and Suicide २०११साली  "Preventing Suicide in Multicultural Societies" २०१२ साली "Suicide Prevention across the Globe: Strengthening Protective Factors and Instilling Hope२०१३साली  "Stigma: A Major Barrier to Suicide Prevention"२०१४साली "Light a candle near a Window २०१५साली  "Preventing Suicide: Reaching Out and Saving Lives" २०१६ साली  "Connect, Communicate, Care"२०१७साली "Take a Minute, Change a Life" २०१८साली  "Working Together to Prevent Suicide २०१९साली "Working Together to Prevent Suicide २०२०साली "Working Together to Prevent Suicide आणि २०२१  साली - "Creating Hope Through

Actio या संकल्पांद्वारे हा दिन साजरा करण्यात आला या सर्व संकल्पना बघितल्यास आपणास आत्महत्या या विषयांवरील या संघटनेचे भरीव कार्य लक्षात येते

तुम्हाला अकबर आणि बिरबल आणि हौदातील माकडणीची गोष्ट आपणास महिती असेलच सुरवातीला आपल्या पिल्लाला कवटाळणारी माकडीण शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी पिल्लाला आपल्या पायापाशी ठेवून त्यावर उभे राहून आपला जीव वाचवते कोणालाही आपला जीव प्रिय असतो  तुम्ही कोणत्याही उंच इमारतीवर जा आणि खाली बघा आपले डोके गरगरायला  लागेल.डोळेविस्फारतील आपण चटकन मागे फिरू अश्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या जीव घेण्यास देखील मागेपुढे बघत नाही या मनोवस्थेचा आत्महत्या करणाऱ्या व्यक्तींना दुबळा समजणाऱ्या व्यक्तींनी विचार करणे आवश्यक आहे असे मला वाटते आत्महत्या करणे हे दुबळ्या मानसिकतेचे लक्षण समजण्यात येते जे चुकीचे आहे तुम्ही रेल्वे स्टेशनवर जा तेथील पुलावरून खाली उडी मारण्याचा विचार करा हवंतर डोळे मिटा तुम्ही तेथूनकुठेही  थांबता सरळ घरी याला घर रेल्वेस्टेशनपासून कितीही लांब असले तरी तुम्ही कुठेही थांबणार नाही अश्यावेळी एखादी व्यक्ती स्वतःच्या जीव घेण्यास काशी काय धजावते हे आत्महत्येला दुबळा पळपुटा म्हणणाऱ्या लोकांनी विचार करावा माझ्यामते जगातील सर्वात धैर्यवान लोक ही तीच मात्र त्यांनी ती ऊर्जा नकारात्मक कार्यात गुंतवली आणि स्वतःच्या विनाश करून घेतला असे 

मी समजतो जर ती ऊर्जा सकारत्मक कार्यात वापरली गेली तर जगातील कोणतीही गोष्ट ते सहजतेने करू शकतात असे मला वाटते

 एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीने आत्महत्या केल्यावर सोशल मीडियात जर आत्महत्येचे विचार आले तर माझ्याशी बोला पण आत्महत्या करू नका असे मेसेज येण्यास सुरवात होते मात्र जी व्यक्ती आत्महत्या करणार असते ती व्यक्ती फारच कमी वेळा तसे जाहीररीत्या बोलून दाखवते अनेकदा अश्या व्यक्ती फारश्या बोलेनाश्या होतात . विविध गर्दीचे ठिकाणे टाळायला लागतात अश्यावेळी आत्महत्येची मनोवस्था असणारी व्यक्ती एखाद्याशी स्वतःहून संपर्क साधेल अशी अपेक्षाच करणे चुकीचे ठरेल आपणच जर आपणस अशी व्यक्ती आढळली तर तो संपर्क साधेल अशी अपेक्षा  करता स्वतःहून त्याकडे जात त्याची व्यथा शांततेत समजावून घेत त्यावर उपाय योजना केल्या पाहिजे तर आणि तरच या आत्महत्या नावाच्या सामाजिक कलांकाला आपण आपल्यापासून दूर सारू

अजिंक्य तरटे

9552599495

9423515400



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?