मला याचा अभिमान आहे?

                             आपल्यापैकी अनेकांना एखादी व्यक्ती काही विशेष कारण नसेल तरीही आवडते‌. त्या व्यक्तीबाबत आपणास ममत्व वाटते.माझ्याबाबत देखील हा प्रकार घडतो.मला दोन व्यक्तीबाबत ममत्व वाटते .त्यातील एक इतिहासातील आहे‌.तर दुसरी व्यक्ती वर्तमानातील आहे‌. इतिहासातील व्यक्तीचे नाव आहे, नारायणराव पेशवा.ज्यांचा स्वत:चा आणि त्यांचा मुलाचा घराण्यातील सत्ता संघर्षात जीव गेला. (नारायणरावांचा खून प्रसिद्ध आहेच.तर त्यांचा मुलाला सवाई माधवराव यांना याच पेशव्यांचा सत्ता संघर्षातून आत्महत्या करावी लागली).वर्तमानकाळात असणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे,सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद. आता या दोन एकमेकांशी काहीही संबंध नसणाऱ्या व्यक्तींबाबत एकाचवेळी ममत्व वाटायचे कारण काय ?असा आपणास प्रश्न पडला असेल ना? तर सांगतो मी, नारायणराव पेशवा आणि सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांच्यातील सामाईक दुवा म्हणजे आमच्या तिघांची जन्मतारीख एकच १०ऑगस्ट आहे. (अर्थात वर्ष वेगवेगळे) माझ्या जन्मतारखेला जन्मलेल्या व्यक्ती म्हणून मला त्यांच्याविषयी विशेष ममत्व आहे‌. आता यातील नारायण पेशव्यांचा बाबत या आधी वेगवेगळ्या लोकांनी मोठ्या प्रमाणात बोलून झाले आहे‌.त्यामुळे जरी मला त्यांच्याविषयी एक खास भावना
असली तरी मी त्यांच्याविषयी बोलणार नाही‌.मी बोलणार आहे,मला ममत्वाबरोबर ज्यांच्याशी माझी जन्मतारीख जोडल्या गेल्याने काहीसा अभिमान वाटतो,त्यांच्याविषयी अर्थात सुपर ग्रँडमास्टर आर प्रज्ञानंद यांच्याविषयी‌‌.
             मोठ्या बहिणीचे बघून बघून बुद्धीबळ या खेळात उतरलेल्या या चेन्नईच्या सुपुत्राने मागून येवून बहिणीच्या तूलनेत मोठी झेप घेत स्वत:चे असे वेगळे स्थान निर्माण केले आहे‌. आज ते माझ्यासह अनेकांचे रोल मॉडेल, आयकॉन आहेत,ते सुद्धा बुद्धीबळसारख्या अनेकांना कंटाळवाण्या खेळाचे खेळाडू असून सुद्धा .ते त्यांनी बुद्धीबळ या खेळात गाठलेल्या उंचीमुळे.
आपल्याकडे बाळाचे पाय पाळण्यात दिसतात,असी एक म्हण आहे. कर्तुत्वान व्यक्ती या पुढील आयुष्यात मोठे कर्तुत्व दाखवणार आहेत.असा याचा अर्थ आहे.माझे बुद्धीबळातील रोल मॉडेल आर प्रज्ञानंद यांच्याबाबत ही म्हण अत्यंत खरी ठरत आहे.
                   त्यांनी २०१३ मध्ये जागतिक युवा बुद्धिबळ चॅम्पियनशिप ८वर्षाखालील चे विजेतेपद पटकावले त्यामुळे त्यांना फिडे मास्टर ही पदवी मिळाली. त्यांनी २०१५ मध्ये १०वर्षाखालील चे विजेतेपदही जिंकले.
२०१६ मध्ये, १० वर्षे, १० महिने आणि १९ दिवसांच्या वयात, प्रज्ञानद हे  इतिहासातील सर्वात तरुण बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर बनले त्यांनी नोव्हेंबर २०१७ मध्ये जागतिक कनिष्ठ बुद्धिबळ स्पर्धेत आपला पहिला ग्रँडमास्टर नॉर्म गाठला. ८ गुणांसह चौथे येत त्यांनी १७ एप्रिल २०१८ रोजी ग्रीसमधील हेराक्लिओन फिशर मेमोरियल जीएम नॉर्म स्पर्धेत आपला दुसरा नॉर्म मिळवला.पुढे थोड्याच दिवसात एका स्पर्धेत ग्रँडमास्टर लुका मोरोनी यांना आंतीम फेरीत पराभूत करून त्यांचा तिसरा आणि अंतिम नॉर्म  मिळवला,त्यांचा या  यशामुळे ते  १२ वर्षे १० महिने आणि १३ दिवसांच्या वयात ग्रँडमास्टर होणारे दुसरे सर्वात तरुण व्यक्ती झाले .डिसेंबर २०१९ मध्ये, वयाच्या १४ वर्षे, ३ महिने आणि२४ दिवसात, २६०० रेटिंग प्राप्त करणारा ते दुसरे सर्वात तरुण व्यक्ती झाले.
           आर प्रज्ञानंद यांचा खेळाचा विचार करतासिसिलियन हि पद्धत त्यांची विशेष आवडती ओपनिंग असल्याचे त्यांचे  खळ बघितल्यास दिसून येते कारण पांढरे मोहरे असो किंवा काळे मोहरे असो दोन्ही वेळेस त्यांनी जास्तीत जास्त वेळा हीच ओपनिंग खेळल्याचे दिसून येते त्यांच्या विचार करता पांढरे मोहरे घेऊन खेळताना त्यांनी रेती ओपनिंग
तर काळ्या कडून खेळताना क्वीन पॉन गेम चा दुसऱ्या क्रमांकाचा विचार केलेला दिसतो पांढरे मोहरे घेऊन खेळताना त्यांनी सर्वाधिक वेळा बी ३ या प्रकारे खेळून प्रतिस्पर्ध्याला पराभव स्वीकारण्यास भाग पडले आहे.
आर प्रज्ञानंद यांनी पाचवेळचा बुद्धीबळ विश्वविजेता जो कदाचित सहाव्यांदा देखील विश्वविजेता होवू शकला असता ,मात्र त्यास विश्वविजेता होण्यासाठीची स्पर्धा खेळण्याची इच्छा ओसरल्याने,ज्याने स्वत:हुन विश्वविजेता पद सोडले असे आताच्या स्थितीत सर्वाधिक इलो रेटिंग असलेले बुद्धीबळ खेळाडू मॅग्नस कार्लसन यांना एकाच कॅलेंडर वर्षात रॅपिड या खेळप्रकारात दोनदा तर क्लासिकल प्रकारात पराभवाचे पाणी पाजून
स्वत:च्या खेळाची चूणूक दाखवून दिली आहे‌. नुकत्याच झालेल्या कँडिडेट स्पर्धेत देखील त्यांनी आपल्या उत्तम खेळाचे प्रदर्शन दाखवले होतेच.अस्या उत्तम खेळाडूबरोबर जन्मतारीख शेअर करायला मिळणे ,हे माझ्यासाठी खुप आनंदाची गोष्ट आहे‌.जाताजात माझ्याकडून त्यांना १०ऑगस्ट रोजी असणाऱ्या वाढदिवसाच्या मन:पुर्वक शुभेच्छा! जय बुद्धीबळ!!




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?