नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणारी प्रेरणादायी व्यक्तीमत्वे


जगी सर्व  सुखी कोण आहे ? विचारी मना तूच शोधून पाहे अशी विचारणा  करत समर्थ रामदास स्वामी जगात कोणीच पूर्णतः सुखी नसतो प्रत्येकास काहींना काही दुःख असते (अगदी मुकेश अंबानी याच्या मुलाला असाध्य असा आजार आहे ) फक्त आपण त्या दुःखाला कोणत्या प्रकारे सामोरे जातो . याला मह्त्वाचे असते असा सल्ला देतात जगताना  स्वतःचे दुःख कुरवाळत बसण्याच्या ऐवजी दुसऱ्याच्या दुःखाचा विचार करत अरे याच्या तुलनेत माझे दुःख काहीच नाही असे मानून समाधानी राहावे . हा  जीवन जगण्याच्या सर्वोत्तम उपाय असल्याची शिकवण अनेक मोटिव्हशन स्पीकर देताना बघतो . मात्र  अनेकदा बहुतांश माणसे याकडे दुर्लक्ष करत आपल्याला काय मिळाले आहे याचा विचार न करता आपल्याला काय मिळाले नाही याचा विचार करत दुखी होतात मात्र जगात प्रत्येक गोष्टीला प्रति गोष्ट अस्तित्वात असतेच जसे हिवाळ्याच्या  कडाक्याच्या थंडीला उन्हाळ्या
रणरणते ऊन असते जन्मला मृत्यू ही  प्रतिगोष्ट  असणे हे याचे उत्तम उदाहरण आहे . तोच नियम याला देखील लागू होतो काही व्यक्ती आपल्याला  असणाऱ्या अडचणींबाबत काहीही त्रास व्यक्त ना करता त्यास आनंदाने स्वीकारतात नुसतेच स्वीकारतात असे नाही तर त्या  आपल्या अडचणीला संधी समजून तिचा वापर करत दुसऱ्यांना आंनद देतात म्हणून अशी व्यक्तिमत्वे अत्यंत प्रेरणादायी व्यक्तीमत्वे म्हणून ओळखली जातात . 
         अश्याच प्रेरणादायी व्यक्तिमत्वात समावेश होऊ शकतील,  अश्या व्यक्तींच्या समावेश असलेली स्पर्धा अर्थात पॅरिस पॅरोलम्पिक नुकतेच झाले . ज्यात भारताने  पॅरोलम्पिकमधील सर्वाधिक पदके मिळवली एका अर्थाने शारीरिकदृष्ट्या आम्ही काहीसे कमी असू मात्र आमच्या सारख्या व्यक्तींच्या समूहात आम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणात दादा आहोत हे त्यांनी दाखवून दिले त्याबद्दल त्यांचे करावे तितके कौतुक कमीच आहे पॅरिस पॅरोलम्पिकमधील सर्व व्यक्ती या वेगवेगळ्या प्रकारच्या दिव्यांग होत्या मात्र आपल्या दिव्यांगांमुळे निराश  होता त्यांनी अनेकांना प्रेरणा देण्याचे कार्य केले अरे या दिव्यांग व्यक्ती या गोष्टी करू शकतात तर मी का या गोष्टी करू शकत नाही असा आत्मविश्वास त्यांनी समाजास दिला त्याबाबदल त्या अभिनंदनास पात्रच आहे 
          सध्या  गणेशोत्वव सुरु आहे तो संपल्यावर १५ दिवसांनी  पुन्हा १० दिवसांच्या नवरात्र महोत्वव येईल त्यानंतर १५ दिवसांच्या विश्रान्ती दिवाळी येईल या या उस्तवाच्या काळात अनेक नवस बोलले जातात त्यातील एकही किंवा इतर वेळी बोलल्या गेलेल्या नवसात देवा मला दिव्यांग अपत्य जन्मला येऊ दे असा नसेल. कोणालाही दिव्यांग नको असते मात्र कोणालाही नको  असणारी गोष्ट आपल्या नशिबात आली  म्हणून त्याबाबत काहीही नकारात्मता व्यक्त न करता त्याबाबत सकारात्मकता बाळगळत तिच्यामुळे आलेल्या अक्षमतेवर मात  करत आपल्या  आवडत्या खेळात अतुलनीय प्रदर्शन करत त्यांनी पदकला गवसणी घातली त्यामुळे तेव सर्वच अभिनंदनास पात्र आहेच हे नक्की
                      सध्या अनेक व्यक्तीमत्वावर चित्रपट येत आहेत मात्र त्यामध्ये हे खेळाडू नसल्याचे मला तरी आढळून येत नाहिय  कोणाला माहिती असल्यास सांगितल्यास मला आवडेलच या व्यक्तिमत्वावर येणाऱ्या चित्रपटामध्ये या खऱ्या हिरोंवर आल्या
असल्यास हो भारतीय चित्रपट श्रुष्टीतलं माणिकांचन योगच समजायला हवा जाता जाता  शेवटी नशिबाला दोष न देता, विजयश्री खेचून आणणाऱ्या या प्रेरणादायी व्यक्तिमत्वांना मनाचा सलाम 
WE PROUD OF YOU 


 



 
 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?