स्वातंत्र्यवीर सावरकर भाग 2

50 वर्षानंतर 
येत्या फेब्रुवारीत स्वातंञ्यवीर सावरकरांची 50वी पुण्यतिथी आहे . (सावरकरांचे देहावसन ज्याप्रकारे झाले त्याला विशिष्ट नाव आहे ते माझा आता लक्षात नाहीये . माहितगारांनी सांगावे ही विनंती ) या पन्नास वर्षात पुला खालून बरेच पाणी वाहून गेले . आज 2016 साली स्वातंञ्यवीर सावरकरांच्या कोणत्या ईच्छा पुर्ण झाल्या किंवा पुर्ण होण्याची शक्यता आहे याचा धांडोळा घेतांना मला वाटते की संपुर्ण स्वातंञ्यवीर समाजाने समजून घेतलेले नाहीत स्वातंञ्यवीर सावरकरांची विज्ञाननिष्ठा त्यांचा समाजसुधारणा आणी गोवंशा बद्दलची मते समजाने फारशी समजून घेतलेली नाहीत , असे मला वाटते . मी जेव्हढे स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी वाचले आहे त्यातील फारच कमी साहित्य त्यांच्या रत्नागिरी येथील कार्यावर प्रकाश टाकणारे आहे (माझे वाचन परीपुर्ण आहे .अशा माझा दावा मुळीच नाही या उलट माझे वाचन बालीश वरवरवरचे आहे असे म्हणणेच संयुक्तीक ठरेल ) स्वातंञ्यवीर सावरकर म्हटले की अंदमानच्या सेल्यूलर मध्ये त्यांनी भोगलेल्या हाल अपेष्ठांविषयीच लोकांना बोलतांना बघीतलंय . किंवा हिंदुत्वाविषयी बोलताना बघीतलंय हे दोन्ही मुद्दे महत्वाचे आहेत यात वादच नाही . माञ स्वातंञ्यवीरांचे कार्य एव्हढेच नाही .
सावरकारांचे आज देखील विचार करायला लावणारे कार्य म्हणजे त्यांनी मराठी भाषेविषयी केलेले कार्य आज मराठी भाषा अत्यंत कठीण कालखंडातून चालली आहे . कवीश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी विधानमंडळासमोर उभी असणार्या मराठीची कल्पना करून आज कैक वर्षे उलटली आहेत . मराठीची अवस्था तेव्हापासून आगीतून फुफुट्यात जाणारी आहे असे मला वाटते . स्वातंञ्यवीर सावरकर आणी छञपती शिवाजी महाराज यांनी परभाषेतून मराठीत रुढ झालेल्या अनेक शब्दांना मराठीत अनेक प्रतीशब्द दिले जसे एडीटरला संपादक वगैरे .त्यांनी दिलेले सर्वच शब्द मराठीत रूजले असे नाही काही संस्कृत्तोभव शब्दांऐवजी इंग्रजी शब्दच रूळले . या विषयी मी एकदा एका व्यक्तीशी बोललो असता त्यांनी लोखंड ज्या प्रकारे न वापरल्यास गंजते त्या प्रकारे ते शब्द न वापरल्याने त्यांचे इंग्रजी शब्दच रुढ झाले असे म्हटले .जर ते शब्द वापरले असते तर ते नक्कीच रूढ झाले असते असे त्या सद्दगृहस्थाचे मत होते . असो
स्वातंञ्यवीरांचे आजच्या काळात देखील विचार करायला लावणारे दूसरे कार्य म्हणजे त्यांनी केलेल्या समाजसुधारणा .स्वातंञ्यवीर सावरकरांचा जन्मगाव असलेल्या भगुर पासून हाकेच्या अंतरावर नाशिकमध्येच समाज विघातक असी जातपंचायतीची प्रथा पुरोगामी म्हणवल्या जाणार्या महाराष्ट्रात सुध्दा आहे याची खुण पटावी . (आठवा महात्मानगर मध्ये रिक्षात जन्मदात्या पित्यानेच जात पंचायतीचा दहशतीखाली पोटचा मुलीची केलेली हत्या ) अशी घटना घडावी काय म्हणावे बरे यास . त्यांनी त्यांचा मृत्युपञात सांगितल्या प्रमाने कोणत्या गोष्टी झाल्या तर फारच कमी .
माझ्या शालेय जिवनात महापुरुषांचा पराभव त्यांचे अनूयायीच करतात या अर्थाचा एक धडा होता . माझ्यामते स्वातंञ्यवीर सावरकरांविषयी हे खरे आहे .स्वातंञ्यवीर सावरकरांचा भविष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन विषद करताना पंडीत नेहरुचा फसलेल्या चीन विषयक धोरणाचा उल्लेख करतात माञ तोच धागा पकडून सध्याचे जग तंञज्ञानाचे आहे. त्याचाशी सूसंगत असे आचरण ठेवले पाहीजे असा विचार किती स्वातंञ्यप्रेमी करतात ?
स्वातंञ्यवीर सावरकरांचे हिंदुत्व महत्वाचे आहे यात वादच नाही .पण ते म्हणजेच स्वातंञ्यवीर सावरकर नव्हे . हे लक्षात घेणे अत्यावशक आहे
तस बघायला गेल तरं स्वातंञ्यवीर सावरकर समाजमाध्यमावरील एका पोस्ट मध्ये कवेत येणारे व्यक्तीमत्व नव्हेच तरी पण या माध्यामाचा मर्यादा लक्षात घेवून थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?