ऐताहासिक वास्तू आणि आपण

३ मे २०१५ ला भारतीयाने पहीला चिञपट बनवला त्यास १०१ वर्षे पुर्ण होतील तो चिञपट दादासाहेब फाळके यांनी बनवलेला होता दादासाहेब नाशिक पासून२८ किलोमीटरवरील ञ्यंबकेश्वर चे होते फाळकें चे नाशिकमधील घर केव्हाच इतिहासजमा झाले ञ्यंबकेश्वर मधील त्यांचे घर सुध्दा इतिहासजमा आहे नाशिकमधील वसंत कानेटकरांचे स्मारक सुध्दा नष्ट झाले आहे विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसूमाग्रज यांचे स्मारक जपले गेले आहे हिच एक समाधानाची गोष्ट
आपण युरोपीय देशातील खाद्य म्हणता येईल असे खाद्य म्हणजे पिझा बर्गर खातो असे खाण्याविषयी मला काही म्हणायचे नाही काय खायचे काय खायचे नाही हा वैयक्तिक प्रश्न आहे मला येव्हढेच म्हणायचे आहे की या देशात ज्या प्रकारे ऐताहासिक वास्तूंचे जतन होते त्या प्रकारचे जतन आपल्या ऐताहासिक वास्तूंचे व्हावे यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे खाण्याच्या सवयी बरोबर आपण ही सवय घेतली तर सोने पे सुहाना असे म्हणावे लागेल
पु ल देशपांडे यांचा अपुरवाई यांचा पुस्तकात शेक्सपियरचे घर जतन केल्याचा उल्लेख आहे मला तरी भारतात असे झालेले आढळलेले नाही माझे अनुभव विश्व परिपुर्ण आहे अशा माझा दावा नाही
अनेक किल्लांचे जतन केले गेले आहे काही नव्याने बांधले गेले आहेत त्यामुळे भारतात सर्व ऐतिहासिक स्थळ धोक्यात आहेत असे नाही

या ऐतिहासिक स्थळांचे जतन करण्याचे सद्यांचे नियम हा पण मुद्दा विचारात घेतला पाहिजे असे मला वाटते या नियमांमुळे अशी स्थळे असणार्या प्रदेशामध्ये पायाभूत सुविधापण उभारणे कधी कधी अशक्यप्राय होते याच नियमांचा आधार घेउन भारतात राजकारण पण खेळले जाते एखादे ठिकाण जर ऐतिहासिक म्हणून जाहीर होत असेल तर विरोधी पक्ष यानियमाचा फायदा घेत या मुळे तूमचे असे नुकसान होइल अशा प्रचार करतो त्यामुळे त्या वास्तुचे जतन करण्याचा मुख्य मुद्दा बाजूला पडतो तरी या नियमात बद्दल होणे अत्यावश्यक आहे सध्या भारतातील अनेक अनावश्यक किंवा प्रगतीला मारक नियम बदलले जात आहेत याच मालिकेत हे नियम पण बदलतील अशी आशा करुन सध्या थांबतो पुन्हा भेटण्यासाठी तो पर्यत नमस्कार बाय बाय टेक केअर

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?