बर झालं !

सर्वप्रथम केंद्रीय लोकसेवा आयोगाची नागरी सेवा परीक्षा देणार्या परीक्षार्थींना खुप खुप शुभेच्छा
नाशकाच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी असणार्या क्रॉम्पटन ग्रीव्हचा जवळपाश 100 दिवस चालणारा संप अखेर काही तडजोडी करत संपला . आणी गेले काही दिवस गँसवर असणार्या नाशिकच्या औद्योगिक क्षेञाने सुटकेचा विश्वास टाकला . नाशिकच्या अंबड या उपनगराच्या औद्योगीक क्षेञातील ही कंपनी नाशिकच्या औद्योगीक क्षेञातील महत्वाची कंपनी आहे . अंबड मध्ये या कंपनीवर आधारीत अनेक लघूउद्योग आहे . ज्यांना नाशिक महानगरपालिकेची फाळणी करण्याची मागणी आठवण असेल ,त्यांना हेही आठवत असेल की नाशिक महानगरपालिकेच्या आर्थीक स्ञोतासाठी अंबड किती महत्वाचे आहे . नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थिती कशी आहे ? हे आपण साधू महंताचा ध्वजारोहणाच्या वेळी ऐकलेच , तसेच त्याला त्यावेळच्या सर्वात महत्वाचा राजकीय व्यक्तीने कशी वागणूक दिली हे ही आपण बघीतलेच . मला त्या राजकरणावर काहीही भाष्य करायचे नाही . मला आपले लक्ष वेधून घेयचे आहे ते हा संप मिटणे नाशिक महानगरपालीकेची आर्थीक स्थीती टिकण्यासाठी किती आवश्यक आहे याकडे . आणी हे उद्योग केवळ नाशिकला वाचवत आहेत असे नाही . जरा सप्टेंबर जावू द्या , मराठवाड्यातून कामाच्या शोधात नाशकात लोक येतीलच , त्यांचे पण पोट नाशिक पुणे मुंबई ला भरायचे आहे . त्यामुळे या कंपनी तील संप मिटणे हे अत्यावशक होते . जे शुक्रवारी झाले . जे अत्यंत योग्य आहे . महाराष्ट्रातील चौथे अथवा पाचवे औद्योगीक द्रूष्ट्या महत्वाचे शहर म्हणजे नाशिक होय हे आपण यावेळी लक्षात घेतले पाहिजे . कंपनीचा संप अजून जास्त काळ चालला असता तर काय झाले असते . याची यामुळे कल्पना येते . दूर्दैवाने पुण्याचा एफ टी आय चा संप ज्या प्रकारे चर्चेला गेला त्याप्रकारे याची चर्चा झाली नाही .असो शेवट गोड तर सर्व गोड या न्यायान हे चांगले झाले असो . रसगूल्ले फेम ममता बँनजी यांचा आंदोलनाने ज्याप्रकारे सिंगूर हून नँनो प्रकल्प उंडीयो फेम गुजरात ला गेला .तसे होउन नाशिकहून प्रकल्प बाहेर गेला असता तर चिवडा फेम नाशिकला कोल्हापूरी तांबडा पांढर्या रस्याची चव चाखायला मिळाली असती यात तिळमाञ शंका नाही . वडाभात वाल्यानी यात काहीसे कमी लक्ष घातले असे मला वाटते तूमचे मत भिन्न असू शकते ज्याचे मी स्वागतच करतो . या विषयी खुप काही बोलता येवू शकते माञ तूर्तास थांबतो
आपला अजिंक्य तरटे नाशि

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?