कुणी तरी शिकवा रे बाबा यांना !

3 सप्टेबर 2015ची गोष्ट आहे ही .टिव्ही बघत असताना आग्येय आशियाई देशातील महत्वाची व्रुतवाहिनी असणार्या "चँनेल न्यूज आशिया "वर चालू असणारा एक चर्चेचा कार्यक्रम बघण्याचा योग आला . आणी मी उडालोच .अँकर सर्व वक्त्यांना व्यवस्थीत न अडवता बोलू देत होता , अँकर ही ओरडत नव्हता . चर्चेसाठी बोलवण्यात आलेल्या व्यक्ती दूसर्याला पुर्ण बोलू देत होत्या . अँकर ही हात जोर् जोरात हलवून यू मिस्टर अर्णब वगैरे बोलत नव्हता . ते द्रुष्य बघून मला वाटले किती निरस चर्चा करताय हे लोक. त्यांना आपल्या भारतात आणून भारतीय व्रूत वाहिन्यांवर चर्चेचे शास्ञशुध्द प्रशिक्षण देण्याची नितांत गरज आहे आणी त्यातही त्यांना अर्णब सरांचा तालमीत दिले पाहिजे .चर्चा त्यातही केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूक अर्ज भरण्याचा दिवशी होणारी चर्चा( येत्या 13सप्टेंबरला सिंगापूरला त्यांचा पार्लीमेंटच्या सर्व 78 जागांसाठी50 वर्षात प्रथमच निवडणूक होणार आहे त्यासाठी 3सप्टेंबरला उमेदवार अर्ज भरत होते ) कशी व्हयला पाहीजे या बाबत अर्णब सराचा हात कोणी धरू शकणार नाही . त्या ठिकाणी अशी चर्चा म्हणजे एकदम पाणचट असे मला वाटते .तूम्हाला काय वाटते . बिबिसी वरील हार्डटॉक हा कार्यक्रम पण तशा निरशच म्हणावा अशाच असतो .फक्त मुलाखत घेणारा एकजण आणी मुलाखत देणारा आपल्या मराठीसारखी एकाची मुलाखत घेण्यासाठी ञिदेव अथवा ञिदेवी या व्रुतवाहिन्या का ठेवत नाही . मी जेव्हा जेव्हा अल जझीरा , बिबिसी ,सी एन एन सारख्या वाहिन्या बघतो तेव्हा तेव्हा भारत जगाला काय काय देवू शकतो याची माझी मनात एक यादी तयार होते .आपले पंतप्रधान नरेंद्र मोदि डेमोग्राफी डिमाड आदी गोष्टींचा ऊल्लेख करतात त्यात त्यांनी भारतीय व्रुतवाहिन्यांकडून शिकण्यासारखे खुप आहे अशा पण उल्लेख करावा असे मला वाटते आपल्या भारतातील व्रुतवाहिन्यांनी सरकारकडे या बाबत आग्रह धरणे अत्यावशक आहे . चँनेल न्यूज आशिया सारख्या भयानक व्रुतवाहिन्या बघताना त्या वाहिन्याचे प्रेक्षक काय काय सहन करत अशतील ?कोण जाणे?या विषयावर खुप काही बोलता येवू शकते माञ तूर्तास समयभयास्तव थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?