माझे सिहस्थ वार्तांकनाचे हकीकत

गेल्या शनिवारी म्हणजेच 29आॉगस्ट ला मला ञ्यंबकेश्वर येथे पहिल्या पर्वणीचे वार्तांकन करण्याची संधी मिळाली . फारच मस्त अनूभव होता . पहिल्यांदा दमल्याने नंतर व्हॉटसपमध्ये आणी फेसबुकमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने माझे वार्तांकन करण्याचा अनुभव तुम्हाला सांगण्यास एव्हढा वेळ लागला .
हा सिहस्थ माझ्या जन्मानंतरचा दूसरा पण वार्तांकन करण्याचा पहिलाच सिहस्थ होता .माझ्या मते पोलीसांनी थोडासा अतिरेक केला माझ्याकडे वार्तांकनाचा पास असला तरी मला सातपूरला ञास झाला .आता बघूया दुसर्या पर्वणी ला काय करताय ? मला हे माहीती आहे की लोक वार्तांकनाच्यावेळी काढलेले फोटो बघण्यास उत्सुक आहेत .त्यांची ईच्छ पुर्ण करेल .
पुर्वी पुण्यातील गणपती उच्छवात सलग 21 तास गर्दिचे नियंञण केले होते . त्यामुळे राञभर जागण्याचा काही ञास झाला नाही . माञ ते स्वयंसेवक पध्दतीने होते . इथे मी वार्तांकन करत होतो . त्यामुळे थोडासा तणाव होताच . पण या तणावावर उत्साहाने मात करत एक मस्त अनुभव घेतला . प्रशासनाकडुन मला ईतर परीसराचा पास देण्यात आला आहे . तर माझ्या सहकार्याला कुशावर्ताचा पास देण्यात आलाय . ञ्यंबकेश्वर येथील लोक जरी उत्साह असले तरी त्यावर माञ पाणी फिरवले गेले . या वार्तांकनाच्या वेळेसच मी दादासाहेब फाळके यांचे ञ्यंबकेश्वर येथील घर बघीतले . काहीसे दुर्लक्षीले गेले आहे ते . असो . साधुंचा मिरवणूकां अपेक्षेप्रमाणे उत्तम होत्या .माञ सिहस्थांची तयारी काहीसी अपुर्ण वाटली . माझ्या दूसर्या एका माध्यमातील मिञाला मिरवणूकीसंदर्भात काही प्रश्न असल्याने त्याचा निराकरणासाठी ञ्यंबक नगर परीषदेच्या कार्यालयात गेलो असता मी आणी माझ्या मिञाला आलेला अनूभव फारसा प्रसन्न करणारा नाही असो .
अहमदनगर संगमनेर येथील लोकांना कुशावर्त म्हणून अन्य घाट दाखवणे या प्रशासनाच्या कार्यासाठी माझ्याकडे शब्दच नाही . या विषयी खुप काही बोलता येईल तूर्तास थांबतो

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?