25 वर्षानंतर

या आठवड्यात एका मोठ्या घटनेस जीने जागतीक राजकारणात अमुलाग्र बदल केले , त्या घटनेस 25 वर्षे पुर्ण झाली . ती घटना म्हणजे पुर्व आणी पश्चीम जर्मनीचे एकञीकरण बर्लीनची ती ऐताहासिक भिंत पडणे . तसे बघायला गेले तर या घटनेचा आधीच्या दोन वर्षापासून जगात अनेक महत्वाचा घटना घडत होत्या . मग ते तिआनमेन चौकातील लोकशाही बाबतचे आंदोलन असो . किंवा त्यानंतर झालेले सेव्हीयत सोशालिस्ट रशियाचे पतन असो सारेच जागतीक राजकारण ढवळून काढणारे . (अर्थात भारतात काही वेगळी स्थिती नव्हती मंडल की कमंडलू हा वाद सर्वप्रथम याच काळात सुरु झाला . जो आतापरत सुरु होण्याची चिन्हे दिसत आहेत हार्दीक पटेल आणी काही संघटनांमुळे ,असो .) सध्या जग ज्या दहशतवादाने ग्रासले आहे त्या धार्मिक दहशतवादाची निर्मितीची सुरवात देखील याच काळाची . युनाटेड स्टेटस आँफ अमेरीकेची हूकुमशाहीपण याच काळात सूरू झाली , असो . भांडवलशाहीप्रधान पश्चीम जर्मनी विकसीत तर साम्यवादी विचारसरणीचा पूर्व जर्मनी अविकसीत . अश्या स्थितीत दोन्ही भागाचा विकास साधत आजचा जर्मनी उभा आहे . ज्याने पिग्स देशांच्या संकटातून यूरोपिय युनियनला वाचवण्याचे काम केले आणी आता भारताबरोबर जी फोर (फोर जी नाही जी फोर )या समुहांतर्गत युनाटेड नेशन्सच्या सिक्युरिटी कॉन्सिलमध्ये पर्मनंट सिट विथ व्हेटोसाठी दावेदारी करत आहे . पहिल्या महायुध्दानंतर झालेला व्हसायचा तह , त्यात लादलेल्या अटींमुळे झालेला हिटलयचा उदय त्याने केलेले अत्याचार ज्याची वर्णने आज देखील नकोशी वाटतात . ज्यांना ती वाचायची असतील त्यांना डायरी आँफ अँन फ्रँक नावाचे मराठीतीत अनूवाद झालेले पुस्तक जरूर वाचावे , असो . आजचा जर्मनी कार उत्पादन क्षेञात दादा समजला जातो आताचे वोसवँगनचे प्रकरण काही काळ बाजूला ठेवू . प्राचीन भारतातील महत्वाचे साहित्य असलेल्या शाकुंतलचे युरोपीय भाषेत भाषांतर करणारा गटे (गटणे नाही गटे ) हा जर्मन नागरीकच . नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी 1939 नंतर उभारलेल्या स्वातंञ्य लढ्यात महत्वाची भुमिका जर्मन लष्कराची होती त्यानी केलेला तो तो धोकादायक पाणबुडीतील प्रवास जर्मनीतूनच सूरू केलेला होता . आपल्या भारतात सध्या जे अणूविजप्रकल्प सूरु आहेत . त्यातील बहूसंख्य आपण जर्मनीचा माध्यमातूनच उभारलेले आहेत . छोटा नागपूर पठारावर उभारलेल्या खनिज शुद्धीकरण प्रकल्पात देखील त्याची गुंतवणूक प्रचंड आहे .तर अश्या जर्मनीचे शीतयुध्द काळात वेगळे केलेले भाग या आठवड्यात 25वर्षापूर्वी एकञ आले .
शनिवार 3 आॉक्टोबर 2015 ला बि बि सी च्या हेडलाईन्स बघताना जर्मनीचा चान्सलर एँजेना मकेल या या दिवसानिमित्य जर्मनवासियांचे अभिनंदन करताना बघीतले आणी विचार आला आजची लेखन उपासना (जी मला दिर्घकाळ चालवायची ईच्छा आहे बघू भविष्यात काय होते) याच विषयावर करावी असे वाटले
आपला अजिंक्य तरटे
जाताजाता : मी लिहलेल्या लेखांना सात्यत्याने प्रतीसाद देणार्या श्रीयुत विराम गांगुर्डे यांनी काही दिवसापुर्वी मला लेखनाविषयी काही विषय सुचवले होते . जर आपल्या पैकी कोणाला मी अमुक एका विषयावर लिहावे किंवा लिहू नये असे वाटले तर सांगावे आपले स्वागतच आहे .

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?