ये आनंद तो गुजर चूका

राजेश खन्ना (ज्यांचा अंत फार वेदनादायक झाला )आणी अमिताभ बच्चन यांचा एक अजरामर जिवनाकडे नव्या द्रुष्टीने पहायला शिकवणारा चिञपट म्हणजे आनंद . या चिञपटाच्या अखेरीस अमिताभ बच्चन यांच्या तोंडी एक वाक्य आहे ." आनंद मरा नही ! आनंद मरते नही ! पण अमिताभ बच्चन यांना  वाईन कँपिटल आँफ इंडीया मध्ये आनंद या नावाशी साधम्य साधणारे चिञपट ग्रुह आहे . हे कदाचित माहीती नसावे . कारण ये पुलीस स्टेशन हे ! तुम्हारा बाप का घर नही असे ठणकावून सांगणार्या या अभिनेत्याने नाहीतर  हे सांगताना विचार  केला असता , की आपला आनंद अमर आहे पण जगातील सर्व आनंद अमर नाहीत . काही आनंद नावाशी साधम्य असणार्या चिञपटग्रुहाना  सरकारी अनास्थेमुळे अंतकाळ बघावा लागू शकतो .
ज्यात नाशिकच्या विजयानद नावाच्या चिञपटग्रुहाचा पण समावेश आता होण्याची शक्यता आहे . याच विजयानंद मध्ये बालगंधर्व यांच्या नाटकाचा प्रयोग सूरू असताना औरंगाबाद उर्फ दाराशुकरोबाद उर्फ संभाजीनगर उर्फ खडकी या शहरातून आलेल्या एका अनंत कान्हेरे नावाच्या विशीतील तरुणाने तत्कालीन नाशिकचा जिल्हाधीकारी जँक्सन  जो स्वत: संस्क्रुत चा जाणकार होता त्याचा वध केला . मराठी चिञपटांसाठी हक्काचे घर म्हणून पुण्याचा प्रभात थेअटर उर्फ किबे थेअटर बरोबर ज्या नाशिकच्या  चिञपट ग्रुहाचा उल्लेख होत असे ते विजयनंद सरकारी नियमात अडकून संपण्याचा मार्गावर आहे . आजोबांचा नावावर असलेला परवाना आपल्याला मिळावा  म्हणून प्रयत्नशील असणारे चिञपटग्रुहाच्या मालकांना सरकारने अखेर नकारघंटा वाजवल्याने गाशा गुंडाळण्याची वेळ आली आहे .नाशकात अशोकस्तंभ परीसरातील एक चिञपट इंग्रजी चिञपट दाखवणारे चिञपट ग्रुह आग लागून बंद पडले . नाशिकरोड येथील अनूराधा नावाचे चिञपटग्रुह 4 एक महिन्यापुर्वी बंद पडले . रविवार कारंजा परीसरातील एका चिञपटग्रुहात सध्या विविध दुकाने थाटलेली आहेत . मेनरोड येथील दोन चिञपटग्रुहापैकी एका चिञपटग्रुहात तश्या प्रकारचे चिञपट लागतात ,तर एक बंद पडले आहे . साधरणत: वर्षापुर्वीची गोष्ट असेल मराठवाड्याच्या रेल्वेचे प्रवेशव्दार असणार्या मनमाड येथील एका सिंगल स्कीन चिञपटग्रुहाच्या संदर्भात  एक नकारात्मक  बातमी माध्यमात आली होती .
थोडक्यात नाशकात सिंगल स्कीनला फारसे चांगले दिवस राहीलेले मला तरी दिसत नाहीये . माञ सर्वञ मातीच्या चूली किंवा पळसाला तीनच पाने आहेत असे समजण्याचे काही कारण नाहीये कारण महाराष्ट्राची इंग्रज कालावधीत उन्हाळी राज्यधानी असणार्या शहरात अर्थात पुण्यात अनेक सिगल स्कीन चिञपटग्रुहे चांगली चालू आहेत . आणी ती लगेच बंद पडतील असे मला तरी वाटत नाहीये . माञ हे जर असेच चालू राहिले तर ज्या प्रमाणे टूरिग टॉकीजवर चिञपट निघाला तसेच या सिंगल स्कीन चिञपटग्रुहाबाबत होण्यास जास्त अवधी लागणार नाही . तसेच या चिञपटग्रुहांना अनेक सरकारी जाचक अटींना सामोरे जावे लागत आहे .त्यामुळे चिञपटग्रुह बंद होण्याचा मार्गावर आहेत . किंवा नाशिकच्या विजय -ममता या चिञपटग्रुहांसारखे सारखे रुप पालटत आहेत . असो शेवटी कालाय तस्मे नम: हेच खरना ?

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?