मेरे पिया गये हे रंगून

जून्या हिंदी चिञपटातील एक अजरामर गाणे म्हणजे मेरे पिया गये हे रंगून ! वहा से किया हे टेलीफोन ! कि याद तूम्हारी आती हे ! सध्याचा काळात टेलीफोन ज्या जागी स्मार्टफोन येइल . तर सांगायचा मुद्दा असा की जून्या काळापासून भारताचा शेजारी असणारा किबहूना ब्रिटीश भारतात भारताच एक भाग असणार्या पूर्वीच्या ब्रम्हदेश अर्थात आताच्या म्यानमार मध्ये येत्या 8 तारखेला जेव्हा समस्त भारत बिहार बिहार करत असेल त्या वेळेस ऐताहासिक ठराव्यात अश्या केंद्रीय विधीमंडळाच्या निवडणूका आहेत . भारता पाठोपाठ 1948 साली ब्रिटिशांपासून स्वतंञ्य झालेल्या (तसे म्यानमार ला दोनदा स्वातंञ्य मिळाले 1935मध्ये ब्रिटीश भारतापासून नंतर 1948ला )म्यानमार ची सुरवातीची काही वर्षे वगळता तिथे लष्करी हूकूमत होती . सुरवातीच्या लोकशाहीच्या काळातील एका प्रसिध्द म्यानमारी नेत्याची भारतातील तत्कालीन ज्यांची काही धोरणे चुकली असतील वैयक्तिक आयुष्यात ज्यांचा पाय घसरला असेल माञ लोकशाही भारतात रूजवण्यात मोलाचा वाटा होता असे सध्याचा नेपाळ उत्तर आफ्रिकी देश बघीतल्यावर वाटू शकते असे नेते म्हणजे चाचा नेहरू यांच्याबरोबर शोले स्टाईल मैञी होती .माञ भारतातील लोकशाही फुलली तर तेथील लोकशाही खुरटली .असो आता पंचवीस वर्षातील महत्ववाचा निवडणूका होत आहेत . तर चँनेल न्यूज एशिया चा अहवालानूसार स्नु की असे प्रथम नाव असणार्या तेथील नेत्या ज्या अँग सँग स्नू की या नावाने प्रसिध्द आहेत त्याचा नँशनल लीग फॉर डेमॉक्रसी( NLD नावाने प्रसिध्द ) या पक्षाला घवघवीत यश प्राप्त होइल . अर्थात या पक्षावर अरविंद केजरीवाल यांचे आपवर जसे नियंञण आहे तसे या प्रसिद्द नेत्याचे असल्याचेही आणी त्यामुळे असंतोष असल्याचे चँनेल न्यूज एशियावर दाखवलेल्या अहवालात नमुद केलय . तसे ब्रम्हदेशासी आपले ऐताहासिक संबध आहेत स्वातंञ्यवीर सावरकरांची अंदमानातून सुटका झाल्यावर ज्या ठिकाणी समाज सुधारणा चळवळ सूरू केली (माझ्या दुर्देवाने असेल कदाचित माञ स्वातंञ्यवीर सावरकरांचा संदर्भात अंदमान संबधीत जेव्हढे वाचायला ऐकायला मिळते त्या प्रमाणात या विषयी मला तरी प्राप्त होत नाही माहितगारानी मार्गदर्शन करावे )त्या रत्नागिरीत तेथील बादशहाला ब्रिटिशानी ठेवले होते . तर 1857नंतर आपल्या बादशहाला तिथे . या विषयी खुप बोलता येइल पण तुर्तास थांबतो
आपला अजिंक्य तरटे

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

चोराच्या उलट्या बोंबा !

50 वर्षाचा सुवर्णकाळ

ढगफुटी म्हणजे काय रे भाऊ ?